इंजिनीअरिंग ग्रॅज्युएट्स/टेक्निशियन डिप्लोमा अॅप्रेंटिसेसची भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन ( BPCL), मुंबई रिफायनरी (भारत सरकारचा उपक्रम), माहुल, मुंबई येथे एक वर्ष कालावधीच्या अॅप्रेंटिसेस अॅक्ट १९६१ अंतर्गत एकूण १७५ जागांवर भरती.

(I) कॅटेगरी-१ डिसिप्लिननुसार ग्रॅज्युएट अॅप्रेंटिसेसच्या रिक्त जागांचा तपशील – एकूण ९६ पदे.

commissioner review facilities in girls ashram school
आयुक्तांकडून कन्या आश्रमशाळेतील सुविधांचा आढावा
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
NFL Recruitment 2024 National Fertilizers Limited Recruitment 2024
NFL Recruitment 2024: नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी नो टेन्शन; ‘नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड’मध्ये ३४९ जागांसाठी भरती
ugc s apprentice embedded degree program
आता प्रशिक्षणाचा समावेश असलेला नवा पदवी अभ्यासक्रम… कुठे, कधीपासून होणार सुरू?
PGCIL Trainee Recruitment 2024 Applications begin for 795 posts link to register here
PGCIL Trainee Recruitment 2024: ७९५ पदांसाठी होणार भरती, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया आणि शेवटची तारीख
MPSC Town Planner Recruitment 2024
MPSC Town Planner Recruitment 2024: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे टाऊन प्लॅनरच्या २०८ पदांसाठी होणार भरती, मिळू शकतो १ लाखांपेक्षा जास्त पगार
Punjab & Sind Bank Apprentices Recruitment 2024: Apply for 100 posts at punjabandsindbank.co.in
Punjab and Sind Bank Recruitment 2024: पंजाब आणि सिंध बँकेत नोकरीची संधी; रिक्त जागांसाठी भरती सुरू
Indian Army Recruitment 2024
Indian Army Recruitment 2024: भारतीय लष्करामध्ये ९० जागांची होणार भरती! २,५०,०००रुपयांपर्यंत मिळेल पगार, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

(१) केमिकल इंजिनीअरिंग – २२

(२) सिव्हील इंजिनीअरिंग – १०

(३) इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी/ कॉम्प्युटर सायन्स – ४

(४) इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग – १३

(५) इन्स्ट्रूमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स – ९

(६) मेकॅनिकल इंजिनीअरिंग – ३०

(७) फायर अँड सेफ्टी – ८

पात्रता : संबंधित विषयातील फर्स्ट क्लास इंजिनीअरिंग पदवी (पूर्ण वेळ) किमान ६.३ CGPA. (अजा/ अज/ दिव्यांग – ५.३ CGPA) पात्रता परीक्षा २०२०, २०२१, २०२२, २०२३ आणि २०२४ मध्ये उत्तीर्ण केलेली असावी.

( II) कॅटेगरी-२ डिसिप्लिननुसार टेक्निशियन डिप्लोमा/नॉन-इंजिनीअरिंग ग्रॅज्युएट्स अॅप्रेंटिसेसच्या रिक्त जागांचा तपशील – एकूण ७९ पदे.

(१) केमिकल इंजिनीअरिंग – १६

(२) सिव्हील इंजिनीअरिंग – १२

(३) इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग – १२

(४) इन्स्ट्रूमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स – १०

(५) मेकॅनिकल इंजिनीअरिंग – १६

(६) B.Com. (संगणक ज्ञानासह) नॉन-इंजिनीअरिंग ग्रॅज्युएट – ५

(७) B.Sc. (केमिस्ट्री) नॉन-इंजिनीअरिंग ग्रॅज्युएट – ५

(८) बी.बी.ए. ( फ) नॉन-इंजिनीअरिंग ग्रॅज्युएट – ३

(९) B.S.W. (नॉन-इंजिनीअरिंग ग्रॅज्युएट) – १

पात्रता : संबंधित विषयातील इंजिनीअरिंग पदविका किंवा संबंधित विषयातील पदवी किमान ६ टक्के गुण (अजा/ अज/ दिव्यांग – ५ टक्के) पात्रता परीक्षा २०२०/ २०२१/ २०२२/ २०२३/ २०२४ मध्ये उत्तीर्ण केलेली असावी.

वयोमर्यादा : दि. १४ ऑगस्ट २०२४ रोजी १८२७ वर्षे. (वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे, दिव्यांग – १० वर्षे)

स्टायपेंड : ग्रॅज्युएट अॅप्रेंटिसेससाठी रु. २५,०००/- दरमहा.; टेक्निशियन डिप्लोमा/ नॉन-इंजिनीअरिंग ग्रॅज्युएट्स अॅप्रेंटिसेससाठी रु. १८,०००/- दरमहा.

ट्रेनिंगचा कालावधी : अॅप्रेंटिसशिप ट्रेनिंगचा कालावधी १ वर्षाचा असेल.

निवड पद्धती : पदवी/ पदविकामधील गुणवत्तेनुसार उमेदवार इंटरह्यूकरिता शॉर्ट लिस्ट केले जातील. अंतिम निवड यादी कॅटेगरीनुसार पात्रता परीक्षेतील गुण आणि इंटरह्यूमधील गुण विचारात घेऊन बनविली जाईल. निवडलेल्या उमेदवारांची नेमणूक मेडिकल एक्झामिनेशननंतर केली जाईल.

रजिस्ट्रेशन आणि अर्ज कसा करावा :

(I) वेब पोर्टलवरील student enrollment बाबत काही शंका असल्यास उमेदवारांनी बोर्ड ऑफ अॅप्रेंटिसेस ट्रेनिंग BOAT ( WR) कडे संपर्क साधावा.

स्टेप-१ : ( a) Go to www. nats. education. gov. in, ( b) Click student register, ( c) Complete the enrolment, ( d) A unique enrolment number for each student will be generated (एन्रोलमेंट व्हेरिफिकेशनसाठी किमान १ दिवस थांबावे लागेल.)

स्टेप-२ : ( a) Student Login, ( b) Click Application management, ( c) Click Find Establishment, ( d) Upload Documents, ( e) Choose establishment name, ( f) Type k Bharat Petroleum Corporation Ltd., Mumbai Refineryl establishment number WMHMCC000004 and search, ( g) Click apply, Click apply again.

शंकासमाधानासाठी पुढील ई-मेलवर संपर्क साधा. फोन नं. ०२२-३१०७३५३२/ ३५३१ z_ rlc_ userr @bharatpetroleum. in

NATS पोर्टलवर एन्रोलमेंट करून भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि., मुंबई रिफायनरीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२४.