सुहास पाटील

‘बॉर्डर सिक्युरिटी फोर्स’ ( इरा) (पर्सोनेल डायरेक्टोरेट : रिक्रूटमेंट सेक्शन – २०२४) मध्ये रिक्त होणाऱ्या पुढील पदांची भरती. ( क) जाहिरात क्र. अ-३/ Pers( Rectt) PMS-२०२४/ BSF/२०२४

Job Opportunity Opportunities in Rashtriya Chemicals and Fertilizers Limited
नोकरीची संधी: राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर लिमिटेडमधील संधी
Let’s compare the Punch iCNG and the Exter CNG to determine which one offers more value
Tata Punch vs Hyundai Exter: बजेटमधील SUV निवडण्यात होतोय गोंधळ? टाटा पंच व ह्युंदाईचे फीचर्स, किंमत पाहा; कोणती बेस्ट ते ठरवा!
BMW R 1300 GSA with automatic clutch and 30 litre fuel tank know powerful bike price
BMW R 1300 GSA: बीएमडब्ल्यूचं नवं मॉडेल लाँच; किंमत आणि फीचर्ससह सर्वकाही जाणून घ्या एका क्लिकवर
argentina beat ecuador in copa america
कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा : मार्टिनेझमुळे अर्जेंटिनाचे आव्हान शाबूत; इक्वेडोरला पेनल्टी शूटआऊटमध्ये नमवत उपांत्य फेरीत
Job Opportunity Opportunities in Central Arms Police Forces
नोकरीची संधी: सेंट्रल आर्म्स पोलीस फोर्सेसमधील संधी
Hina Khan reveals Stage 3 breast cance
हिना खानला स्टेज ३ ब्रेस्ट कॅन्सर; ब्रेस्ट कॅन्सर तपासणीसाठी किती लवकर जाणे आवश्यक? कोणती चाचणी करावी?
job opportunities
नोकरीची संधी : बँक नोट पेपर मिल इंडिया प्रा.लि.मधील संधी
India first EV focused Exchange Traded Fund launched by Mira Asset Mutual Fund Mumbai
मिरॅ ॲसेट म्युच्युअल फंडाकडून देशातील पहिला ‘ईव्ही’केंद्रित एक्सचेंज ट्रेडेड फंड दाखल

(१) सब-इन्स्पेक्टर स्टाफ नर्स – (ग्रुप-बी) १४ पदे

पात्रता – ( i) १२ वी किंवा समतूल्य, ( ii) जनरल नर्सिंग डिप्लोमा/डिग्री, ( iii) सेंट्रल किंवा स्टेट नर्सिंग काऊन्सिलकडे जनरल नर्सिंग अँड मिडवाईफचे रजिस्ट्रेशन.

(२) असिस्टंट सब-इन्स्पेक्टर (ASI) लॅब टेक्निशियन – (ग्रुप-सी) ३८ पदे

पात्रता – ( i) १२ वी (विज्ञान) किंवा समतूल्य, ( ii) (राज्य/केंद्र सरकार मान्यताप्राप्त संस्थेकडील) मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी डिप्लोमा ( DMLT).

(३) असिस्टंट सब-इन्स्पेक्टर (ASI) फिजिओथेरपिस्ट – (ग्रुप-सी) ४७ पदे

पात्रता – ( i) १२ वी (विज्ञान) किंवा समतूल्य, ( ii) राज्य किंवा केंद्र सरकार मान्यताप्राप्त संस्थेकडील फिजिओथेरपीमधील पदवी किंवा पदविका, ( iii) किमान ६ महिन्यांचा अनुभव.

( II) जाहिरात क्र. अ-३/ Pers( Rectt)/ STM WKSP/ BSF/२०२४

(४) सब-इन्स्पेक्टर (वेहिकल मेकॅनिक) (ग्रुप-बी) ३ पदे

पात्रता – ऑटोमोबाईल/मेकॅनिकल इंजिनिअरींग डिप्लोमा.

(५) कॉन्स्टेबल (टेक्निकल) (ग्रुप-सी)

( i) कॉन्स्टेबल वेहिकल मेकॅनिक – (ग्रुप-सी) २२ पदे.

( ii) कॉन्स्टेबल फिटर – (ग्रुप-सी) ४ पदे.

( iii) कॉन्स्टेबल कारपेंटर – (ग्रुप-सी) २ पदे (खुला).

( iv) कॉन्स्टेबल बीएसटीएस – (ग्रुप-सी) २ पदे (अजा – १, खुला – १).

( v) कॉन्स्टेबल ओटीआरपी – (ग्रुप-सी) १ पद (अजा).

( vi) कॉन्स्टेबल एसकेटी – (ग्रुप-सी) १ पद (इमाव).

( vii) कॉन्स्टेबल ऑटो इलेक्ट्रिशियन – (ग्रुप-सी) १ पदे (इमाव)

( viii) कॉन्स्टेबल अपहोल्स्टर – (ग्रुप-सी) १ पद (इमाव).

पात्रता – कॉन्स्टेबल टेक्निकल पदांसाठी ( i) १० वी उत्तीर्ण, ( ii) संबंधित ट्रेडमधील आयटीआय सर्टिफिकेट, ( iii) ३ वर्षांचा संबंधित ट्रेडमधील कामाचा अनुभव.

( III) जाहिरात क्र. अ-३/ Pers( Rectt)/ Veterinary/ BSF/२०२४

(६) हेड इन्स्पेक्टर (वेटेरिनरी) (ग्रुप-सी) ४ पदे .

पात्रता – ( i) १२ वी उत्तीर्ण, ( ii) वेटेरिनरी स्टॉक असिस्टंट कोर्स किमान १ वर्ष कालावधीचा आणि किमान १ वर्षाचा अनुभव.

(७) कॉन्स्टेबल ( Kennelman) (कुत्र्यांची काळजी घेणारा) – (ग्रुप-सी) २ पदे.

पात्रता – ( i) १० वी उत्तीर्र्र्ण, ( ) शासकीय हॉस्पिटल/वेटेरिनरी कॉलेजमधील प्राणी हाताळण्याचा किमान २ वर्षांचा अनुभव.

( iv) जाहिरात क्र. DGBSF/ Pers Dte : Recruitment Section यांची जाहिरात दि. १५ मे २०२४

(८) इन्स्पेक्टर (लायब्ररियन) (ग्रुप-बी) २ पदे (खुला).

पात्रता – लायब्ररी सायन्स किंवा लायब्ररी अँड इन्फॉरमेशन सायन्स पदवी.

अनुभव – २ वर्षांचा लायब्ररीमधील कामाचा अनुभव.

इष्ट पात्रता – लायब्ररी सायन्स किंवा लायब्ररी अँड इन्फॉरमेशन सायन्समधील पदव्युत्तर पदवी.

वयोमर्यादा – पद क्र. १, ४ व ७ साठी ३० वर्षे (पद क्र. १ साठी किमान वयोमर्यादा २१ वर्षे); पद क्र. २, ५, ६ व ७ साठी १८२५ वर्षे; पद क्र. ३ साठी २०२७ वर्षे. (ग्रुप-सी पदांसाठी विधवा/ घटस्फोटीत/ कायद्याने विभक्त महिला (पुनर्विवाह न केलेल्या) खुला गट – ३५ वर्षे, इमाव – ३८ वर्षे, अजा/अज – ४० वर्षे)

कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे.

निवड पद्धती – फेज-१ – लेखी परीक्षा ऑब्जेक्टिव्ह टाईप १०० प्रश्न, १०० गुण, वेळ २ तास.

फेज-२ – शारीरिक मापदंड चाचणी ( PST), शारीरिक क्षमता चाचणी ( PET), कागदपत्र पडताळणी, प्रॅक्टिकल/ट्रेड टेस्ट, मेडिकल एक्झामिनेशन, रि-मेडिकल एक्झामिनेशन यांची विस्तृत माहिती उमेदवारांनी संबंधित जाहिरातीमध्ये पडताळून पहावी. अंतिम गुणवत्ता यादी पदनिहाय कॅटेगरीनुसार लेखी परीक्षेतील गुणांवर आधारित बनविली जाईल.

रिक्रूटमेंट सेंटर्स – जाहिरातीत दिलेल्या (गांधीनगर, बंगलोर, टेकानपूर – ग्वालियर इ.) ११ रिक्रूटमेंट सेंटर्सपैकी एक सेंटर निवडावे.

ऑनलाइन अर्ज https:// rectt. bsf. gov. in या संकेतस्थळावर दि. ७ जून २०२४ (२३.५९ वाजे)पर्यंत करावेत. अर्जाचे शुल्क – ग्रुप-बी पदांसाठी (पद क्र. १, ४, ८ साठी) रु. २००/-. ग्रुप-सी पदांसाठी (पद क्र. २, ३, ५, ६, ७ साठी) रु. १००/- अजा/अज/महिला/बीएसएफचे कार्यरत कर्मचारी/माजी सैनिक यांना फी माफ आहे.