सुहास पाटील इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस फोर्स (ITBP), गृह मंत्रालय, भारत सरकार. पुरुष व महिला उमेदवारांची ‘ट्रेड्समन कॉन्स्टेबल (टेलर अँड कॉब्लर)’ च्या एकूण ५१ पदांवर भरती. (१) कॉन्स्टेबल टेलर - १८ पदे पुरुष - १६ पदे (अज - ७, ईडब्ल्यूएस - २, खुला - ७). महिला - २ पदे (अज - १, खुला - १). (२) कॉन्स्टेबल (कॉब्लर) - ३३ पदे. पुरुष - २८ (अजा - १, अज - ९, ईडब्ल्यूएस - ३, खुला - १५); महिला - ५ (अज - २, खुला - ३). १० टक्के पदे माजी सैनिकांसाठी राखीव आहेत. वेतन श्रेणी : लेव्हल-३ (रु. २१,७०० - ६९,१००) मूळ वेतन रु. २१,५००/- अधिक महागाई भत्ता रु. १०,८५०/- अधिक रेशन मनी, स्पेशल कॉम्पेन्सेटरी अलाऊन्स, मोफत निवास अथवा एचआरए. ट्रान्सपोर्ट अलाऊन्स. एलटीसी, मोफत वैद्याकिय सुविधा इ. तसेच उमेदवारांना ‘New Restructured Defined Contributory Pension Scheme’ (नवीन पेंशन स्कीम) लागू असेल. पात्रता : (१८ ऑगस्ट २०२४ रोजी) (i) १० वी उत्तीर्ण, (ii) संबंधित ट्रेडमधील कामाचा २ वर्षांचा अनुभव किंवा (iii) संबंधित ट्रेडमधील आयटीआय सर्टिफिकेट आणि संबंधित कामाचा १ वर्षाचा अनुभव किंवा (iv) संबंधित ट्रेडमधील २ वर्षं कालावधीचा आयटीआय डिप्लोमा. वयोमर्यादा : (दि. १८ ऑगस्ट २०२४ रोजी) १८ ते २३ वर्षे (कमाल वयोमर्यादेत सूट - इमाव - ३ वर्षे, अजा/अज - ५ वर्षे). शारीरिक मापदंड : उंची - पुरुष - १६७.५ सें.मी. (अनुसूचित जमाती - १६२.५ सें.मी.), महिला - १५७ सें.मी. (अज - १५ सें.मी.) छाती - पुरुष - ८०८५ सें.मी. (अज - ७६८१ सें.मी.) दृष्टी - जवळची दृष्टी (चष्म्याशिवाय) चांगला डोळा एन-६, खराब डोळा एन-९; दूरची दृष्टी (चष्म्याशिवाय) चांगला डोळा ६/६, खराब डोळा ६ टॅटू : धार्मिक भावना दर्शविणारे डाव्या हातावरील (Left forearm) आतील बाजूस (कोपर ते हात) असलेले कोपर ते हात यामधील भागाच्या १/४ आकारापेक्षा कमी आकाराचे टॅटू चालू शकतात. निवड पद्धती : PET/ PST च्यावेळी उमेदवारांची बायोमेट्रिक ओळख पटविली जाईल. फेज-१ - शारीरिक क्षमता चाचणी ( PET) (फक्त पात्रता स्वरूपाची) पुरुष - १.६ कि.मी. अंतर ७.३० मिनिटांत धावणे, लांब उडी - ११ फूट, उंच उडी - ३१/२ फूट. महिला - ८०० मीटर अंतर ४.४५ मिनिटांत धावणे; लांब उडी - ९ फूट, उंच उडी - ३ फूट. लांब उडी आणि उंच उडीसाठी ३ प्रयत्न दिले जातील. शारीरिक मापदंड चाचणी (PST) : पुरुष उमेदवारांची उंची, वजन आणि छाती मोजली जाईल. महिला उमेदवारांची उंची आणि वजन मोजले जाईल. उमेदवार अपात्र ठरल्यास त्याचदिवशी अपिल करू शकतात. फेज-२ - लेखी परीक्षा (वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे) ५० प्रश्न/ ५० गुण, वेळ ५० मिनिटे. (जनरल इंग्लिश, जनरल हिंदी) (१) जनरल नॉलेज - १५ प्रश्न, (२) प्राथमिक अंकगणिताचे ज्ञान - १० प्रश्न, (३) अॅनालायटिकल अॅप्टिट्यूड अँड अॅबिलिटी टू ऑब्जर्व्ह अँड डिस्टींग्वीश पॅटर्न्स - १५ प्रश्न, (४) इंग्लिश किंवा हिंदीचे ज्ञान - १० प्रश्न (चुकीच्या उत्तरासांठी गुण वजा केले जाणार नाहीत.) उत्तरतालिका (Answer Key) लेखी परीक्षा पूर्ण झाल्यावर (ITBP ¨¹FF https:// recruitment. itbpolice. nic. in या संकेतस्थळावर) अपलोड केल्या जातील. फेज-३ लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी रिक्त पदांच्या १० पट उमेदवार ५० गुणांच्या ट्रेड टेस्टसाठी बोलाविले जातील. ट्रेड टेस्ट निकष संबंधित जाहिरातीमध्ये दिलेले आहेत. लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार कॅटेगरीनिहाय गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. कागदपत्र पडताळणीनंतर डिटेल्ड मेडिकल एक्झामिनेशन (DME) होईल. अपात्र ठरल्यास रिह्यू मेडिकल एक्झामिनेशन (RME) २४ तासांच्या आत मागता येईल. PET/ PST, लेखी परीक्षासाठी अॅडमिट कार्ड ऑनलाइन ँttps:// recruitment. itbpolice. nic. in या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येतील. शंकासमाधानासाठी हेल्पलाईन नंबर - ०११-२४३६९४८२/ २४३६९४८३, ई-मेल आयडी - comdtrect@itbp. gov. in अर्जाचे शुल्क : रु. १००/- (खुला, इमाव, ईडब्ल्यूएसचे पुरुष उमेदवारांसाठी). अजा/ अज/ महिला/ माजी सैनिक यांना अर्जाचे शुल्क माफ आहे. ऑनलाईन अर्ज https:// recruitment. itbpolice. nic. in या संकेतस्थळावर दि. १८ ऑगस्ट २०२४ (२३.५९ वाजे) पर्यंत करावेत.