सुहास पाटील
रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड्स (RRBs) (रेल्वे मंत्रालय, भारत सरकार), देशभरातील २१ रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड्समध्ये पॅरा मेडिकलच्या विविध पदांवर भरती. एकूण रिक्त पदे – १,३७६. आरआरबी निहाय आणि रेल्वे झोननुसार रिक्त पदांचा तपशिल सेंट्रलाईज्ड एम्प्लॉयमेंट नोटीस (CEN) No. ०४/२०२४ च्या Annexure- B मध्ये दिलेला आहे. RRB मुंबई अंतर्गत एकूण रिक्त पदे – २३६ (RRB अहमदाबादमध्ये एकूण ५१ रिक्त पदे).

(१) नर्सिंग सुपरिटेंडंट – एकूण १३३ पदे. सेंट्रल रेल्वे (CR) – ८४

पश्चिम रेल्वे (WR) – ४९ (RRB अहमदाबाद – २० पदे).

पात्रता : GNM किंवा B.Sc. (Nursing) किंवा ANM मिडवाईव्हज् आणि बी ग्रेड नर्स.

(२) फार्मासिस्ट (एन्ट्री ग्रेड) – एकूण ३१ पदे. सेंट्रल रेल्वे (CR) – २३

पश्चिम रेल्वे (WR) – ८ (RRB अहमदाबादसाठी १८ पदे).

पात्रता : १२ वी आणि फार्मसी डिप्लोमा किंवा डिग्री.

(३) लॅबोरेटरी सुपरिटेंडंट – सेंट्रल रेल्वे (CR) – ११ .

पात्रता : B. Sc. (बायो केमिस्ट्री/ मायक्रोबायोलॉजी/ लाईफ सायन्स/ केमिस्ट्री अँड बायोलॉजी) आणि DMLT किंवा B.Sc. (मेडिकल टेक्नॉलॉजी (लॅबोरेटरी)).

(४) हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टर ग्रेड- III – एकूण २० पदे. सेंट्रल रेल्वे (CR) – १६ (अजा – ३, अज – १, इमाव – ४, ईडब्ल्यूएस – १, खुला – ७) (१ पद दिव्यांग कॅटेगरी VI साठी आणि २ पदे माजी सैनिकांसाठी राखीव).

पश्चिम रेल्वे (WR) – ४ (अजा – १, इमाव – १, ईडब्ल्यूएस – १, खुला – १) (RRB अहमदाबाद – ११ पदे).

पद क्र. ४ व १० साठी पात्रता : १२ वी/ पदवी विज्ञान शाखेतील आणि इसीजी लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी/ कार्डिऑलॉजी/ कार्डिऑलॉजी टेक्निशियन विषयातील सर्टिफिकेट/ पदविका/ पदवी. यूसीजी मान्यताप्राप्त संस्थेकडील दूरस्थ अभ्यासक्रमाने अशी पदवी/ पदविका मिळविणारे अर्ज करण्यास पात्र आहेत.

(५) डायलिसिस टेक्निशियन – एकूण ७ पदे. सेंट्रल रेल्वे (CR) (अजा – १, इमाव – २, ईडब्ल्यूएस – १, खुला – ३).

पात्रता : B. Sc. आणि हिमोडायालिसिस डिप्लोमा किंवा हिमोडायलिसिस कामाचा किमान २ वर्षांचा अनुभव किंवा इन हाऊस ट्रेनिंग.

(६) क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट – एकूण ५ पदे. सेंट्रल रेल्वे (CR) (खुला).

पात्रता : क्लिनिकल सायकॉलॉजी/ सोशल सायकॉलॉजीमधील पदव्युत्तर पदवी.

(७) लॅबोरेटरी असिस्टंट ग्रेड- II – एकूण ६ पदे. सेंट्रल रेल्वे (CR – ३) (इमाव – १, खुला – २). पश्चिम रेल्वे (WR) – ३ (अज – १, खुला – २).

पात्रता : १२ वी विज्ञान आणि DMLT किंवा १ वर्ष कालावधीचा DMLT सर्टिफिकेट कोर्स.

(८) रेडिओग्राफर एक्स-रे टेक्निशियन – एकूण १० पदे. सेंट्रल रेल्वे (CR) – ६

पश्चिम रेल्वे (WR) – ४ (RRB अहमदाबाद – १ पद).

पात्रता : १२ वी (फिजिक्स आणि केमिस्ट्री विषयांसह) किंवा बी.एससी. आणि रेडिओग्राफी/एक्स-रे टेक्निशियन/ रेडिओडायग्नोसिस टेक्नॉलॉजीमधील डिप्लोमा.

(९) फिल्ड वर्कर – एकूण ४ पदे. सेंट्रल रेल्वे (CR) – १ (खुला). पश्चिम रेल्वे (WR) – ३.

पात्रता : १२ वी (विज्ञान – बायोलॉजी किंवा केमिस्ट्री विषयांसह).

(१०) ईसीजी टेक्निशियन – एकूण २ पदे. सेंट्रल रेल्वे (CR) (RRB अहमदाबाद WR – १ पद).

(११) कॅथ लॅबोरेटरी टेक्निशियन – एकूण २ पदे. पश्चिम रेल्वे (WR).

पात्रता : B.Sc. आणि कार्डिअॅक प्रोफेशनल कॅथ लॅब वर्क डिप्लोमा किंवा संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव.

(१२) डेंटल हायजिनिस्ट – एकूण २ पदे. सेंट्रल रेल्वे (CR) – १ (खुला). पश्चिम रेल्वे (WR) – १ पद (खुला).

पात्रता : बी.एससी. (बायोलॉजी) आणि २ वर्षं कालावधीचा डेंटल हायजिन डिप्लोमा आणि डेंटल हायजिनिस्ट रजिस्ट्रेशन आणि डेंटल हायजिनिस्ट कामाचा २ वर्षांचा अनुभव.

(१३) ऑक्युपेशनल थेरपिस्ट – एकूण १ पद. पश्चिम रेल्वे (WR) – १ (खुला).

पात्रता : १२ वी विज्ञान आणि ऑक्युपेशनल थेरपी पदविका/पदवी.

(१४) ऑप्टोमेट्रिस्ट – एकूण १ पद. सेंट्रल रेल्वे (CR) – १ (खुला).

पात्रता : B. Sc. (Optometry) किंवा किमान ३ वर्षं कालावधीचा ऑप्थॅलमिक टेक्निशियन डिप्लोमा.

(१५) फिजिओथेरापिस्ट ग्रेड- II – एकूण १ पद. पश्चिम रेल्वे (WR) – १ (खुला).

पात्रता : फिजिओथेरपीमधील पदवी आणि २ वर्षांचा संबंधित कामाचा अनुभव.

वयोमर्यादा : (दि. १ जानेवारी २०२५ रोजी) पद क्र. ३, ४, ६, ७, १० ते १५ साठी १८ ते ३६ वर्षे.

पद क्र. १ साठी २० ते ४३ वर्षे; पद क्र. २ साठी २० ते ३८ वर्षे; पद क्र. ५ साठी २० ते ३६ वर्षे; पद क्र. ८ साठी १९३६ वर्षे. पद क्र. ९ साठी १८ ते ३३ वर्षे (सर्व पदांसाठी कमाल वयोमर्यादेज सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/ अज – ५ वर्षे, विधवा/ घटस्फोटीत/ कायद्याने विभक्त पुनर्विवाह न केलेल्या महिला – खुला – ३५/ इमाव – ३८/ अजा/ अज – ४० वर्षे; दिव्यांग – १०/ १३/ १५ वर्षे).

वेतन श्रेणी : पद क्र. १ पे-लेव्हल – ७ मूळ वेतन रु. ४४,९००, अंदाजे वेतन दरमहा रु. ८४,८००/-.

पद क्र. २ व ८ पे-लेव्हल – ५ मूळ वेतन रु. २५,५०० अंदाजे वेतन दरमहा रु. ५७,०००/-.

पद क्र. ३ ते ६, ११ ते १३ व १५ पे-लेव्हल – ६ मूळ वेतन रु. ३५,४००, अंदाजे वेतन दरमहा रु. ६८,०००/-.

पद क्र. ७ पे-लेव्हल – ३ मूळ वेतन रु. २१,७०० अंदाजे वेतन दरमहा रु. ४३,८००/-.

पद क्र. ९ पे-लेव्हल – २ मूळ वेतन रु. १९,९००, अंदाजे वेतन दरमहा रु. ३७,०००/-.

पद क्र. १० व १४ पे-लेव्हल – ४ मूळ वेतन रु. २९,२०० अंदाजे वेतन दरमहा रु. ५५०००/-.

निवड पद्धती : स्टेज-१ – कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (ण्ँऊ), कागदपत्र पडताळणी आणि वैद्याकीय तपासणी.

परीक्षेचे माध्यम – CBT मधील प्रश्न इंग्रजीसोबत १३ रिजनल लँग्वेजेस (जसे की मराठी, गुजराती, कोंकणी इ.) मध्ये दिले जातील. उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करताना १३ रिजनल लँग्वेजेसपैकी एक भाषा निवडायची आहे.

उमेदवारांना परीक्षा केंद्राच्या शहराचे नाव परीक्षेपूर्वी १० दिवस अगोदर कळविले जाईल. ई-कॉल लेटर CBT परीक्षा दिनांकाच्या ४ दिवस अगोदर RRB वेबसाईटवर उपलब्ध करून दिले जाईल. त्यांना तसे ई-मेल आणि SMS द्वारे कळविले जाईल.

स्टेज-१ सीबीटी (सर्व पदांसाठी कॉमन टेस्ट) कालावधी – ९० मिनिटे. एकुण १०० गुण/१०० प्रश्न (वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे) ((१) प्रोफेरशनल अॅबिलिटी टेस्ट – ७० प्रश्न, (२) जनरल अवेअरनेस – १० प्रश्न, (३) जनरल अॅरिथमॅटिक/जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग – १० प्रश्न, (४) जनरल सायन्स – १० प्रश्न).

चुकीच्या उत्तरासाठी प्रश्नास असलेल्या गुणांच्या १/३ गुण वजा केले जातील.

परीक्षा शुल्क : (१) रु. ५००/- (जे उमेदवार स्टेज-१ सीबीटीला बसतील, त्यांना रु. ४००/- बँकिंग चार्जेस वगळता परत केले जातील.) (२) अजा/अज/ माजी सैनिक/ दिव्यांग/ महिला/ ट्रान्सजेंडर/ अल्पसंख्यांक/ आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग (ईबीटी) यांना रु. २५०/- (जे उमेदवार स्टेज-१ सीबीटीला बसतील त्यांना रु. २५०/- बँकींग चार्जेस वगळता परत केले जातील.) भरलेल्या परीक्षा शुल्काचा परतावा मिळविण्यासाठी उमेदवारांनी ऑनलाइन अर्जात आपल्या बँकेचे नाव, खातेधारकाचे नाव, खाते क्रमांक आणि IFSC कोड भरावयाचे आहे.

एकापेक्षा अधिक RRBs मध्ये अर्ज केल्यास सर्व अर्ज बाद ठरविले जातील. निवडलेल्या RRB मधील रिक्त पदांसाठी उमेदवारांनी आपला पसंतीक्रम ऑनलाईन अर्जात नोंदणे आवश्यक.

अर्जात काही बदल/ सुधारणा करावयाची असेल तर आवश्यक ती मॉडिफिकेशन फी भरून ‘Modification Window for Correction’ दि. १७ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर २०२४ पर्यंत उपलब्ध असेल. (ऑनलाइन अर्ज करताना create an Account मध्ये भरलेली माहिती आणि (Chosen RRB) मध्ये बदल करता येणार नाही.)

ऑनलाइन अर्ज करताना उमेदवारांना ‘Create an Account’ असे सूचित केले जाईल, तर उमेदवारांनी २०२४ मध्ये जाहीर झालेल्या CENs नुसार ‘Account Create’ केलेले असेल तर त्यांना तीच Credintials लॉगइन करताना वापरता येतील.

शंकासमाधानासाठी हेल्पलाईन फोन नं. ९५९२००११८८, ०१७२५६५३३३३; ई-मेल – rrb. help@csc.gov.in

ऑनलाइन अर्जासोबत उमेदवाराचा साधी पांढरी पार्श्वभूमीवर काढलेला पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटोग्राफ आणि उमेदवाराची सही (JPEG image size ३०-७० KB), अपलोड करणे आवश्यक. उमेदवाराकडे पुढील भरती प्रक्रियेवेळी ऑनलाइन अर्जासोबत अपलोड केलेल्या फोटोग्राफच्या १२ प्रती असणे आवश्यक.

अजा/ अजच्या उमेदवारांना ई-कॉल लेटर सोबत मोफत रेल्वे प्रवास पास मिळविण्यासाठी ऑनलाइन अर्जासोबत अजा/ अज सर्टिफिकेट (Pdf format upto ५०० KB) अपलोड करणे आवश्यक.

उमेदवार ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी देशभरातील कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) ची मदत घेवू शकतात. CSC ची यादी http://www.csc.gov.in या वेबसाईटवर (https://findmycsc.nic.in/csc/) या लिंकवर उपलब्ध आहे.

उमेदवारांनी आपल्या पसंतीचे आरआरबी मंडळ निवडून त्या मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज दि. १६ सप्टेंबर २०२४ (२३.५९ वाजे) पर्यंत करावा. उदा. आरआरबी, मुंबई – http://www.rrbmumbai.gov.in; आरआरबी, अहमदाबाद – http://www.rrbahmedabad.gov.in.