सुहास पाटील
एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AI Airport Services Limited) (AIASL) (पूर्वीची एअर इंडिया ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड) (AiATSL) – पुणे इंटरनॅशनल एअरपोर्टसाठी पुढील ग्राऊंड ड्युटी पदांची भरती. (उमेदवारांना नेमून दिलेल्या दिवशी वॉक-इन भरतीसाठी सकाळी ०९.३० ते १२.३० पर्यंत हजर रहावे.) एकूण रिक्त पदे पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट – २४७. ( Ref. No. AIASL/०५-०३/ HR/१३० dt. २८.०३.२०२४)

(१) कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह – ४७ पदे. एकत्रित वेतन – दरमहा रु. २७,४५०/-.

sarfaesi act
सरफेसी कायदा आणि गैरवापर
Tata Institute of Social Sciences Mumbai has announced recruitment notification for the vacant posts For non teaching post
TISS Mumbai Bharti 2024: मुंबईत नोकरीची संधी! टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरु; लगेच करा अर्ज
LG introduced first set of AI-powered smart series in India includes the world largest 97 OLED smart TV
आता LG स्मार्ट टीव्हीत चालणार AI ची जादू ; ‘या’ भन्नाट फीचर्ससह जाणून घ्या लेटेस्ट मॉडेल्सची किंमत
CSK fans teach dance steps to cheer girls
VIDEO : CSK च्या चाहत्यांनी भर स्टेडियममध्ये शिकवला चीअर गर्ल्सना डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल
Home Credit India is owned by TVS Holdings
टीव्हीएस होल्डिंग्जकडे ‘होम क्रेडिट इंडिया’ची मालकी
aircraft selling fraud marathi news, netherland aircraft selling fraud marathi news
विमान विक्रीच्या नावाखाली नेदरलॅन्डच्या कंपनीची साडे चार कोटींची फसवणूक, कंपनीच्या संचालकाला अटक
vacancies in railway protection force
नोकरीची संधी : ‘आरपीएफ’मधील भरती
Professor Dhirendra Pal Singh, Dhirendra Pal Singh Appointed as Chancellor of tis, Tata Institute of Social Sciences, tis Mumbai, tis new Chancellor, tis news, Mumbai news,
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या कुलपतीपदी धीरेंद्र पाल सिंग

पात्रता – (दि. १ एप्रिल २०२४ रोजी) पदवी (१० २ ३ पॅटर्न) आणि एअरलाईन/ GHA/ Cargo/ Airline Ticketing मधील अनुभव किंवा एअरलाईन डिप्लोमा किंवा IATA- UFTAA/ IATA- FIATA/ IATA- DGR/ IATA- CARGO डिप्लोमा. संगणकावरील कौशल्य आवश्यक. हिंदी/इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व (लिहिणे/बोलणे).

(२) रँप सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह – १२ पदे. एकत्रित वेतन – दरमहा रु. २७,४५०/-.

पात्रता – मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ प्रोडक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स/ ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग डिप्लोमा किंवा (हिंदी/ इंग्रजी/ स्थानिय भाषा या विषयांसह) १० वी उत्तीर्ण आणि मोटर वेहिकल ऑटो इलेक्ट्रिकल/ एअर कंडिशनिंग/ डिझेल मेकॅनिक/ बेंच फिटर/ वेल्डर ट्रेडमधील आयटीआय आणि NCTVT सर्टिफिकेट (एकूण ३ वर्षं कालावधी) आणि HMV ड्रायव्हिंग लायसन्स (ट्रेड टेस्टच्या वेळी सादर करणे.)

(३) युटिलिटी एजंट कम रँप ड्रायव्हर – १७ पदे. एकत्रित वेतन – दरमहा रु. २४,९६०/-

पात्रता – १० वी उत्तीर्ण (इक्विपमेंट ऑपरेटींग परमिट (EOP) असल्यास प्राधान्य). (ट्रेड टेस्टसाठी येताना HMV ड्रायव्हिंग लायसन्स घेऊन येणे आवश्यक.)

(४) ज्युनियर ऑफिसर – टेक्निकल – ७ पदे. एकत्रित वेतन – दरमहा रु. २९,७६०/-

पात्रता – बी.ई. (मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल/ प्रोडक्शन/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग)

उमेदवाराकडे हलके वाहन (LMV) चालविण्याचा परवाना असणे आवश्यक. निवड झाल्यास हजर झाल्या दिवसापासून १२ महिन्यांच्या आत अवजड वाहन (HMV) ड्रायव्हिंग लायसन्स मिळविणे आवश्यक. (Aviation experience किंवा जीएस इक्विपमेंट्स/ वेहिकल/ हेवी अर्थ मुव्हर्स इक्विपमेंट मेंटेनन्समधील अनुभव असल्यास प्राधान्य.)

(५) हँडी मॅन – ११९ पदे. (६) हँडी वुमन – ३० पदे.

पात्रता – १० वी उत्तीर्ण (इंग्रजी भाषा वाचता येणे आणि समजणे आवश्यक). एकत्रित वेतन – दरमहा रु. २२,५३०/-.

वरील सर्व पदांची भरती करार पद्धतीने ३ वर्षांच्या मुदतीसाठी (Fixed Term Contract) केली जाईल. प्रतीक्षा यादीसुद्धा बनविली जाईल. उमेदवारांची कामगिरी पाहून कराराचा कालावधी वाढविला जावू शकतो.

पुणे इंटरनॅशनल एअरपोर्टमधील पदांसाठी वॉक-इनसाठीचे ठिकाण – पुणे इंटरनॅशनल स्कूल, सर्व्हे नं. ३३, लेन नं. १४, टिंगरे नगर, पुणे – ४११ ०३२.

वयोमर्यादा – (दि. १ एप्रिल २०२४ रोजी) पद क्र. १ ते ६ पदांसाठी २८ वर्षे.

वयोमर्यादेत सूट इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे).

निवड पद्धती – पद क्र. २ व ३ साठी (अ) ट्रेड टेस्ट (ट्रेड नॉलेज आणि HMV ड्रायव्हिंग टेस्ट), (ब) इंटरह्यू.

पद क्र. १ (कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह), (अ) पर्सोनल/ Virtual इंटरह्यू आणि /किंवा (ब) ग्रुप डिस्कशन.

पद क्र. ५ व ६ साठी शारीरिक क्षमता चाचणी (PET) (जसे की वजन उचलणे, धावणे) आणि पर्सोनल/व्हर्च्युअल इंटरह्यू.

निवड प्रक्रिया – एकाच दिवशी किंवा पुढील दिवशी घेतली जाईल.

अर्जाचे शुल्क – रु. ५००/-. (डिमांड ड्राफ्ट ‘ AI Airport Services Limited’ यांचे नावे मुंबई येथे देय असावा.) (अजा/ अज/ माजी सैनिक यांना फी माफ आहे.) (डिमांड ड्राफ्टच्या मागे उमेदवाराने आपले पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर लिहावा.)

रंगीत पासपोर्ट आकाराचा फोटो अर्जावर चिकटवावा. (फोटो ३ महिन्यांपूर्वी काढलेला नसावा.)

अर्जाचा विहीत नमुना www. aiasl. in या संकेतस्थळावरील जाहिरातीमध्ये उपलब्ध आहे.

वॉक-इन-सिलेक्शन दि. १५/१६/१८ एप्रिल २०२४ – पद क्र. (१) कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह – ४७ पदे, पद क्र. ४ ज्युनियर ऑफिसर टेक्निकल – ७ पदे, पद क्र. ७ डेप्युटी टर्मिनल मॅनेजर – २ पदे, पद क्र. ८ ड्युटी ऑफिसर पॅसेंजर – ६ पदे, पद क्र. ९ डेप्युटी ऑफिसर – ७ पदे.

वॉक-इन-सिलेक्शन दि. १७/१८ एप्रिल २०२४ – (२) रँप सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह – १२ पदे आणि पद क्र. (३) युटिलिटी एजंट कम रँप ड्रायव्हर – १७ पदे.

वॉक-इन-सिलेक्शन दि. १९/२० एप्रिल २०२४ – पद क्र. ५ हँडी मॅन – ११९ पदे व पद क्र. ६ हँडी वुमन – ३० पदे.

पात्र उमेदवारांनी वर नमूद केलेल्या वॉक-इन दिनांकास सकाळी ९.३० ते १२.३० वाजे दरम्यान विहीत नमुन्यातील पूर्ण भरलेल्या अर्जासोबत इतर मूळ कागदपत्रे व स्वयंसाक्षांकीत प्रती घेवून उपस्थित रहावे. अर्जासोबत जोडावयाच्या कागदपत्रांची यादी वेबसाईटवरील जाहिरातीमधील पान क्र. १८ वर दिलेली आहे.

आणि इतर सारी पदे जेथे ०९/१२/१५ वर्षे अनुभव आवश्यक आहे जसे की (७) डेप्युटी टर्मिनल मॅनेजर – २ पदे, (८) ड्युटी ऑफिसर पॅसेंजर – ६ पदे, (९) ड्युटी ऑफिसर – ७ पदे माहिती AIASL च्या वेबसाईटवरील जाहिरातीमध्ये उपलब्ध आहे.