विश्वेसराय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (VNIT), नागपूर (शिक्षण मंत्रालय, भारत सरकार) पुढील एकूण ४५ गैरशैक्षणिक पदांची थेट भरती. (१) ऑफिस अटेंडंट/लॅब अटेंडंट – ५ पदे (अजा – १, इमाव – २, खुला – २).

पात्रता – ऑफिस अटेंडंट – १२ वी उत्तीर्ण. लॅब अटेंडंट – १२ वी (विज्ञान) उत्तीर्ण.

(२) टेक्निशियन – १० पदे. इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रूमेंटेशन आणि अलाईड स्ट्रीम – ५ पदे (अजा – १, इमाव – १, ईडब्ल्यूएस – १, खुला – २). मेकॅनिकल /केमिकल आणि अलाईड स्ट्रीम – ५ पदे (अजा – १, अज – १, इमाव – १, खुला – २). (१ पद अपंग कॅटेगरी CP/LC/DW/AAV साठी राखीव)

(३) सिनियर टेक्निशियन – ३ पदे (इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रूमेंटेशन आणि अलाईड स्ट्रीम्स) (अजा – १, खुला – १). मेकॅनिकल अँड केमिकल स्ट्रीम – १ (ईडब्ल्यूएस).

पद क्र. २ व ३ साठी पात्रता – १२ वी (विज्ञान) किमान ६०टक्के गुण किंवा १२ वी किमान ५०टक्के गुण आणि किमान १ वर्ष कालावधीचा आयटीआय सर्टिफिकेट किंवा १० वी किमान ६०टक्के गुण आणि किमान २ वर्षं कालावधीचा आयटीआय सर्टिफिकेट किंवा संबंधित इंजिनीअरिंग डिप्लोमा. इष्ट पात्रता – पदवी.

(४) ज्युनियर असिस्टंट – ३ पदे (इमाव – १, खुला – २). (५) सिनियर असिस्टंट – २ (खुला).

पद क्र. ४ व ५ साठी पात्रता – १२ वी उत्तीर्ण आणि किमान ३५ श.प्र.मि. वेगाचे टायपिंग आणि कॉम्प्युटर वर्ड प्रोसेसिंग आणि स्प्रेड शीट कामातील कौशल्य. इष्ट पात्रता – संगणकावरील इतर कौशल्य; स्टेनोग्राफी कौशल्य.

(६) टेक्निकल असिस्टंट – ८ (कॉम्प्युटर सायन्स/आयटी आणि अलाईड – इमाव – १, खुला – २; इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रूमेंटेशन अँड अलाईड – अजा – १, खुला – २; मेकॅनिकल/केमिकल अँड अलाईड – इमाव – १, खुला – १).

पात्रता – संबंधित विषयातील फर्स्ट क्लाससह बी.ई./बी.टेक./एमसीए किंवा संबंधित विषयातील फर्स्ट क्लाससह इंजिनीअरिंग डिप्लोमा किंवा बी.एससी. (फर्स्ट क्लास) किंवा एम.एससी. किमान ५५टक्के गुण.

(७) ज्युनियर इंजिनीअर (इलेक्ट्रिकल) १ (खुला). पात्रता – फर्स्ट क्लाससह इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग पदवी किंवा पदविका.

(८) लायब्ररी अँड इन्फॉरमेशन असिस्टंट – १ (अपंग कॅटेगरी B/LV साठी राखीव).

पात्रता – फर्स्ट क्लाससह आर्ट्स/ सायन्स / कॉमर्समधील पदवी आणि लायब्ररी अँड इन्फॉरमेशन सायन्समधील पदवी.

इष्ट पात्रता – लायब्ररी ऑटोमेशन अँड नेटवर्किंगमधील पीजी डिप्लोमा किंवा पीजीडीसीए किंवा समतूल्य.

(९) सुपरिटेंडंट – ५ (इमाव – १, खुला – ४).

पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी फर्स्ट क्लाससह उत्तीर्ण किंवा कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी ५०टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि संगणकाचे ज्ञान (वर्ड प्रोसेसिंग; स्प्रेड शीट)

(१०) एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर (सिव्हील इंजिनीअरिंग) १ (खुला). पात्रता – सिव्हील इंजिनीअरिंग पदवी फर्स्ट क्लाससह उत्तीर्ण.

(११) सायंटिफिक/टेक्निकल ऑफिसर – ३ (इमाव – १, खुला – २). (१२) सिनियर सायंटिफिक/टेक्निकल ऑफिसर – २ (खुला).

पद क्र. ११ व १२ साठी पात्रता – संबंधित क्षेत्रातील बी.ई./बी.टेक./एम.एससी. किंवा एमसीए फर्स्ट क्लाससह उत्तीर्ण.

(१३) लायब्ररियन – १ (खुला). पात्रता – लायब्ररी सायन्स/इन्फॉरमेशन सायन्स/डॉक्युमेंटेशनमधील पदव्युत्तर पदवी किमान ६०टक्के गुण.

वयोमर्यादा – पद क्र. १, २ व ४ २७ वर्षे; पद क्र. ३, ५ ३३ वर्षे; पद क्र. ६ ते ९ ३० वर्षे; पद क्र. १०, ११ ३५ वर्षे; पद क्र. १२ ५० वर्षे; पद क्र. १३ ५६ वर्षे.

वेतन श्रेणी – (अंदाजे वेतन) पद क्र. १ पे-लेव्हल – १ (३५,०००/-); पद क्र. २, ४ पे-लेव्हल – ३ (रु. ४५,०००/-); पद क्र. ३, ५ पे-लेव्हल – ४ (५२,०००/-); पद क्र. ६ ते ९ पे-लेव्हल – ६ (७०,०००/-); पद क्र. १० व ११ पे-लेव्हल – १० (१,१५,०००/-); पद क्र. १२ पे-लेव्हल – १२ (१,५५,०००/-); पद क्र. १३ पे-लेव्हल – १४ (२,३०,०००/-).

निवड पद्धती – स्टेज-१ ऑनलाइन वस्तुनिष्ठ चाचणी १०० प्रश्न, प्रत्येक प्रश्नास २ गुण, एकूण २०० गुण, वेळ २ तास. चुकीच्या उत्तरासाठी प्रत्येकी ०.५० गुण वजा केले जातील. (जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड, जनरल नॉलेज अँड कॉम्प्युटर अवेअरनेस, इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रिहेन्शन).

स्टेज-२ – पद क्र. १ वगळता इतर पदांसाठी स्किल टेस्ट/सब्जेक्टिव्ह टेस्ट.

अर्जाचे शुल्क – खुला / इमाव / ईडब्ल्यूएस – रु. २,३६०/- रु. १,०००/- (अनामत रक्कम) एकूण रु. ३,३६०/-.

अजा/अज/अपंग – रु. शून्य रु. १,०००/- (अनामत रक्कम).

लेखी परीक्षेस बसणाऱ्या उमेदवारांना अनामत रक्कम परत केली जाईल.

शंकासमाधानासाठी ई-मेल आयडी recruit@vnit.ac.in

ऑनलाइन अर्ज https://vnit.ac.in/recruitment या संकेतस्थळावर १ मार्च २०२६ पर्यंत करावेत.