● इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ( ISRO), विक्रम साराभाई स्पेस सेंटर ( VSSC), तिरुअनंतपुरम्. अॅडव्हान्स्ड डेटा प्रोसेसिंग रिसर्च इन्स्टिट्यूट ( ADRIN), सिकंदराबाद, नॉर्थ ईस्टर्न स्पेस अॅप्लिकेशन्स सेंटर ( NESAC) युमिअॅम, मेघालय.

एकूण ८३ पदांची भरती.

( I) पदाचे नाव – टेक्निकल असिस्टंट ( Level-०७ (४४,९०० – १,४२,४००)) अंदाजे वेतन दरमहा रु. ७८,०००/-. (पदाच्या पुढे नोकरीचे ठिकाण कंसात दिले आहे.)

(१) इलेक्ट्रॉनिक्स – २७ पदे (व्हीएसएससी) (अजा – १, अज – १, इमाव – ९, ईडब्ल्यूएस – २, खुला – १४) (२ पदे दिव्यांग कॅटेगरी इ आणि ऊ साठी प्रत्येकी १ राखीव).

(२) मेकॅनिकल – २७ पदे (व्हीएसएससी) (अजा – २, इमाव – ६, ईडब्ल्यूएस् – ३, खुला – १६) (२ पदे दिव्यांग कॅटेगरी अ आणि उ साठी प्रत्येकी १ पद राखीव).

(३) कॉम्प्युटर सायन्स – ( i) ४ पदे (व्हीएसएससी) (ईडब्ल्यूएस- १, खुला – ३) (२ पदे दिव्यांग कॅटेगरी अ साठी राखीव).

( ii) ADRIN – ८ पदे (अजा – १, इमाव – २, खुला – ५).

(४) केमिकल – ६ पदे (व्हीएसएससी) (अजा – २, इमाव – २, ईडब्ल्यूएस – १, खुला – १).

(५) सिव्हील – १ पद (व्हीएसएससी) (खुला) आणि १ पद खुला ( ADRIN).

(६) रेफ्रिजरेशन अँड एसी – १ पद (इमाव) (व्हीएसएससी). (७) ऑटोमोबाईल – १ पद (व्हीएसएससी) (खुला).

पद क्र. १ ते ७ साठी पात्रता – संबंधित विषयातील इंजिनिअरींग डिप्लोमा प्रथम वर्गासह उत्तीर्ण. मेकॅनिकल डिसिप्लिनसाठी प्रोडक्शन डिप्लोमाधारक उमेदवारसुद्धा पात्र आहेत. इलेक्ट्रॉनिक्स डिसिप्लिनसाठी इलेक्ट्रॉनिक्स अँड अलाईड इंजिनिअरींग पात्रताधारक अर्ज करू शकतात.

( II) पदाचे नाव – सायंटिफिक असिस्टंट ( Level-०७ (४४,९०० – १,४२,४००)) अंदाजे वेतन दरमहा रु. ७८,०००/-.

(८) केमिस्ट्री – १ पद (व्हीएसएससी) (खुला). पात्रता – बीएससी (केमिस्ट्री) पदवी फर्स्ट क्लाससह उत्तीर्ण.

(९) फिजिक्स – १ पद (व्हीएसएससी) (खुला) आणि ३ पदे ( ADRIN) (अजा – १, खुला – २).

पात्रता – फर्स्ट क्लाससह बी.एससी. (फिजिक्स) पदवी.

(१०) लायब्ररी असिस्टंट-ए – १ पद ( NESAC) (खुला) आणि १ पद (व्हीएसएससी) (इमाव).

पात्रता – फर्स्ट क्लास मास्टर्स डिग्री इन लायब्ररी सायन्स/लायब्ररी इन्फॉरमेशन सायन्स.

अर्जाचे शुल्क – रु. ७५०/- (अजा/अज/दिव्यांग/महिला/माजी सैनिक यांना लेखी परीक्षेस बसल्यास रु. ७५०/- परत केले जातील. इतर उमेदवारांना रु. ५००/- परत केले जातील.)

( B) ( Advt. No. व्हीएसएससी-३३४ dtd. ३१.०५.२०२५). एकूण ६४ पदांची भरती. (नोकरीचे ठिकाण व्हीएसएससी)

( I) पदाचे नाव – टेक्निशियन-बी ( Level-०३ (२१,७०० – ९,१००)) अंदाजे वेतन दरमहा रु. ३७,०००/-.

(१) फिटर – २० पदे (अजा – ४, इमाव – ६, ईडब्ल्यूएस् – १, खुला – ९).

(२) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक – ११ पदे (अजा – १, इमाव – ४, ईडब्ल्यूएस – २, खुला – ४).

(३) इलेक्ट्रिशियन – ५ पदे (अज – १, इमाव – १, खुला – ३). (४) मशिनिस्ट – ५ पदे (अजा – १, इमाव – १, खुला – ३).

(५) मेकॅनिक रेफ्रिजरेटर अँड ए.सी. १ पद (इमाव – १). (६) टर्नर – ६ पदे (इमाव – ३, ईडब्ल्यूएस – १, खुला – २).

(७) फोटोग्राफी – १ पद (खुला). (८) मेकॅनिक मोटर वेहिकल/मेकॅनिक डिझेल – १ पद (खुला).

(९) इलेक्ट्रोप्लेटर – ३ पदे (अजा – १, ईडब्ल्यूएस – १, खुला – १).

(१०) वेल्डर – २ पदे (खुला). (११) कारपेंटर – १ (खुला).

( II) पदाचे नाव – ड्राफ्ट्समन-बी ( Level-०३ (२१,७०० – ६९,१००)) अंदाजे वेतन दरमहा रु. ३७,०००/-.

(१२) मेकॅनिकल – ७ पदे (अजा – १, इमाव – २, ईडब्ल्यूएस – १, खुला – ३).

पद क्र. १ ते १२ साठी पात्रता – १० वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमधील आयटीआय/ एनटीसी/एनएसी उत्तीर्ण.

(१३) फार्मासिस्ट-E – १ पद (खुला) ( Level-०५ (२९,२०० – ९२,३००)) अंदाजे वेतन दरमहा रु. ५०,०००/- प्रतीमाह.

पात्रता – फर्स्ट क्लास डिप्लोमा इन फार्मसी.

अर्जाचे शुल्क – रु. ५००/-. (महिला/अजा/अज/माजी सैनिक यांना लेखी परीक्षेस बसल्यास रु. ४००/- परत केले जातील.)

दोन्ही जाहिरातींसाठी वयोमर्यादा – (दि. १६ जून २०२५ रोजी) सर्व पदांसाठी १८ ते ३५ वर्षे. (इमाव – ३८ वर्षे, अजा/अज – ४० वर्षे) (रिक्त पदे ज्या कॅटेगरीसाठी राखीव तेथेच कमाल वयोमर्यादेत सूट मिळू शकते.)

निवड पद्धती – (१) लेखी परीक्षा, (२) स्किल टेस्ट.

लेखी परीक्षा ८० वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न वेळ ९० मिनिटे. प्रत्येक बरोबर उत्तराला १ गुण दिला जाईल. प्रत्येक चुकीच्या उत्तराला ०.३३ गुण वजा केले जातील.

परीक्षा केंद्र शहरे – मुंबई, पणजी, भोपाळ, बेंगलुरू इ. एकूण देशभरातील २५ शहरे.

शैक्षणिक अर्हता पात्रता परीक्षेच्या अभ्यासक्रमावर ( Curriculum based) प्रश्न विचारले जातील. १:५ प्रमाणात उमेदवार लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार स्किल टेस्टसाठी शॉर्टलिस्ट केले जातील. स्किल टेस्ट फक्त पात्रता स्वरूपाची असेल.

( B) ऑनलाइन अर्ज http:// www. vssc. gov. in या संकेतस्थळावर दि. १६ जून २०२५ (१७.०० वाजे)पर्यंत करावेत. ( Advt. No. VSSC/३३४ साठी)( A) ऑनलाइन अर्ज http:// www. vssc. gov. in या संकेतस्थळावर दि. १८ जून २०२५ पर्यंत करावेत. ( Advt. No. VSSC/३३५ साठी)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

suhaspatil237 @gmail. com