पंजाब नॅशनल बॅंकेत ‘लोकल बँक ऑफिसर (LBO)’ च्या एकूण ७५० पदांची भरती. (अजा – १०४, अज – ४९, इमाव – १९४, ईडब्ल्यूएस – ६७, खुला – ३३६) (अपंगांसाठी २३ पदे राखीव) राज्यनिहाय रिक्त पदांचा तपशील – (कंसात अनिवार्य स्थानिय भाषा)

महाराष्ट्र (मराठी) – १३५ पदे (अजा – २०, अज – १०, इमाव – ३६, ईडब्ल्यूएस – १३, खुला – ५६) (५ पदे अपंग कॅटेगरी OC – २, HI – १, VI – १, ID – १ साठी राखीव).

गुजरात (गुजराती) – ९५ पदे; कर्नाटक (कन्नडा) – ८५ पदे; तेलंगणा (तेलुगू) – ८८ पदे; तामिळनाडू (तामिळ) – ८५ पदे इ.

वेतन श्रेणी – ग्रेड/स्केल – JMGS-I (रु. ४८,४८० – ८५,९२०).

पात्रता – ( २३ नोव्हेंबर २०२५ रोजी) कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण.

अनुभव – शेड्यूल कमर्शियल बँक किंवा रिजनल रुरल बँकेमधील क्लेरिकल/ऑफिसर पदांवरील संबंधित कामाचा किमान १ वर्षाचा अनुभव असणे अनिवार्य आहे.

उमेदवारांनी ज्या राज्यातील पदांसाठी अर्ज केला आहे, त्यांना त्या राज्याची अधिकृत स्थानिय भाषा अवगत असावी.

वयोमर्यादा – (१ जुलै २०२५ रोजी) २०-३० वर्षे. (कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे, अपंग – १० वर्षे)

निवड पद्धती – (I) पात्र उमेदवारांनी ऑनलाइन लेखी परीक्षा द्यावी लागेल. ज्यात रिझनिंग अँड कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड – २५ प्रश्न, वेळ ३५ मिनिटे; डेटा ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन – २५ प्रश्न, वेळ ३५ मिनिटे; इंग्लिश लँग्वेज – २५ प्रश्न, वेळ २५ मिनिटे; क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड – २५ प्रश्न, वेळ ३५ मिनिटे; जनरल/इकॉनॉमी/बँकींग अवेअरनेस – ५० प्रश्न, वेळ ५० मिनिटे. एकूण १५० प्रश्न, १५० गुण, वेळ १८० मिनिटे. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी प्रश्नास असलेल्या गुणांच्या १/४ गुण वजा केले जातील. ऑनलाइन परीक्षेत किमान ४०टक्के गुण (खुला/ईडब्ल्यूएससाठी); ३५टक्के गुण (राखीव पदांसाठी) मिळविणे आवश्यक.

(II) ऑनलाइन टेस्टमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलाविले जाईल.

(III) लोकल लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट (LLPT) – ज्या उमेदवारांनी राज्याची स्थानिय भाषा १० वी किंवा १२ वीला अभ्यासलेली नाही, त्यांना लोकल लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट द्यावी लागेल.

(IV) इंटरव्ह्यू – ५० गुणांच्या इंटरव्ह्यूमध्ये पात्रतेसाठी अजा/अजसाठी किमान २२.५० गुण व इतरांसाठी २५ गुण मिळविणे आवश्यक.

LLPT उत्तीर्ण करणाऱया उमेदवारांच्या ऑनलाइन टेस्ट व इंटरव्ह्यूमधील गुण एकत्रित करून राज्यनिहाय निवड यादी बनविली जाईल. निवडलेल्या उमेदवारांना २ वर्षांचा प्रोबेशन कालावधी पूर्ण करावा लागेल.

परीक्षा केंद्र – मुंबई/नवी मुंबई/ठाणे/MMR, नागपूर, नाशिक, पुणे, कोल्हापूर, छ. संभाजीनगर, जळगाव, सातारा, सांगली.

ऑनलाइन परीक्षा/LLPT/इंटरव्ह्यूसाठीचे कॉल लेटर आणि माहितीपत्रक बँकेच्या https://pnb.bank.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जातील.

अर्जाचे शुल्क – अजा/अज/अपंग – रु. ५०/- जीएसटी रु. ९/- एकूण रु. ५९/-. (फक्त पोस्टेज चार्जेस) इतर उमेदवारांसाठी रु. १,०००/- जीएसटी रु. १८०/- एकूण रु. १,१८०/-.

ऑनलाइन अर्ज https://pnb.bank.in/ या संकेतस्थळावर दि. २३ नोव्हेंबर २०२५ पर्यंत करावेत.