महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा २०२४ करिता दि. २९ डिसेंबर २०२३ रोजी विविध संवर्गांच्या एकूण २७४ रिक्त पदांकरिता जाहिरात क्र. ४१४/२०२३ प्रसिद्ध करण्यात आली होती. सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षित पदसंख्या नमूद करून एकूण ५२४ पदांचे शुद्धिपत्रक दि. ८ मे २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते. तद्नंतर महाराष्ट्र कृषिसेवा २०२४ करिता २५८ पदांचा समावेश महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ मध्ये दि. २६ सप्टेंबर २०२४ रोजीच्या शुद्धिपत्रकानुसार करण्यात आला आहे. संयुक्त पूर्वपरीक्षेतून पुढील विभागांमधील एकूण ७८२ रिक्त पदे भरली जाणार आहेत.

(I) सामान्य प्रशासन विभाग – राज्यसेवा गट-अ व गट-ब – एकूण ४३१ पदे.

Thane Municipal Employees, Diwali, Thane Municipal Employees Salary, Thane,
ठाणे पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, सानुग्रह अनुदानापाठोपाठ वेतन दिवळीआधी जमा होणार
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
NFL Recruitment 2024 National Fertilizers Limited Recruitment 2024
NFL Recruitment 2024: नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी नो टेन्शन; ‘नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड’मध्ये ३४९ जागांसाठी भरती
india post payments bank recruitment to the post of executive for 344 vacancies on contractual basis
नोकरीची संधी : ग्रामीण डाक सेवकांसाठी ‘एक्झिक्युटिव्ह’ पदाची भरती
PGCIL Trainee Recruitment 2024 Applications begin for 795 posts link to register here
PGCIL Trainee Recruitment 2024: ७९५ पदांसाठी होणार भरती, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया आणि शेवटची तारीख
unified pension scheme
Money Mantra: युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजे काय? याचा फायदा कोणाला मिळणार आहे?
ONGC Bharti 2024
ONGC Bharti 2024 : १०वी पास विद्यार्थ्यांना नोकरीची संधी! ONGC अंतर्गत २२३६ पदांची भरती सुरू; जाणून घ्या, किती मिळणार पगार ?
Indel Money launches Rs 150 crore NCD
इंडेल मनी रोखे विक्रीतून १५० कोटी उभारणार; ६६ महिन्यांत गुंतवणुकीवर दुपटीने लाभ

(II) महसूल व वन विभाग – महाराष्ट्र वनसेवा गट-ब – एकूण ४८ पदे.

(III) मृद व जलसंधारण विभाग – महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट-अ व गट-ब – एकूण ४५ पदे.

(IV) कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग – महाराष्ट्र कृषिसेवा – एकूण २५८ पदे.

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा २०२४ मधून महाराष्ट्र कृषी सेवेच्या भरावयाच्या एकूण २५८ पदांचा तपशील –

संयुक्त पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरणाऱया एकूण ७८२ पदांच्या भरतीकरिता स्वतंत्र मुख्य परीक्षा घेण्यात येतील. मुख्य परीक्षेचा दिनांक नंतर जाहीर करण्यात येईल.

(१) उपसंचालक, कृषी गट-अ – एकूण ४८ पदे (अजा – ५, अज – ३, विजा-अ – ३, भज-ब – २, भज-क – ३, भज-ड – १, इमाव – ६, सा व शै.मा.व. – ५, आदुघ – ५, खुला – १५) आरक्षित पदे – महिला – १४, खेळाडू – १, दिव्यांग – २ (कॅटेगरी B/ LV, D/ HH प्रत्येकी १).

(२) तालुका कृषी अधिकारी/तंत्र अधिकारी गट-ब – एकूण ५३ पदे (अजा – ७, अज – ७, भज-ब – १, भज-क – २, भज-ड – ५, इमाव – १५, विमाप्र – ३, सा. व शै.मा.व. – ५, आदुघ – ५, खुला – ३) (आरक्षित पदे – महिला – १५, खेळाडू – १, दिव्यांग – २ (कॅटेगरी – B/ LV, D/ HH प्रत्येकी – १), अनाथ – १).

(३) कृषी अधिकारी, कनिष्ठ व इतर गट-ब – एकूण १५७ पदे (अजा – २, अज – ३, विजा-अ – २, भज-क – ७, भज-ड – ५, इमाव – ६५, विमाप्र – ३, सा. व शै.मा.व. – १६, आदुघ – १६, खुला – ३८) (आरक्षित पदे – महिला – ४७, खेळाडू – ७, दिव्यांग – ६ (कॅटेगरी B/ LV – २, D/ HH – २, CP/ LV – १, MD – १), अनाथ – २).

पात्रता : बी.एससी. (कृषी)/ बी.टेक. (कृषी अभियांत्रिकी)/ बी.एससी. (कृषी जैव तंत्रज्ञान)/ बी.एससी. (कृषी व्यवसाय व्यवस्थापन)/ बी.एससी. (गृहविज्ञान)/ बी.टेक. (अन्नतंत्र)/ बी.एससी. (उद्यानविद्या)/ बी.एफ.एससी./ बी.एससी. (ऑनर्स) सामाजिक विज्ञान/ बी.एससी. (वनविद्या)/ बी.एससी. (एबीएम)/ बी.बी.एम. (कृषी)/ बी.बी.ए. (कृषी) पदवी.

पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेस बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र आहेत. (त्यांना मुख्य परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी नेमून दिलेल्या शेवटच्या दिवसापर्यंत पदवी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.)

वयोमर्यादा : कृषि सेवेकरिता (दि. १ एप्रिल २०२४ रोजी) खुला – ४० वर्षे, मागासवर्गीय/ आदुघ/ अनाथ/ खेळाडू/ माजी सैनिक – ४५ वर्षे, दिव्यांग – ४७ वर्षे.

निवड प्रक्रिया : संयुक्त पूर्व परीक्षा व स्वतंत्र मुख्य परीक्षा आणि मुलाखत.

सर्व संवर्गातील पदांसाठी संयुक्त पूर्व परीक्षा ४०० गुणांसाठी (पेपर-१ – अनिवार्य आणि पेपर-२ फक्त पात्रता स्वरूपाचा. प्रत्येक पेपर ऑब्जेक्टिव्ह टाईप २०० गुणांसाठी वेळ २ तास), स्वतंत्र मुख्य परीक्षा ४०० गुणांसाठी, मुलाखतीचे गुण – ५०.

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ मधील महाराष्ट्र कृषी सेवेकरिता नव्याने अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांना फक्त अमरावती, छत्रपती संभाजी नगर, नागपूर, नाशिक, मुंबई व पुणे जिल्हा केंद्रांवरील परीक्षा केंद्रांवर प्रवेश देण्यात येईल.

महाराष्ट्र नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२४ करिता यापूर्वी अर्ज सादर केलेला नाही, तथापि शैक्षणिक अर्हतेनुसार महाराष्ट्र कृषी सेवेकरिता पात्र आहेत, अशा उमेदवारांकडून महाराष्ट्र नागरी सेवा पूर्व परीक्षेकरिता नव्याने अर्ज करणाऱया अर्हताप्राप्त उमेदवारांना फक्त महाराष्ट्र कृषी सेवेकरिता अर्ज सादर करता येईल. अशा उमेदवारांनी ‘Online Application’ सदराखाली प्रस्तुत परीक्षेच्या जाहिरातीकरिता (जाहिरात क्र. ४१४/२०२३) उपलब्ध करून देण्यात आलेल्या ‘Check Eligibility’ बटणावर क्लिक करून अर्ज सादर करावा.

महाराष्ट्र नागरीसेवा राजपत्रित पूर्व परीक्षा २०२४ करिता यापूर्वी अर्ज सादर केलेल्या तसेच शैक्षणिक अर्हतेनुसार महाराष्ट्र कृषी सेवेकरितादेखील पात्र ठरतात, फक्त अशा अर्हताप्राप्त उमेदवारांकरिता महाराष्ट्र कृषी सेवेकरिता विकल्प सादर करता येईल.

अशा उमेदवारांनी आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीमधील उमेदवारांच्या प्रोफाईलमधील ‘My Account’ सदराखाली प्रस्तुत परीक्षेच्या जाहिरातीसमोर (जाहिरात क्र. ४१४/ २०२३) उपलब्ध करून देण्यात आलेल्या ‘View’ बटणावर व त्यानंतर ‘Check Eligibiltiy’ बटणावर क्लिक करून उजव्या बाजूकडील स्तंभामधील कृषी सेवेतील ज्या संवर्गाकरिता अर्ज करू इच्छितात त्यावर क्लिक करून ‘Apply a ‘ Submit’’ बटणावर क्लिक करावे. प्रस्तुत विकल्प सादर करणाऱया उमेदवारांना पुन्हा परीक्षा शुल्क भरण्याची आवश्यकता नाही.

परीक्षा शुल्क : अमागास – रु. ५४४/-; मागासवर्गीय/ आदुघ/ अनाथ/ दिव्यांग – रु. ३४४/-.

ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक १७ ऑक्टोबर २०२४ (२३.५९ वाजेपर्यंत).

भारतीय स्टेट बँकेत चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक १९ ऑक्टोबर २०२४ (२३.५९ वाजे)पर्यंत.

चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक २१ ऑक्टोबर २०२४ (बँकेच्या कार्यालयीन वेळेत).

परीक्षेसंबंधी विस्तृत माहिती https:// mpsc. gov. in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

संयुक्त पूर्व परीक्षेकरिता ऑनलाइन अर्ज विकल्प https:// mpsconline. gov. in या संकेतस्थळावर दि. १७ ऑक्टोबर २०२४ (२३.५९ वाजे) पर्यंत करावेत.