scorecardresearch

Premium

नोकरीची संधी

चाळणी परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षेचे माध्यम व इतर बाबी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

Job opportunity through maharashtra public service commission in government department
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातील तंत्र शिक्षण संचालनालय

सुहास पाटील

महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातील तंत्र शिक्षण संचालनालयांतर्गत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विविध विषयांतील सहायक प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा गट-अपदांची भरती करणार आहे. (जाहिरात क्र. ०४८/२०२३) एकूण रिक्त पदे – १४९. (अजा – ११, अज – २०, विजा-अ – १, भज-ब – ६, भज-क – ४, भज-ड – ८, विमाप्र – ३, आदुघ – १५, इमाव – १८, खुला – ६३) (६ पदे दिव्यांगांकरिता आरक्षित (D/ HH – १, OH/ CP/ DO etc – १)) भरावयाच्या पदांचा विषयनिहाय तपशील –

DNB Course Thergaon Hospital
पिंपरी : महापालिकेच्या नवीन थेरगाव, भोसरी रुग्णालयात ‘डीएनबी’ अभ्यासक्रम, राष्ट्रीय परीक्षा बोर्डाची मान्यता
National level selection
ठाण्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील संशोधनाची राष्ट्रीय पातळीवर निवड, शर्विन कार्व्हालो विद्यार्थ्यास संशोधनासाठी पाठ्यवृत्ती
Agriculture Department recruitment exam
नाशिक : कृषी विभागाच्या भरती परीक्षेत परीक्षार्थीकडे संशयास्पद साधने
Rajasthan Principal of Government Higher Secondary School Viral news
१२ वीच्या परीक्षेत चांगले गुण देतो सांगत मुख्याध्यापकाने विद्यार्थ्यांकडून करुन घेतली शेतीची कामे, प्रकरण उघडकीस येताच…

(१) स्थापत्य अभियांत्रिकी – ३६ पदे

(२) यंत्र अभियांत्रिकी – ८

(३) विद्युत अभियांत्रिकी – १८

(४) संगणक अभियांत्रिकी – २२

(५) अणुविद्युत व दूरसंचार अभियांत्रिकी – २१

(६) उपयोजित यंत्रशास्त्र – १

(७) पदार्थ विज्ञान – ७

(८) रसायन शास्त्र – ५

(९) गणित – ९

(१०) इंग्रजी – ८

(११) फूड टेक्नॉलॉजी व मॅनेजमेंट – २

(१२) कर्मशाळा अधीक्षक – ४

(१३) धातूशास्त्र – ४ (१४) एम.सी.ए. – २

पात्रता : (दि. २५ सप्टेंबर २०२३ रोजी) संबंधित विषयातील इंजिनीअरिंग पदवी आणि पदव्युत्तर पदवी किंवा समतूल्य पदवी फर्स्ट क्लाससह किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण.

हेही वाचा >>> UPSC-MPSC : भूस्खलन आणि हिमस्खलनाची नेमकी कारणे कोणती? भारतातील कोणत्या भागात सर्वाधिक घटना घडतात?

CGPA ग्रेड पॉईंट सिस्टीमवरील ८.२५, ७.७५, ७.२५, ६.७५ व ६.२५ अनुक्रमे ७५ टक्के, ७० टक्के, ६५ टक्के, ६० टक्के व ५५ टक्के गुण पकडले जातील.

वयोमर्यादा : दि. १ जानेवारी २०२४ रोजी खुलागट – १९ ते ४० वर्षे; मागासवर्गीय/आदुघ/अनाथ/खेळाडू – १८ ते ४५ वर्षे; दिव्यांग – ४७ वर्षे.

वेतन श्रेणी : १०: रु. ५७,७००/- (प्रारंभिक वेतन) अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते.

निवड पद्धती : सर्व पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेणे सोयीस्कर नसल्यास मुलाखतीसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक अर्हता आणि/अथवा अनुभव यापेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता/अनुभव किंवा अन्य योग्य निकष यांच्या आधारे किंवा चाळणी परीक्षेद्वारे मुलाखतीस पात्र उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यात येईल.

चाळणी परीक्षा घेण्याचे ठरल्यास अर्हता आणि/अथवा अनुभव शिथिल केला जाणार नाही. चाळणी परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षेचे माध्यम व इतर बाबी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

चाळणी परीक्षेत अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल.

हेही वाचा >>> UPSC-MPSC : संसदेत किती प्रकारचे नेते असतात? त्यांची कार्ये कोणती?

चाळणी परीक्षा घेतल्यास अंतिम निवडीसाठी चाळणी परीक्षेचे गुण आणि मुलाखतीचे गुण विचारात घेतले जातील. चाळणी परीक्षा न घेतल्यास फक्त मुलाखतीमधील गुणवत्तेच्या आधारित अंतिम निवड केली जाईल.

मुलाखतीमध्ये यांच्या एकूण गुणांपैकी किमान ४१ टक्के व त्यापेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या उमेदवारांची शिफारीश करण्यात येईल.

प्रस्तुत सर्व पदांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या याबाबतचा तपशील आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

परीक्षा शुल्क : रु. ३९४/- (खुला), रु. २९४/- (मागासवर्गीय/ आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ).

ऑनलाइन परीक्षा शुल्क भरण्याकरिता विहीत अंतिम दि. २५ सप्टेंबर २०२३ (२३.५९ वाजेपर्यंत) भारतीय स्टेट बँकेत चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरावयाचे झाल्यास चलनाची प्रत घेणेकरिता विहीत अंतिम दि. २७ सप्टेंबर २०२३ (२३.५९ वाजेपर्यंत). चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी अंतिम दि. २९ सप्टेंबर २०२३ (बँकेच्या कार्यालयीन वेळेत).

ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या https://mpsconline.gov. in तसेच https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर उमेदवारांना सर्वसाधारण सूचना उपलब्ध आहेत. ऑनलाइन अर्ज https://mpsconline.gov.in या संकेतस्थळावर दि. २५ सप्टेंबर २०२३ (२३.५९ वाजे)पर्यंत करावेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Job opportunity through maharashtra public service commission in government department zws

First published on: 22-09-2023 at 05:35 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×