● नॅशनल एअरोस्पेस लॅबोरेटरीज ( NAL), बंगळुरू. (काऊन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च इन्स्टिट्यूट ( CSIR) यांच्याशी संलग्न एक प्रमुख वैज्ञानिक संशोधन व विकास संस्था आहे.)

ज्यु. सेक्रेटरिएट असिस्टंट ( JSA) आणि ज्यु. स्टेनोग्राफर ( JST) पदांची भरती. 

एकूण रिक्त पदे – २६. ( Advt. No. ०३/२०२५) पोस्ट कोड निहाय रिक्त पदांचा तपशिल –

पदाचे नाव – ( I) ज्युनियर सेक्रेटरिएट असिस्टंट – २१ पदे (१ पद मा.सै. साठी राखीव) (वेतन श्रेणी – लेव्हल-२ (१९,९०० – ६३,२००) वेतन दरमहा रु. ३९,०००/-).

AD-०१ ज्यु. सेक्रेटरिएट असिस्टंट (जनरल) – ९ पदे (अजा – २, अज – १, इमाव – १, ईडब्ल्यूएस – १, खुला – ५) (१ पद दिव्यांग कॅटेगरी MD साठी राखीव).

AD-०२ ज्यु. सेक्रेटरिएट असिस्टंट (स्टोअर्स अँड पर्चेस) – ५ (अजा – १, इमाव – १, खुला – ३).

AD-०३ ज्यु. सेक्रेटरिएट असिस्टंट (फिनान्स अँड अकाऊंट्स) – ७ (अजा – २, इमाव – १, ईडब्ल्यूएस – १, खुला – ३).

पात्रता – १२ वी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण आणि DOPT च्या निकषांनुसार कॉम्प्युटर टायपिंग स्पीड इंग्रजी ३५ श.प्र.मि. (१०,५०० KDPH), हिंदी – ३० श.प्र.मि. (९,००० KDPH).

AD-०४ ज्युनियर स्टेनोग्राफर – ५ पदे (अजा – १, अज – १, खुला – ३) (वेतन श्रेणी – लेव्हल-४ (२५,४०० – ८१,१००) वेतन दरमहा रु. ४९,०००/-).

पात्रता – १२ वी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण आणि DOPT च्या निकषांनुसार स्टेनोग्राफीतील प्राविण्य (१० मिनिटांचे डिक्टेशन इंग्लिश किंवा हिंदी (उमेदवाराने ऑनलाइन अर्जात निवडलेल्या पर्यायानुसार) शॉर्टहँड ८० श.प्र.मि. वेगाने आणि टायपिंगसाठी वेळ इंग्लिश – ५० मिनिटे किंवा हिंदी – ६५ मिनिटे).

वयोमर्यादा – (दि. २० मे २०२५ रोजी) JSA – २८ वर्षे, STEN – २७ वर्षे (विधवा/घटस्फोटीत/कायद्याने विभक्त पुनर्विवाह न केलेल्या महिला – खुला/इमाव – ३५ वर्षे, अजा/अज – ४० वर्षे) (वयोमर्यादेत सूट इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे, दिव्यांग – १०/१३/१५ वर्षे).

निवड पद्धती – शॉर्ट लिस्टेड उमेदवारांना ओएमआर किंवा कॉम्प्युटर आधारित वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षेस बोलाविले जाईल. एकूण २०० प्रश्न, वेळ २ तास ३० मिनिटे.

परीक्षा केंद्र – बेंगलुरू किंवा इतर असेल.

पेपर-१ – मेंटल अॅबिलिटी टेस्ट १०० प्रश्न. प्रत्येकी २ गुण. एकूण २०० गुण, वेळ ९० मिनिटे.

(जनरल इंटेलिजन्स, क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड, रिझनिंग, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, सिच्युएशनल जजमेंट इ.)

चुकीच्या उत्तरांसाठी गुण वजा केले जात नाहीत. पेपर-१ फक्त पात्रता स्वरूपाचा असेल.

पेपर-२ – ( i) जनरल अवेअरनेस – ५० प्रश्न आणि ( ii) इंग्लिश लँग्वेज – ५० प्रश्न. प्रत्येकी ३ गुण. एकूण ३०० गुण, वेळ १ तास. चुकीच्या उत्तरासाठी १ गुण वजा केला जाईल. १० मिनिटांची कॉम्प्युटर प्रोफिशियन्सी टेस्ट – फक्त पात्रता स्वरूपाची.

अंतिम गुणवत्ता यादी पेपर-२ मधील गुणांनुसार बनविली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना २ वर्षांचा प्रोबेशन कालावधी पूर्ण करावा लागेल.

ज्यु स्टेनोग्राफर पदासाठी – (१) लेखी परीक्षा एक पेपर एकूण २०० गुणांसाठी, वेळ २ तास. (पार्ट-१ – जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग – ५० प्रश्न; पार्ट-२ – जनरल अवेअरनेस – ५० प्रश्न; पार्ट-३ – इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रिहेन्शन – १०० प्रश्न, प्रत्येक प्रश्नास १ गुण.) चुकीच्या उत्तरासाठी प्रत्येकी ०.२५ गुण वजा केले जाणार.

(२) स्टेनोग्राफी प्रोफिशियन्सी टेस्ट – DOPT च्या निकषांनुसार ही फक्त पात्रता स्वरूपाची असेल. स्टेनोग्राफी प्रोफिशियन्सी टेस्टमधील पात्र उमेदवारांची अंतिम निवड लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार केली जाईल.

उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करताना पोस्ट कोडनुसार पसंतीक्रम नोंदवायचा आहे. AD-०१ JSA (जनरल), AD-०२ JSA (फिनान्स अँड अकाऊंट्स), AD-०३ JSA (स्टोअर्स अँड पर्चेस), AD-०४ ज्यु. स्टेनोग्राफर. नंतर तो बदलता येत नाही. अॅडमिट कार्ड NAL ची वेबसाईट https:// www. nal. res. in वरून जून/जुलै २०२५ मध्ये डाऊनलोड करता येतील. अंतिम निकाल जुलै २०२५ मध्ये जाहीर केला जाईल.

अर्जाचे शुल्क – रु. ५००/-.

वेगवेगळ्या पोस्ट कोडसाठी अर्ज केल्यास प्रत्येक कोडसाठी वेगवेगळी फी भरावी लागेल.

ऑनलाइन अर्ज https://www.nal.res.in या संकेतस्थळावर दि. २० मे २०२५ (सायंकाळी ५ वाजे)पर्यंत करावेत.

suhaspatil237@gmail.com