MAFSU recruitment 2024 : महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर भरती सुरू आहे. यामध्ये सहाय्यक प्राध्यापक आणि समकक्ष या पदांवर भरती केली जाणार आहे. एकूण ६४ रिक्त जागांवर भरती होणार आहे. तरी अर्जाची अंतिम तारीख तसेच अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी पात्रता निकष जाणून घ्या.

MAFSU recruitment 2024 : पात्रता निकष

पदसंख्या :

ugc new decision direct admission to phd after graduation
आता पदवीनंतर पीएच.डी.ला मिळणार थेट प्रवेश! काय आहे युजीसीचा नवा निर्णय? युजीसीचे अध्यक्ष प्रा. एम. जगदेशकुमार यांची माहिती 
CUET PG exam result announced by NTA pune
‘सीयूईटी-पीजी’ परीक्षेचा निकाल ‘एनटीए’कडून जाहीर, यंदा किती विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा?
Engineering Colleges Maharashtra
‘बीई’ करूनही मिळत नाहीये नोकरी!
Kendriya Vidyalaya
केंद्रीय विद्यालयांतील प्रवेश प्रक्रिया सुरू, कधीपर्यंत भरता येणार अर्ज?

महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरमध्ये सहाय्यक प्राध्यापक आणि समकक्ष या पदांवर भरती होणार आहे.
यासाठी एकूण ६४ जागा उपलब्ध आहेत.
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही ३८ वर्षे ठेवण्यात आली आहे.

MAFSU recruitment 2024 – महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर अधिकृत वेबसाईट
https://www.mafsu.in/

MAFSU recruitment 2024 – अधिसूचना –
https://drive.google.com/file/d/1oH_8H4dsdbValiKVPiO4Y3HusghmlT-0/view

हेही वाचा : ESIS Pune Recruitment 2024 : महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्थेत भरती सुरू; पाहा अधिक माहिती….

शैक्षणिक पात्रता :

सहाय्यक प्राध्यापक आणि समकक्ष या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मास्टर्स ही पदवी असणे आवश्यक आहे.

अर्ज कसा आणि कुठे करावा :

सहाय्यक प्राध्यापक आणि समकक्ष यापैकी कोणत्याही पदांसाठी इच्छुक उमेदवारास अर्ज करावयाचा असल्यास तो ऑफलाइन पद्धतीने करावा.
अर्जामध्ये आपली संपूर्ण माहिती आणि आवश्यक ती कागदपत्रे जोडावी.
इच्छुक उमेदवारांनी खालील पत्त्यावर अर्ज जमा करावा –

अर्ज पाठविण्याचा पत्ता : निबंधक, महाराष्ट्र प्राणी आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ, फुटाळा तलाव रोड, नागपूर- ४४०००१ (M.S.)

अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही १५ मार्च २०२४ अशी आहे.
इच्छुक उमेदवारांनी त्यांचा अर्ज अंतिम तारखेआधी भरावा.

अर्जाचे शुल्क

ओपन किंवा आरक्षण नसणाऱ्या उमेदवारांसाठी १५००/- रुपये शुल्क आहे.
आरक्षित उमेदवारांसाठी ७५०/- रुपये शुल्क आहे.

वरील महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरमधील सुरू असणाऱ्या नोकरीसंबंधी उमेदवारांना अधिक माहिती हवी असल्यास, महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. अथवा या नोकरीसंदर्भातील अधिसूचना वाचावी. अधिकृत वेबसाईट आणि अधिसूचनेची लिंक ही वर दिलेली आहे.