scorecardresearch

वैद्यकीय अधिकारी व्हायचंय? या पदांसाठी निघाली बंपर भरती, अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

वैद्यकीय अधिकारी पदांसाठी निघालेल्या भरतीची शेवटची तारीख १६ मार्च २०२३ आहे, पण…

Medical Officers Latest Jobs
वैद्यकीय अधिकारी पदांसाठी निघाली मोठी भरती- (Image-Pixabay)

Medical Officer Jobs 2023 : भारतीय-तिब्बत सीमा पोलीस दलाने काही दिवसांपूर्वी मेडिकल ऑफिसरच्या बंपर पदांसाठी भरती काढली होती. गेल्या काही दिवसांपासून या नोकर भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या विभागात नोकरी करण्याची इच्छा असूनही अर्ज केला नसेल तर आताच अप्लाय करा, कारण अर्ज भरण्याची शेवटची तारीख १६ मार्च २०२३ आहे. ज्या उमेदवारांना आयटीबीपीमध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून नियुक्त व्हायचं आहे, असे उमेदवार अर्ज करु शकतात.

अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

१) या नोकर भरतीच्या माध्यमातून सुपर स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर, स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर आणि मेडिकल ऑफिसर पदे भरण्यात येतील.
२) अर्ज भरण्याची प्रक्रिया १५ फेब्रुवारीपासून सुरु झाली आहे. अप्लाय करण्याची अंतिम तारीख १६ मार्च २०२३ आहे.
३) या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करु शकता. यासाठी तुम्हाला इंडो-तिब्बतन बॉर्डर पोलीस फोर्सच्या ऑफिशियल वेबसाईटवर itbpolice.nic.in जावं लागेल.
४) अन्य कोणत्याही माध्यमाद्वारे केलेला अर्ज स्विकारला जाणार नाही.
५) या नोकर भरतीच्या माध्यमातून एकूण २९७ पद भरण्यात येतील.

नक्की वाचा – सैनिक व्हायचंय? ‘असं’ मिळेल सैनिक शाळेत अ‍ॅडमिशन, फॉर्म आणि शुल्कबाबत जाणून घ्या सविस्तर

६) यामध्ये ५ पद सुपर स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसरचे आहेत. १८५ पद स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर आणि १०७ पदे मेडिकल ऑफिसर्सचे आहेत.
७) आयटीबीपीच्या या पदांसाठी अप्लाय करण्यासाठी जनरल, ओबीएससी आणि इडब्ल्यूएस कॅटेगरीच्या उमेदवारांना ४०० रुपये शुल्क भरावे लागेल.
८) एससी, एसटी आणि एक्स-सर्विसमेनला अर्ज करण्यासाठी शुल्क द्यावे लागणार नाही.
९) अर्ज करण्यासाठी उमेदवाराचं वय आणि शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे.
१०) यासाठी तुम्ही नोटिफिकेशन तपासू शकता.
११) या पदांसाठी उमेदवारांची निवड डॉक्यमेंटेशन आणि वैद्यकीय चाचण्यांच्या आधारावर केली जाईल.

मराठीतील सर्व करिअर ( Career ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-03-2023 at 13:06 IST