मुलांनी काही आगळं वेगळं करायचं ठरवलं की, अनेक कंगोरे एकदम टोकदारपणे समोर येतात. हे कंगोरे खरे किती, का खोटे याच वास्तव दाखवण्याचा हा ‘आरसा’. लिबरल आर्टस् अशीच एक शिक्षण शाखा. आजही मला मनोजच्या शिक्षणाकरता केलेल्या खर्चाचे ते आकडे ऐकले तरी सुद्धा अंगावर काटा येतो. मात्र, त्याची प्रगती पाहता हा खर्च नक्कीच सत्कारणी लागला एवढे नक्की. मनोजच्या आईच्या भावना.

काल मनोजचे मास्टरचे कॉन्व्होकेशन पार पडले. खरे तर माझा पहिला नवरा म्हणजे मनोजचे वडील उदय याचे बरोबर तो समारंभ अटेंड करण्याचे मला टेन्शनच आले होते. दुसरीकडे मनोजने शिक्षण व्यवस्थित पूर्ण करून हाती दुसरी पदवी मिळवली व तो आता अमेरिकेत स्थायिक होणार याचा मनापासून आनंद झाला होता. मनोजच्या शिक्षणासंदर्भात त्याच्या पहिली पासून पहिली पदवी मिळेपर्यंत मला कायम सगळ्यांच्या शिव्याच खायला लागल्या होत्या. तू अभ्यास घेत नाहीस. तू मुलाकडे लक्ष देत नाहीस. तुला मुलाची काळजीच नाही. मुलगा तुझे अजिबात ऐकत नाही… आणि त्यातून तू लग्न मोडून मुलाला घेऊन भारतात आली आहेस. हे टोमणे मी सतत ऐकत आले होते. या साऱ्यांनी माझे डोके फिरवून मला वेड कसे लागले नाही याचेही मला काही वेळा आश्चर्य वाटते. पण ज्याचा शेवट छान ते सारे छान असे म्हणतात, तो कालचा दिवस उजाडला. उदय दुबईहून एकटाच आला होता तर माझ्या दुसऱ्या नवऱ्याने या निमित्ताने आमची तीन आठवड्याची अमेरिकेची टूर अरेंज केली होती.

IAS Puja Khedkar
IAS Pooja Khedkar : पूजा खेडकरचा आणखी एक प्रताप समोर; दिव्यांग असल्याचे सांगून UPSC परीक्षेत मिळवली सूट
kidney racket In vijaywada
मुलांच्या शिक्षणासाठी रिक्षाचालकाने किडनी विकली; पण पैशांऐवजी त्याला…
man commits suicide due to inability to pay for childrens education
सोलापूर : मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागेना म्हणून पित्याची आत्महत्या
FYJC Admission Will Maratha Reservation Apply
अकरावी प्रवेशाची गुणवत्ता यादी जाहीर; FYJC प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू होणार का? शिक्षण संचालकांचे उत्तर वाचा
school, awareness, school after nine,
शहरबात : नऊनंतरच्या शाळेचे ‘सजग’ भान गरजेचे
Sheikh Hasina, India, visit,
शेख हसीनांच्या भारत-भेटीने काय साधले?
delay , RTE, admission,
आरटीई प्रवेश प्रक्रिया लांबविल्याने पालक चिंतेत, शासनाच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप
Scholarship Fellowship Scholarship Scheme by Bahujan Welfare Department
स्कॉलरशीप फेलोशीप: बहुजन कल्याण विभागातर्फे शिष्यवृत्ती योजना

हेही वाचा >>> नोकरीची संधी: ‘यूपीएससी’मार्फतसिलेक्शन पद्धतीने भरती

आठवणी दाटतात

मी सांगलीची तर उदय मिरजेचा. दोघेही बीकॉम झालो. मला एक अकाउंट्सची नोकरी मिळाली तर उदयला मार्केटिंगची. कॉलेजात ओळख असली तरी ठरवूनच लग्न झाले होते. मनोजचा जन्म झाला आणि त्यामुळे माझी नोकरी सुटली. नंतरची वर्षे घरातच गेली. त्या काळात दुबईला जाण्याची मोठीच लाट आली होती. त्यात मिरजेचे अनेक जण विविध नोकऱ्या पकडून तिकडे जात होते. तोच रस्ता उदयने स्वीकारला आणि आम्ही तिघेजण दुबईत पोचलो. मनोजची पहिली सुरू झाली होती. तो दिवसभर शाळेत तर उदय दिवसभर कामात. मला करायला उद्याोग नाही, बाहेर जायला जागा नाही असा कोंडवाडा झाल्यासारखी अवस्था होती. मार्केटिंगच्या लोकांच्या पार्ट्यांच्या निमित्ताने दुबईमध्ये गेल्यापासून उदय रोज संध्याकाळी प्यायला लागला होता. पाहता पाहता वर्ष दोन वर्षात त्याचे रूपांतर व्यसनात झाले. आमची भांडणे सुरू झाली. सकाळी उठल्यानंतर दोघेही पुन्हा बाहेर गेल्यावर दिवसभर डोक्यात तेच विचार असायचे. काही वेळा भारतातील मैत्रिणी, घरातील आई-वडील यांच्याशी यावर संवाद साधायचा प्रयत्न केला. परदेशात तुझे सुख दुखत आहे असे त्यांचे वाक्य मला अधिकच दुखवून गेले. त्यामुळे हळूहळू या सगळ्यांशी संवाद तुटत गेला.

उदयशी कुठेतरी पॅचअप होईल असे वाटले होते पण तसे घडले नाही आणि मनोज तर पार कंटाळून गेला होता. उदयला प्रमोशन मिळून त्याचा पगार खूपच वाढला होता त्यामुळे पाचवी मध्ये साध्या सीबीएससीच्या भारतीय शाळेतून मनोज ला काढून केंब्रिज स्कूल मध्ये त्याची रवानगी केली गेली. उदयच्या मनात बारावीनंतर त्याला लंडनला शिकायला पाठवायचे होते. तसे त्याने मनोजला एक-दोनदा बोलून दाखवले होते. लंडनला जायचे तर उत्तम मार्क हवेत आणि ते तर मनोजला मिळत नव्हते यावरून आमची रोजची खडाजंगी सुरू झाली. केंब्रिजच्या शाळेकरता भली मोठी फी मी भरतो आणि तुला त्याचा साधा अभ्यास घेता येत नाही, त्याचे मार्क वाढवता येत नाहीत? हा वरचेवर मनोजच्या देखत भांडणाचा विषय असे. मानसिक दबावाखाली त्याची शैक्षणिक घसरण चालूच होती.

हेही वाचा >>> यूपीएससी सूत्र : इजिप्शियन स्मशानभूमीतील भारतीय माकडे अन् भारताचे शेजारी प्रथम धोरण, वाचा सविस्तर..

मनोजला घेऊन मी भारतात आले. शंभर प्रश्न माझ्यासमोर उभे असताना उदयला लेकाची काळजीचा उमाळा आला. शाळेची अॅडमिशन, शिक्षणाचा खर्च व मला दरमहा मनोजला संभाळण्यासाठीची मोठी रक्कम देऊ करून त्याने डिव्होर्सचे कागदपत्र सहीला पाठवले. मनोजची दहावी संपली होती. रीटामॅम या दरम्यान उदयचे वतीने माझ्या मदतीला ठाम उभ्या होत्या. तिचा माझा फारसा संवाद होत नसे, पण मनोज तिच्यावर खुश आहे याचा मला आनंद होता. मनोजच्या शिक्षणाचे दहावीनंतरचे सर्व निर्णय घेताना रीटा मला अजिबात विचारत नसे. पण तिचे सर्व निर्णय योग्य असल्यामुळे मला काही बोलण्याची गरज पडत नसे. आज मला मनोजच्या शिक्षणाकरता केलेल्या खर्चाचे ते आकडे ऐकले तरी सुद्धा अंगावर काटा येतो. उदय दुबईत प्रचंड कमवत होता म्हणूनच ते शक्य होते. दहावीपर्यंतच्या शाळेकरता सहा लाखाचा खर्च झाला होता तर दरवर्षी तीन लाख रीटाला खासगी शिकवणीसाठी दिले जात होते. इतके करून मार्क का वाढत नाहीत ही भुणभुण मात्र माझ्या मागची जाऊन रीटा मागे सुरू झाली होती. त्याला उत्तर देण्यात रीटाची हुशारी उपयोगी पडत होती. महत्त्वाची गोष्ट म्हणजे विविध शैक्षणिक संस्थांची तिला इत्थंभूत माहिती असल्याने मनोजला उदयच्या इच्छेनुसार अमेरिकेत पाठवण्याकरता काय लागेल ते चांगले माहिती होते. मनोजलाही तेच हवे होते. मनातून खरे तर आमच्या दोघांपासून सुटका.

लिबरल आर्ट्सला प्रवेश बारावी नंतर एका नवीन निघालेल्या विद्यापीठातील बीए लिबरल आर्ट्समध्ये प्रवेश मिळाल्याची बातमी मनोजकडूनच मला कळली. रीटाला मी फी विचारली तर तिने सहजपणे सांगून टाकले चार लाख रुपये वर्षाचे पडतील होस्टेलला ठेवले तर ते वर्षाचे तीन लाख वेगळे. एवढी फी भरून बीए करायला कोण येतात? असा मला सतत प्रश्न पडत होता पण त्याचे उत्तर यथावकाश मनोजकडून मिळाले. होस्टेलला गेल्यावर मनोजचे डोके शांत झाले असावे. तेथील मित्रातही तो रमला हळूहळू अभ्यासात प्रगती होऊ लागली. कधीतरी आमची फोनवरच गाठ पडे. तेव्हा त्याच्या बोलण्यातील नवीन विषय ऐकून मला समाधान मिळत होते. मी एक छोटीशी नोकरी स्वीकारली होती. मनोज अमेरिकेला गेला. पुढची दोन वर्षे तशी सुखात व आनंदात गेली. मनोजचे पदवी प्रदान समारंभ आणि आमची तीन आठवड्याची अमेरिकेची मोठी टूर अशी साऱ्याची छान सांगड घालून झाल्याचा आनंद माझ्या दुसऱ्या नवऱ्याला झाला. तर आई म्हणून माझी जबाबदारी पूर्ण केल्याचे खरेखुरे समाधान मला.