scorecardresearch

LIC Recruitment 2023: LIC मध्ये ९३९४ पदांसाठी मोठी भरती; जाणून घ्या अर्ज कसा कराल

LIC Recruitment 2023: देशातल्या सर्वात मोठ्या इन्शुरन्स कंपनी LIC मध्ये मोठी भरती निघाली आहे. यामध्ये अप्रेटिस डेव्हलपमेंट ऑफिसरची सव्वा नऊ पदे भरली जाणार आहेत.

lic recrutment 2023
फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम

LIC Recruitment 2023: देशातल्या सर्वात मोठ्या इन्शुरन्स कंपनी LIC मध्ये मोठी भरती निघाली आहे. यामध्ये अप्रेटिस डेव्हलपमेंट ऑफिसरची सव्वा नऊ पदे भरली जाणार आहेत. यामध्ये इच्छुक उमेदवारांनी एलआयसीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे. अर्जाची तारीख, अर्ज कसा भरावा याबाबत सविस्तर जाणून घेऊया..

ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख- २१ जानेवारी
अर्ज भरण्याची शेवटची तारीख- १० फेब्रुवारी

वय मर्यादा

अर्जदार उमेदवारांची वयोमर्यादा २१ वर्ष ते ३० वर्ष असावी. तसंच राखीव प्रवर्गासाठी वयात सवलत दिली जाईल.

अर्ज शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ७५० रुपये भरावे लागतील. तर SC आणि ST प्रवर्गातील उमेदवारांना १०० रुपये भरावे लागतील.

( हे ही वाचा: NPCIL Recruitment 2023: १९३ नर्स आणि इतर अनेक पदांसाठी मोठी भरती; अर्ज कुठे आणि कसा भरावा जाणून घ्या)

शैक्षणिक पात्रता

या पदांसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना शैक्षणिक पात्रतेची माहिती अधिसूचनेत दिलेली आहे. एलआयसीच्या अधिकृत लिंक वर जाऊन भरती अधिसूचना पाहावी.

मराठीतील सर्व करिअर ( Career ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 19:10 IST