सुहास पाटील
रेल्वे रिक्रूटमेंट सेल, सेंट्रल रेल्वे वाडी बंदर, मुंबई – ४०० ०१०. (जाहिरात क्र. RRC/ CR/ AA/२०२४, dt. १५.०७.२०२४) अॅप्रेंटिसेस अॅक्ट १९६१ अंतर्गत २,४२४ जागांवर आटीआय उत्तीर्ण उमेदवारांची ‘अॅप्रेंटिसेस’ पदांवर भरर्ती. आआर्सी सेंट्रल रेल्वे मुख्यालय, मुंबई येथे क्लस्टरनुसार रिक्त पदांचा तपशील :

( I) मुंबई क्लस्टर –

Mumbai-Nagpur Special Trains on the occasion of Dhammachakra Pravartan Day Mumbai print news
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मुंबई – नागपूर विशेष रेल्वेगाड्या
10th October Rashi Bhavishya In Martahi
१० ऑक्टोबर पंचांग: गुरुची वक्री चाल तर महागौरी…
Job Opportunity Opportunities in BPCL career
नोकरीची संधी: ‘बीपीसीएल’मधील संधी
central railway cancelled 10 ac local service
मध्य रेल्वेचा ‘पांढरा हत्ती’ प्रवाशांसाठी त्रासदायक; वातानुकूलित लोकलच्या दहा फेऱ्या रद्द
Noise and light pollution during Ganpati Visarjan procession of Pune
लोकजागर : सांस्कृतिक शहराचा ‘प्राण’ गुदमरू नये!
Traffic of express trains continues on the third and fourth lines of central railway
तिसऱ्या, चौथ्या मार्गिकेवरुन एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांची वाहतुक सुरूच
Mumbai, block on Western Railway, mega-block,
मुंबई : पश्चिम रेल्वेवर १० तासांचा ब्लॉक, रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक
Job Opportunity Railway Recruitment Job vacancy
नोकरीची संधी: रेल्वेतील भरती

( i) कॅरेज अँड वॅगॉन (कोचिंग) वाडी बंदर – एकूण २५८ पदे.

( ii) कल्याण डिझेल शेड – एकूण ५० पदे.

( iii) कुर्ला डिझेल शेड – एकूण ६० पदे.

( iv) Sr. DEE ( TRS) कल्याण – एकूण १२४ पदे.

( v) र१. ऊएए ( ळफर) कुर्ला – एकूण १९२ पदे.

( vi) परेल वर्कशॉप – एकूण ३०३ पदे.

( vii) माटुंगा वर्कशॉप – एकूण ५४७ पदे.

( viii) S & T Workshop, भायखळा – एकूण – ६० पदे.

( II) भुसावळ क्लस्टर –

( i) कॅरेज अँड वेगॉन डेपो – एकूण १२२ पदे.

( ii) इलेक्ट्रिक लोको शेड – एकूण ८० पदे.

( iii) इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह वर्कशॉप – एकूण ११८ पदे.

( iv) मनमाड वर्कशॉप – एकूण ५१ पदे.

( v) TMW नाशिक रोड – एकूण ४७ पदे.

( III) पुणे क्लस्टर –

( i) कॅरेज अँड वॅगॉन डेपो – एकूण ३१ पदे.

( ii) डिझेल लोको शेड – एकूण १२१ पदे.

( iii) इलेक्ट्रिक लोको शेड (दौंड) – एकूण ४० पदे.

( IV) नागपूर क्लस्टर –

( i) इलेक्ट्रिक लोको शेड अजनी – एकूण ४८ पदे.

( ii) कॅरेज अँड वेगॉन डेपो – एकूण ६३ पदे.

( iii) MELPL अजनी – एकूण ३३ पदे.

( V) सोलापूर क्लस्टर –

( i) कॅरेज अँड वेगॉन डेपो – एकूण ५५ पदे.

( ii) कुर्डूवाडी वर्कशॉप – एकूण २१ पदे.

सर्व पदांसाठी अॅप्रेंटिसशिप ट्रेनिंगचा कालावधी १ वर्षाचा असेल.

पात्रता : (दि. १५ जुलै २०२४ रोजी) १० वी किमान सरासरी ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि ठउश्ळ/ रउश्ळ यांचेकडील संबंधित ट्रेडमधील आयटीआय कोर्स सर्टिफिकेट.

वयोमर्यादा : दि. १५ जुलै २०२४ रोजी १५ ते २४ वर्षे (इमाव – २७ वर्षेपर्यंत, अजा/अज – २९ वर्षेपर्यंत, विकलांग – ३४ वर्षेपर्यंत) (खुल्या गटातील उमेदवाराचा जन्म १५ जुलै २००० ते १५ जुलै २००९ दरम्यानचा असावा.).

अर्जाचे शुल्क : रु. १००/-. (अजा/ अज/ महिला/ विकलांग यांना फी माफ आहे.)

निवड पद्धती : आलेल्या अर्जातून १० वी आय्टीआय्मधील गुण एकत्र करून गुणवत्ता यादी बनविली जाईल. (१० वीला मिळालेल्या सर्व विषयांतील गुणांची टक्केवारी काढली जाईल.)

कागदपत्र पडताळणीच्या वेळी उमेदवारांना इतर मूळ कागदपत्रांसोबतच Annexure- VII मधील मेडिकल सर्टिफिकेट सादर करावे लागेल.

स्टायपेंड : ट्रेनिंग दरम्यान उमेदवारांना रु. ७,०००/- दरमहा स्टायपेंड दिले जाईल.

फोटोग्राफची स्कॅण्ड/सॉफ्ट कॉपी : ऑनलाइन अर्ज करताना उमेदवारांनी आपला रंगीत फोटोग्राफ (जो अर्ज करण्याच्या दिवसाच्या ३ महिन्यांपूर्वी काढलेला नसावा.) ( JPG/ JPEG Format, 100 DPI size between 20 kb – 70 kb) उमेदवारांनी अपलोड केलेल्या फोटोग्राफच्या आणखी २ कॉपीज कागदपत्र पडताळणी वेळी सादर कराव्या लागतील.

सिग्नेचरची स्कॅण्ड/सॉफ्ट कॉपी : उमेदवारांनी आपली सही अपलोड करणे आवश्यक आहे.

ऑनलाइन अर्जासोबत स्कॅण्ड करून अपलोड केलेली कागदपत्रे जर विहीत नमुन्यातील सक्षम अधिकाऱ्याने दिलेली नाहीत, हे कागदपत्र पडताळणीच्या वेळी निदर्शनास आले तर उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्यात येईल.

उमेदवारांनी ५ क्लस्टर्सपैकी १ क्लस्टर निवडावा आणि त्या क्लस्टरमधील युनिट्सकरिता पसंतीक्रम देवून अर्ज करावा.

मुंबई क्लस्टरमधील ८ युनिट्ससाठी उमेदवारांना पसंतीक्रम देता येईल. ऑनलाइन अर्ज www. rrccr. com या संकेतस्थळावरून दि. १५ ऑगस्ट २०२४ (१७.०० वाजे) पर्यंत करावेत.

शंकासमाधानासाठी ई-मेल आयडी act. apprentice@rrccr. com