प्रश्न १. भारतातील पहिली मधुमेह जैविक बॅंक ( Diabetes Bio Bank) कुठे स्थापन करण्यात आली आहे?

१) सिरम संस्था, पुणे</p>

२) AIIMS, नवी दिल्ली

three day b2b exhibition and conference vitafoods india 2025 held in jio world convention center
आयुर्वेदिक, पोषणपूरक उत्पादनांचे २०० अब्ज डॉलरच्या बाजारपेठेचे लक्ष्य
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
RBI likely to cut repo rate by 25 basis points
या दोन कारणांनी होईल रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर कपात… ,नवीन गव्हर्नरांकडून पहिल्याच बैठकीत निर्णय अपेक्षित
private hospital news in marathi
राज्यभरातील खासगी रुग्णालयांची झडती… आरोग्य मंत्र्यांच्या सूचनेनंतर आता…
cheap Ayush Ayurvedic Medicine
देशभरात स्वस्तातील आयुष औषधी केंद्राचे जाळे उभारणार; केंद्रीय मंत्र्यांची माहिती
GBS Pune, GBS, bacteria , private tankers, pune,
पुणे : १५ ठिकाणी खासगी टँकरच्या पाण्यातच जीवाणू असल्याचे उघड !
Nutrition Diet , Maharashtra School, Sweet Food ,
पोषण आहार बदल! साखर लोकांना मागा पण गोडधोड खाऊ घाला, अनुदान नाहीच
illegal jeans factories in chinchpada kalyan demolished by kdmc
कल्याणमधील चिंचपाडा येथील बेकायदा जीन्स कारखाने जमीनदोस्त; प्रदूषणामुळे रहिवासी होते हैराण

३) मद्रास मधुमेह संशोधन संस्था, चेन्नई

४) भारतीय वैद्याकीय संशोधन संस्था, मुंबई</p>

प्रश्न २. पुढीलपैकी कोणत्या कृषि उत्पादनांना भौगोलिक निर्देशांक प्राप्त झाला आहे?

अ. महाराष्ट्र – अलिबागचे पांढरे कांदे

ब. उत्तर प्रदेश – चिराईगाव करोंदा

क. मध्य प्रदेश – रतलाम लसूण

ड. महाराष्ट्र – जालना दगडी ज्वारी

पर्याय

१) अ, ब आणि क

२) ब, क आणि ड

३) अ, क आणि ड

४) वरील सर्व

प्रश्न ३. सन २०२४ चे नोबल पुरस्कार विजेते आणि त्यांचे देश यांची कोणती जोडी चुकीची आहे.

१) हान कांग (साहित्य) – जपान

२) सायमन जान्सन (अर्थशास्त्र) – अमेरिका

३) गॅरी रुवकुन (वैद्याकशास्त्र) – अमेरिका

४) डेमिस हसाबीस (रसायन शास्त्र) – युनायटेड किंग्डम

प्रश्न ४. सन २०२४ मध्ये भारतातील कोणत्या पाणथळ जमिनींना रामसर साईट्सचा दर्जा बहाल करण्यात आला आहे?

अ. तवा जलाशय

ब. नंजारयान पक्षी अभयारण्य

क. काझुवेली अभयारण्य

ड. भोपाळ भोज पाणथळ जमीन

पर्याय

१) अ, ब आणि क

२) अ, क आणि ड

३) ब, क आणि ड

४) वरील सर्व

योग्य उत्तरे व स्पष्टीकरण

प्रश्न १. (३)

मद्रास मधुमेह संशोधन संस्था आणि भारतीय वैद्याकीय संशोधन संस्था यांचेकडून संयुक्तपणे भारतातील पहिली मधुमेह जैविक बँक ( Diabetes Bio Bank) चेन्नई मध्ये स्थापन करण्यात अली आहे. भारतामध्ये मधुमेहाचे काही विशिष्ट प्रकार किंवा लक्षणे असल्यास त्यांवर संशोधन करणे हा या मधुमेह बायोबॅकेच्या स्थापनेमागचा उद्देश आहे.

प्रश्न २. (२)

सन २०२४ मध्ये महाराष्ट्राच्या पुढील कृषी उत्पादनांना भौगोलिक निर्देशांक प्राप्त झाला आहे: १. वसमत हळद, २. नंदूरबार आमचूर, ३. नंदूरबार मिरची, ४. पानचिंचोली चिंच, ५. बोरसूरी तूर डाळ, ६. कस्ती कोथिंबीर, ७. बहाडोली जांभूळ, ८. बदलापूर जांभूळ, ९. जालना दगडी ज्वारी.

त्याच बरोबर पुढील हस्तकला उत्पादनांना भौगोलिक निर्देशांक प्राप्त झाला आहे: १. सावंतवाडी गंजिफा कार्ड, २. मिरज तानपुरा, ३. मिरज सितार, ४. हुपरी चांदी उत्पादने, ५. सावंतवाडी लाकडी उत्पादने.

अलिबागचे पांढरे कांदे या उत्पादनास सन २०२१ मध्ये भौगोलिक निर्देशांक प्राप्त झाला.

प्रश्न ३. (१)

सन २०२४ चे नोबल पुरस्कार विजेते आणि त्यांचे योगदान पुढीलप्रमाणे आहे:

शांतता – निहोन हिदान्क्यो (जपान) – हिरोशिमा आणि नागासाकी येथील अणुबॉम्ब हल्ल्यामध्ये बचावलेल्या नागरीकांची अण्वस्त्रविरोधासाठी कार्यरत संस्था. सदर संस्थेस हिबाकुशा या नावानेही ओळखले जाते.

भौतिकशास्त्र – जान होपफिल्ड (अमेरिका)आणि जोफ्री हिन्टन (युनायटेड किंग्डम) – भौतिकशास्त्रातील संकल्पनांचा वापर करून ‘मशीन लर्निंग’ क्षेत्राचा पाया रचण्याचे कार्य.

रसायनशास्त्र – डेमिस हसाबीस (युनायटेड किंग्डम), जॉन एम. जम्पर प्रथिनांच्या संरचनेचा वेध घेण्यासाठी, तसेच प्रथिनांचे संगणकीय डिझाइन बनविण्याच्या कामगिरीसाठी

अर्थशास्त्र – डॅरॉन एसेमोग्लू (अमेरिका) सायमन जॉन्सन, जेम्स ए. रॉबिन्सन (युनायटेड किंग्डम) – कमकुवत कायदे असलेली शासनव्यवस्था व शोषण करणाऱ्या संस्थांमुळे शाश्वत विकास का होत नाही, याबद्दल केलेल्या संशोधनासाठी

वैद्याकशास्त्र – व्हिक्टर अॅम्ब्रोस (अमेरिका) – गॅरी रुवकन (अमेरिका) – मायक्रो आरएनएच्या शोधासाठी

साहित्य – हान कांग – दक्षिण कोरिया

प्रश्न ४. (१)

जानेवारी २०२४ मध्ये भारतातील पुढील पाणथळ जमिनींना रामसर साईट्सचा दर्जा बहाल करण्यात आला आहे – १. तवा जलाशय – मध्य प्रदेश २. नंजारयान पक्षी अभयारण्य – तमिळनाडू ३. काझुवेली अभयारण्य – तमिळनाडू

मध्य प्रदेशातील इंदूर आणि भोपाळ आणि राजस्थानमधील उदयपूर या शहरांनी त्यांच्या शहरी आणि पेरी-अर्बन पाणथळ प्रदेशांचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी या शहरांना रामसर साईट्स घोषित करण्याचा प्रस्ताव भारताकडून सादर करण्यात आला आहे.

careerloksatta@gmail. com

Story img Loader