Maharashtra Board 12th Result 2024 Dates Update: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) १० वी आणि १२ वी बोर्ड परीक्षा २०२४ च्या निकालासाठी जवळपास ३० लाख विद्यार्थी प्रतीक्षेत आहेत. प्रत्येक दिवशी सोशल मीडियावर निकालाच्या तारखांबाबत वेगवेगळी माहिती समोर येत आहे. दरवर्षीच्या अंदाजानुसार महाराष्ट्र बोर्डातफे सर्वात आधी बारावीचा व मग त्यानंतर १० दिवसांनी १० वीचा निकाल जाहीर केला जातो. यंदा मे महिन्याची सुरुवात झाल्यापासूनच HSC च्या निकालाच्या तारखांबाबत अनेक अंदाज वर्तवण्यात आले होते. यापूर्वी १२ वीचा निकाल १० मे ला जाहीर होणार अशी चर्चा होती आणि आता २५ मे ही तारीख चर्चेत आली आहे. साधारणपणे मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात निकाल जाहीर केला जात असल्याने कदाचित २५ मे रोजी बारावीचा निकाल घोषित होईल अशी शक्यता आहे. पण याबाबत अद्याप कोणतीच अधिकृत घोषणा झालेली नाही. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र बोर्डाच्या वतीने निकालाच्या तारखांबाबत स्पष्टीकरण देणारी अधिसूचना सुद्धा देण्यात आली होती. बोर्डाने नेमकं काय सांगितलं होतं हे पाहूया..

हिंदुस्तान टाईम्सने महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, बोर्डाने अशी माहिती दिली होती की मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दहावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे आणि एचएससीचा म्हणजेच १२ वी चा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात जाहीर केला जाऊ शकतो. विद्यार्थी आणि पालकांना सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. १० वी व १२ वी च्या निकालांच्या तारखा mahahsscboard.in वर जाहीर केल्या जातील असेही या अधिसूचनेत म्हणण्यात आले आहे.

Lakshman Hake health
“रक्तदाब वाढला, हृदयावर दाब येऊ शकतो, त्वरीत…”, लक्ष्मण हाकेंच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांनी दिली मोठी अपडेट!
Chhagan Bhujbal and Manoj Jarange
“छगन भुजबळांना काही दिवसांनी बैलाच्या गोळ्या द्याव्या लागणार, मोठं इंजेक्शन…”, मनोज जरांगेंचा संताप; म्हणाले, “कितीही आडवे या…”
Sushma Andhare rupali Thombare
“अजून किती मुस्कटदाबी सहन करणार?” सुषमा अंधारेंचा रुपाली ठोंबरेंना सवाल; म्हणाल्या, “निर्णय घेण्याची…”
The failure of mahayuti in the Lok Sabha elections in Maharashtra due to fake promises
अंधभक्तीचा उन्माद महायुतीच्या अंगलट!
What Ashwini Costa Mother Said?
Porsche Accident: “माझ्या मुलीच्या मृत्यूला १२ दिवस झाले आहेत, आता…”; अश्विनीच्या आईचा सून्न करणारा सवाल
MSBSHSE maharashtra SSC 10th Result 2024 Date may 27 how to check result on mahresult nicin last year passing trends dates
Maharashtra SSC Result 2024: १० वीचा निकाल २७ मे ला, गतवर्षाच्या रेकॉर्ड्सची आकडेवारी पाहा, निकाल जाहीर होताच इथे थेट पाहा गुण?
SSC Results Date Maharashtra Board 10th Marksheet
१० वीच्या निकालाच्या तारखेबाबत मोठी माहिती; महाराष्ट्र बोर्डाचं निकालाचं नियोजन कसं आहे? कुठे व कधी पाहाल, दहावीचे मार्क्स?
Israeli Prime Minister Benjamin Netanyahu
नेतान्याहू- हमास म्होरक्यांच्या अटकेपेक्षा ‘मानवतेच्या कायद्या’ची चिंता…

निकालाचे अपडेट मिळवण्यासाठी क्लिक करा

https://education.indianexpress.com/embed/board-exams?board-slug=cbse-board-result

महाराष्ट्र बोर्ड 10 वी 12 वी निकाल 2024 : निकाल साईटवर कसा तपासायचा?

  • अधिकृत वेबसाइटला mahresult.nic.in वर भेट द्या.
  • मुख्यपृष्ठावर उपलब्ध महाराष्ट्र SSC, HSC निकाल 2024 लिंक तपासा.
  • लॉग इन तपशील ऍड करून सबमिट वर क्लिक करा.
  • एंटर क्लिक करा आणि पेज डाउनलोड करा.
  • निकाल डाउनलोड केल्यानंतर प्रिंट काढा.

दरम्यान वर आपण वाचल्याप्रमाणे यंदा १० वी व १२ वीचे मिळून ३० लाख विद्यार्थी निकालाची वाट पाहत आहेत. त्यामुळे जेव्हा निकाल खरोखरीच जाहीर होईल तेव्हा साहजिकच एकाच वेळी साईटवर लोड आल्याने क्रॅश होण्याची शक्यता असते. अशावेळी तुम्ही आपल्या मोबाईल फोनवर सगळ्यात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करू शकता.

हे ही वाचा<< Maharashtra HSC, 12th Results 2024: १२ वीच्या निकालाबाबत बोर्डाचा महत्त्वाचा निर्णय; यंदा ‘ही’ यादी जाहीर न करण्याची शक्यता

महाराष्ट्र बोर्ड 10 वी 12 वी निकाल 2024: मोबाईलवर SMS मध्ये कसा समजेल निकाल?

  1. नवा एसएमएस या फॉरमॅटमध्ये तयार करा: MHHSCSEAT नं.
  2. 57766 वर एसएमएस पाठवा.
  3. महाराष्ट्राचा HSC/12वीचा निकाल त्याच क्रमांकावर पाठवला जाईल.