Maharashtra Board HSC Result 2026: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आता अंतिम टप्प्यात आला आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या बारावी परीक्षेचा निकाल २ मे २०२६ रोजी शनिवारी आज लागणार आहे. सकाळी 11 वाजता राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाच्या पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला जाईल. त्यानंतर दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल ऑनलाईन पाहता येणार आहेत.

दहावी बारावीचा निकाल कधी लागणार? (SSC HSC Result 2026 Date Revealed)

विद्यार्थी कायम महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळाच्या अधिकृत वेवसाइटवर निकाल पाहतात. पण यंदा तुम्हाला मंडळाच्या अधिकृत वेबसाइट ऐवजी डिजीलॉकरवरही बारावीच्या निकाल पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना डिजीलॉकर निकाल पाहायचा असेल तर पहिले विद्यार्थ्यांना आपला रोल नंबर टाकायचा आहे. मग आवश्यक लॉगिन तपशील वापरावा लागणार आहे.एवढंच नाहीतर डिजीलॉकरवरून डिजिटल गुणपत्रिका देखील डाउनलोड तुम्ही करु शकणार आहात. ही गुणपत्रिका भविष्यात कुठल्याही कामासाठी वैध मानली जाणार आहे.

Maharashtra Board HSC Result 2026: महत्त्वाच्या तारखा

बारावी परीक्षा कालावधी: १० फेब्रुवारी ते ११ मार्च २०२६
निकालाची वेळ: २ मे २०२६ १ वाजता

Maharashtra HSC Exam Result 2026: SMS वर निकाल पाहण्यासाठी काय करावे?

निकाल जाहीर झाल्यावर एकाच वेळी लाखो विद्यार्थी वेबसाईटवर येतात, ज्यामुळे सर्व्हर स्लो होण्याची किंवा वेबसाईट क्रॅश होण्याची शक्यता असते. अशा वेळी विद्यार्थी SMS द्वारे आपला निकाल त्वरित मिळवू शकतात.

Maharashtra HSC Exam Result 2026: काय मेसेज टाईप कराल?

12वीचा निकाल एसएमएसद्वारे पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना “MHHSC” असं टाकून ५७७६६ वर SMS सेंड करायचा आहे. त्यानंतर निकाल त्यांच्या फोनवर SMS च्या माध्यमातून दिसणार आहे.

असा चेक करा तुमचा निकाल (How to check Maharashtra Board HSC Result 2026)

HSC रिझल्ट लिंकवर क्लिक करा.

तुमचा रोल नंबर आणि इतर माहिती भरा.

ते सबमिट केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.

तुमची मार्कशीट डाऊनलोड करा.

या वेबसाईट्सवर पाहू शकता निकाल

1) mahresult.nic.in

2) hscresult.mkcl.org

3) results.digilocker.gov.in

4) mahahsscboard.in