महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (MJP) – गट-अ, ब आणि क संवर्गातील एकूण २९० रिक्त पदांची सरळसेवा भरती.

(१) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट-क – एकूण पदे ४८ (अजा – ४, अज – ३, विजा-अ – २, भज-ब – १, भज-क – २, भज-ड – २, विमाप्र – १, इमाव – ९, सौशमाव – ५, आदुघ – ५, खुला – १४) (अपंग कॅटेगरी D/HH आणि OA, OL, LC साठी प्रत्येकी १ पद राखीव).

पात्रता – १० वी उत्तीर्ण आणि स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा पदविका उत्तीर्ण.

(२) सहाय्यक भांडारपाल गट-क – १३ (अज – २, विजा-अ – २, इमाव – २, सौशमाव – २, आदुघ – १, खुला – ४) (१ पद अपंग कॅटेगरी LV साठी राखीव).

पात्रता – १० वी उत्तीर्ण आणि टंकलेखनाची शासकीय प्रमाणपत्र परीक्षा मराठी – ३० श.प्र.मि. किंवा इंग्रजी – ४० श.प्र.मि. उत्तीर्ण.

(३) कनिष्ठ लिपिक/लिपिक नि टंकलेखक गट-क – ४६ (अज – ३, विजा-अ – २, भज-क – ३, भज-ड – २, विमाप्र – २, इमाव – ४, सौशमाव – ६, आदुघ – ७, खुला – १७) (अपंग कॅटेगरी D/HH आणि LC साठी प्रत्येकी १ पद राखीव).

पात्रता – पदवी उत्तीर्ण आणि टंकलेखनाची शासकीय प्रमाणपत्र परीक्षा मराठी – ३० श.प्र.मि. किंवा इंग्रजी – ४० श.प्र.मि. उत्तीर्ण.

(४) निम्नश्रेणी लघुलेखक गट-क – ६ (अजा – १, अज – १, इमाव – १, सौशमाव – १, खुला – २).

पात्रता – १० वी उत्तीर्ण आणि १०० श.प्र.मि. गतीचे लघुलेखनाचे आणि टंकलेखनाचे इंग्रजी ४० श.प्र.मि. किंवा मराठी ३० श.प्र.मि. गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.

(५) उच्च श्रेणी लघुलेखक गट-ब – ३ (अजा – १, सौशमाव – १, खुला – १).

पात्रता – १० वी उत्तीर्ण आणि १२० श.प्र.मि. गतीचे लघुलेखनाचे आणि टंकलेखनाचे इंग्रजी ४० श.प्र.मि. किंवा मराठी ३० श.प्र.मि. गतीचे शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र.

(६) कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) गट-ब – १६ (अजा – १, अज – २, विजा-अ – १, भज-क – १, इमाव – ३, सौशमाव – २, आदुघ – २, खुला – ४) (१ पद अपंग कॅटेगरी D/HH साठी राखीव).

पात्रता – मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/प्रोडक्शन इंजिनीअरिंग पदविका.

(७) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट-ब – १४४ (अजा – १८, अज – १०, विजा-अ – ४, भज-ब – १, भज-क – ५, भज-ड – ४, विमाप्र – २, इमाव – २९, सौशमाव – १४, आदुघ – १४, खुला – ४३) (६ पदे अपंग कॅटेगरी (D/HH – २, OA/OL, LC – २, SLD – १, MD – १) साठी राखीव) (१ पद अनाथांसाठी राखीव).

पात्रता – स्थापत्य अभियांत्रिकी पदविका किंवा पदवी उत्तीर्ण.

(८) उपलेखापाल गट-क – ३ (अजा – १, इमाव – १, खुला – १).

(९) सहाय्यक लेखा अधिकारी गट-ब – ६ (अजा – १, अज – १, विजा-अ – १, सौशमाव – १, खुला – २).

पद क्र. ८ व ९ साठी पात्रता – दुसऱया वर्गासह कॉमर्स पदवी. (नामांकनाद्वारे थेट भरती)

(१०) लेखा अधिकारी गट-ब – ३ (अज – १, इमाव – १, खुला – १).

पात्रता – दुसऱया वर्गासह कॉमर्स पदवी (नामांकनाद्वारे थेट भरती).

अनुभव – व्यावसायिक विभागातील कामाचा किमान ५ वर्षांचा अनुभव.

(११) अंतर्गत लेखा परिक्षण अधिकारी/वरिष्ठ लेखा अधिकारी गट-अ – २ (अजा – १, खुला – १).

पात्रता – उच्च दुसऱया वर्गासह वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर पदवी आणि पर्यवेक्षी पदावर किमान १० वर्षांचा अनुभव.

उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. कर्नाटक सीमा वादात असलेली ८६५ गावांतील उमेदवारांनी १५ वर्षांचा अधिवासाचा दाखला सादर करणे अनिवार्य.

वयोमर्यादा – (दि. १ नोव्हेंबर २०२५ रोजी) पद क्र. १ ते १० खुला प्रवर्ग – ४० वर्षे, मागास प्रवर्ग – ४५ वर्षे.

वेतन श्रेणी (अंदाजे वेतन दरमहा) पद क्र. १ एस-८ (रु. ५०,०००/-); पद क्र. २ व ३ एस-६ (रु. ३८,०००/-); पद क्र. ४, ६, ७, ९ एस-१४ (रु. ७६,०००/-); पद क्र. ५, १० एस-१५ (रु. ८०,०००/-); पद क्र. ८ एस-१३ (रु. ७०,०००/-); पद क्र. ११ एस-२० (रु. १,१०,०००/-).

निवड पद्धती – (i) निम्न श्रेणी लघुलेखक आणि उच्च श्रेणी लघुलेखक या पदांसाठी १२० गुणांची ऑनलाइन परीक्षा (कॉम्प्युटर बेस्ड् टेस्ट) वेळ ७५ मिनिटे आणि ८० गुणांसाठी व्यावसायिक चाचणी.

(ii) वरील दोन लघुलेखक पदे वगळता इतर पदांसाठी ऑनलाइन परीक्षा – २०० गुणांसाठी, वेळ १२० मिनिटे.

परीक्षा शुल्क – खुला प्रवर्ग – रु. १,०००/-;

ऑनलाइन अर्ज http://www.mjp.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दि. १९ डिसेंबर २०२५ पर्यंत करावेत.

शंकासमाधानासाठी फोन नं. १८००२२२३६६/१८००१०३४५६६ किंवा https://cgrs.ibps.in या संकेतस्थळावर संपर्क साधा.

सुहास पाटील