गृह विभागाच्या अधिपत्याखालील पोलीस विभागातील जिल्हा पोलीस आयुक्त/पोलीस अधीक्षक यांच्या आस्थापनेवरील महाराष्ट्र राज्य पोलीस भरती २०२४-२०२५ मध्ये रिक्त होणाऱ्या गट-क मधील पोलीस शिपाई/पोलीस शिपाई चालक/सशस्त्र पोलीस शिपाई/बँड्समन पोलीस शिपाई/कारागृह शिपाईच्या रिक्त पदांची भरती. एकूण १५,४०५.

पदनिहाय पोलीस घटकांमधील रिक्त पदे – (अ) पोलीस शिपाई (गट-क) या पदासाठी – एकूण रिक्त पदे – १२,७०२ (यात पोलीस शिपाई बॅण्ड्समनची एकूण ६१ पदांचा समावेश आहे.) (कंसात पोलीस शिपाई बॅण्ड्समन पदे दर्शविली आहेत.)

१) मुंबई शहर – एकूण २,४५९ २) ठाणे शहर – ६५४ ३) पुणे शहर – १,७३३ (३३) ४) पिंपरी-चिंचवड – ३२२

५) मिरा-भाईंदर – ८४० ६) नागपूर शहर – ५९५ ७) नवी मुंबई – ४४५ ८) हिंगोली – ३७

९) सोलापूर शहर – ७९ (६) १०) लोहमार्ग पोलीस (मुंबई) ७४३ ११) ठाणे ग्रामीण – १६७ १२) रायगड – ९४

१३) पालघर – १५८ १४) सिंधुदुर्ग – ७८ १५) रत्नागिरी – १ १६) नाशिक ग्रामीण – २१०

१७) अहिल्यानगर – ७३ १८) धुळे – १३३ १९) कोल्हापूर – ८८ २) पुणे ग्रामीण – ६९

२१) लोहमार्ग नागपूर – १८ २२) सोलापूर ग्रामीण – ९० २३) छ. संभाजीनगर ग्रामीण – ५३ (४) २४) नांदेड – १९९

२५) परभणी – ८६ २६) छ. संभाजी नगर शहर – १५० २७) नागपूर ग्रामीण – २७२ २८) भंडारा – ५९

२९) चंद्रपूर – २१५ ३०) वर्धा – १३४ ३१) गडचिरोली – ७१७ ३२) गोंदिया – ५९ (१०)

३३) अमरावती ग्रामीण – २१४ ३४) अकोला – १६१ ३५) बुलढाणा – १४८ ३६) यवतमाळ – १५

३७) लोहमार्ग पुणे – ५४ ३८) लोहमार्ग छ. संभाजीनगर – ९३ ३९) सांगली – ५९ ४०) जळगाव – १७१

४१) जालना – १५६ ४२) बीड – १७४ ४३) धाराशीव – १२३ ४४) वाशिम – ४० (८)

४५) लातूर – ३०

(ब) पोलीस शिपाई चालक (गट-क) या पदासाठी – एकूण रिक्त पदे – ४७८

१) परभणी – ११ २) पुणे शहर – १५ ३) मिरा भाईंदर – ८१ ४) नवी मुंबई – ८२

५) पालघर – ७ ६) नाशिक ग्रामीण – ५२ ७) वाशिम – ८ ८) बुलढाणा – १४

९) रायगड – ३ १) रत्नागिरी – ८ ११) सिंधुदुर्ग – ९ १२) हिंगोली – २७

१३) पुणे ग्रामीण – ३ १४) लातूर – १६ १५) गडचिरोली – २७ १६) धाराशिव – २५

(क) समादेशक राज्य राखीव पोलीस बल (srpf) सशस्त्र पोलीस शिपाई (गट-क) या पदासाठी – एकूण रिक्त पदे १,६५२

१) गट-१ पुणे – ७३ २) गट-२ पुणे – १२ ३) गट-४ नागपूर – ५२ ४) गट-५ दौंड – १४

५) गट-६ धुळे – ७१ ६) गट-७ दौंड – १६५ ७) गट-१३ गडचिरोली – १७१ ८) गट-२० वरणगाव – २९१

९) गट-१५ गोंदिया – १७१ १०) गट-१६ कोल्हापूर – ३१ ११) गट-१८ काटोल नागपूर – १५९ १२) गट-१९ कुसडगाव – ८६

१३) गट-१७ चंद्रपूर – २४४

(ड) पोलीस शिपाई बँड्समन – एकूण रिक्त पदे ८० (खालील १९ पदे वगळता इतर पदे पोलीस शिपाई घटकांतील पदांमध्ये समाविष्ट आहेत.)

१) मुंबई शहर – ८ २) यवतमाळ – ११

(इ) कारागृह शिपाई – एकूण रिक्त पदे ५५४.

१) कारागृह, मुंबई – १७६ २) कारागृह, पुणे – १३ ३) कारागृह, नागपूर – १३० ४) कारागृह, नाशिक – ११८

वयोमर्यादा – (दि. ३ नोव्हेंबर २०२५ रोजी) (अ) पोलीस शिपाई/पोलीस शिपाई बँड्समन/कारागृह शिपाई पदासाठी खुला – १८-२८ वर्षे, मागास प्रवर्ग /अनाथ – १८-३३ वर्षे, प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त – १८-४५ वर्षे, अंशकालीन पदवीधर – १८-५५ वर्षे (माजी सैनिकांवर अवलंबून असलेले (मुलगा, मुलगी, पत्नी) खुला – १८-३१ वर्षे, मागास प्रवर्ग – १८-३६ वर्षे).

(ब) पोलीस शिपाई चालक पदांसाठी – खुला – १९-२८ वर्षे, मागास प्रवर्ग/अनाथ – १९-३३ वर्षे, प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त – १९-४५ वर्षे, अंशकालीन पदवीधर – १९-५५ वर्षे (माजी सैनिकांवर अवलंबून असलेले (मुलगा, मुलगी, पत्नी) खुला – १९-३१ वर्षे, मागास प्रवर्ग – १९-३६ वर्षे).

(क) SRPF सशस्त्र पोलीस शिपाई – खुला – १८-२५ वर्षे, मागास प्रवर्ग/अनाथ – १८-३० वर्षे, प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त – १८-४५ वर्षे, अंशकालीन पदवीधर – १८-५५ वर्षे, (माजी सैनिकांवर अवलंबून असलेले (मुलगा) – खुला – १८-२८ वर्षे, मागास प्रवर्ग – १८-३३ वर्षे).

सर्व पदांसाठी खेळाडू उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत ५ वर्षांची सूट मिळेल.

दि. १ जानेवारी २०२२ ते दि. ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत ज्या उमेदवारांनी कमाल वयोमर्यादा ओलांडली आहे, असे सर्व प्रवर्गाचे उमेदवार भरती प्रक्रियेसाठी पात्र आहेत.

पात्रता – सर्व पदांसाठी (पोलीस शिपाई बँड्समन पद वगळता) (अ) १२ वी उत्तीर्ण किंवा समतूल्य पात्रता. ((i) यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक (विद्यापीठाची पूर्व परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रथम वर्ष उत्तीर्ण झालेला वा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पदवी धारण केलेला उमेदवार)).

बॅण्ड्समन पदासाठी – १० वी उत्तीर्ण. (बँड पथकातील वाद्यांची माहिती व वाद्य वाजविण्याचा अनुभव.)

(ब) माजी सैनिक – १५ वर्षे. सैनिकी सेवा पूर्ण असणाऱयांच्या बाबतीत नागरी परीक्षा १० वी उत्तीर्ण किंवा IASC (Indian Army Special Certificate of Education) प्रमाणपत्र.

शारीरिक पात्रता – (अ) पोलीस आयुक्त/पोलीस अधीक्षक यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई तसेच पोलीस शिपाई बँड्समन/कारागृह शिपाई पदांसाठी उंची – पुरुष – किमान १६५ सें.मी. महिला – किमान १५५ सें.मी. छाती – पुरुष – ७९-८४ सें.मी.

निवड पद्धती – (I) शारीरिक चाचणी

कौशल्य चाचणी फक्त पात्रता स्वरूपाची असेल.

(II) लेखी चाचणी – शारीरिक चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवार रिक्त पदांच्या १ë१० प्रमाणात १०० गुणांच्या लेखी चाचणीसाठी निवडले जातील. लेखी परीक्षेत किमान ४० टक्के गुण मिळविणे आवश्यक. लेखी चाचणीचा कालावधी ९० मिनिटांचा असेल व लेखी चाचणी मराठी भाषेत घेण्यात येईल. सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे असतील.

संपूर्ण राज्यभर सर्व पोलीस घटकांच्या भरती प्रक्रियेतील एका पदाकरिता लेखी परीक्षा ही एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल.

अर्ज ऑनलाइन भरण्याकरिता आवश्यक माहिती policerecruitment२०२५.mahait.org व http://www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. उमेदवार एकाच घटकात एका पदासाठी एकापेक्षा जास्त अर्ज सादर करू शकत नाही.

ऑनलाइन अर्ज policerecruitment२०२५.mahait.org या संकेतस्थळावर ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत करावेत.

भरतीसंबंधित शंकासमाधानासाठी ई-मेल आयडी – mahapolicerecruitment.support@mahatait.org किंवा फोन नं. – ०२२-६१३१६४१८.