Maharashtra Postal Circle Bharti 2023: महाराष्ट्र टपाल विभागाने तब्बल १२ हजार ८२८ पदांच्या भरतीची जाहिरात प्रकाशित केली आहे. या भरतीअंतर्गत ‘ग्रामीण डाक सेवक’ पदांच्या१२ हजारांहून अधिक रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीची सध्या शॉर्ट नोटिफिकेशन आले असून भरतीसाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. टपाल विभागाच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण आणि महत्वाच्या तारखा याबाबतची माहिती जाणून घेऊया.

महाराष्ट्र टपाल विभाग भरती २०२३ –

Central government confirms purchase of five lakh metric tonnes of onions from Maharashtra
निवडणुकीत कांदाखरेदीचा प्रचार? महाराष्ट्रातून पाच लाख मेट्रिक टन कांदाखरेदीची केंद्राची ग्वाही
Postponement of physical test of PSI by MPSC Pune print news
एमपीएससीकडून ‘पीएसआय’ची शारीरिक चाचणी लांबणीवर
Pune, ring Road Project, farmers, financial complaint, Land Acquisition, Collector Issues Warning, government Officers,
पुणे : ‘रिंगरोडचे भूसंपादन करताना तक्रारी आल्यास…’ जिल्हाधिकाऱ्यांची तंबी
Paper leak Examination Malpractices Act Report submitted by Nimbalkar Committee
पेपरफुटी, परीक्षेतील गैरप्रकारांवर कायदा! निंबाळकर समितीकडून अहवाल सादर

पदाचे नाव – ग्रामीण डाक सेवक

  • शाखा पोस्ट मास्टर
  • सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर
  • डाक सेवक

अंदाजे पद संख्या – १२ हजार ८२८

हेही वाचा- १२ वी पास उमेदवारांना भारतीय हवाई दलात नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदांसाठी भरती सुरु, आजच करा अर्ज

शैक्षणिक पात्रता –

भारत सरकार/राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेशांद्वारे भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळाद्वारे आयोजित गणित आणि इंग्रजीमध्ये १० वी पास झालेले माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र ही GDS च्या सर्व मान्यताप्राप्त श्रेणींसाठी अनिवार्य शैक्षणिक पात्रता असणार आहे. (सविस्तर माहितीसाठी PDF पाहा)

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारतात कुठेही

वयोमर्यादा – १८ ते ४० वर्षादरम्यान

अर्जाची पद्धत – ऑनलाईन

महत्वाच्या तारखा –

  • अर्ज सुरु होण्याची तारीख – २२ मे २०२३
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख -११ जून २०२३

अधिकृत वेबसाईट – http://www.indiapost.gov.in

पगार –

हेही वाचा- खुशखबर! Amazon भारतात करणार मोठी गुंतवणूक, वर्षाला तब्बल दीड लाख नोकऱ्या निर्माण होणार

  • शाखा पोस्ट मास्टर – १२ हजार ते २९ हजार ३८० रुपये.
  • सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर / डाक सेवक – १० हजार ते २४ हजार ४७० रुपये.

भरतीसंबंधी अधिकची माहिती तसेच सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी https://drive.google.com/file/d/1reZZNn0qH1hj9tTkBuL_iAHVgqgySYhG/view या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

असा करा अर्ज –

  • या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचावी.
  • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती भरा, अपूर्ण अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
  • अर्जा करण्यासाठीच्या सविस्तर सूचना https://indiapostgdsonline.gov.in या बेवसाईटवर उपलब्ध आहेत.
  • परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.