इ. १ ली ते ५ वी (पेपर-१) व इ. ६ वी ते ८ वी (पेपर-२) साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित/ विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक/शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमत ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. या परीक्षेशी संबंधित सर्व शासन निर्णय, अनुषांगिक माहिती, सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

अनिवार्य पात्रता – इ. १ ली ते ५ वी (पेपर-१) एसएससी उत्तीर्ण आणि टिचर एज्युकेशन डिप्लोमा (D.Ed. आणि समतूल्य/इ. ६ वी ते ८ वी (पेपर-२) एसएससी आणि पदवी आणि टिचर एज्युकेशन डिप्लोमा (D.Ed.) आणि समतूल्य) किंवा बी.एड्. दोन्ही पेपरसाठी (पेपर-१ व पेपर-२) – एसएससी आणि पदवी आणि टिचर एज्युकेशन डिप्लोमा (D.Ed. आणि समतूल्य).


परीक्षा पद्धती – संकेतस्थळावरील मुख्य पृष्ठावरील महत्त्वाच्या सूचनामधील विषय आराखडामध्ये उपलब्ध आहे.

  • पेपर-१ – (इ. १ ली ते ५ वी) विभाग-१ – भाषा – ३० गुण, विभाग-२ – भाषा – ३० गुण, विभाग-३ – बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र – ३० गुण, विभाग-४ – गणित – ३० गुण, विभाग-५ – परिसर अभ्यास – ३० गुण. एकूण १५० प्रश्न, १५० गुण.
  • पेपर-२ – (इ. ६ वी ते ८ वी) – विभाग-१ – भाषा – ३० गुण, विभाग-२ – भाषा – ३० गुण, विभाग-३ – बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र – ३० गुण, विभाग-४ – गणित व विज्ञान – ६० गुण किंवा सामाजिक शास्त्रे – ६० गुण. एकूण १५० प्रश्न, १५० गुण.

उमेदवार ज्या जिल्हा केंद्रावर परीक्षा देणार आहे, तो जिल्हा ड्रॉपडाऊन लिस्टमधून निवडा. ज्या वर्गासाठी (स्तरासाठी) शिक्षक पात्रता परीक्षा द्यावयाची आहे, ते ड्रॉपडाऊन लिस्टमधून निवडा. इ. १ ली ते ५ वी (पेपर-१) व इ. ६ वी ते ८ वी (पेपर-२) साठी अर्जदार पात्र असल्यास आणि दोन्ही पेपरसाठी बसण्यास इच्छुक असल्यास BOTH (दोन्हीसाठी) हा पर्याय निवडा. (दोन्ही पेपरसाठी स्वतंत्र अर्ज करण्याची आवश्यकता नाही.)

उमेदवाराने अर्ज करताना जे माध्यम निवडले असेल ते या परीक्षेसाठी प्रथम भाषा म्हणून ग्राह्य असेल.

द्वितीय भाषा अचूकपणे निवडा. प्रथम भाषा मराठी निवडल्यास द्वितीय भाषा इंग्रजी अनिवार्य असेल. प्रथम भाषा इंग्रजी निवडल्यास द्वितीय भाषा मराठी असेल. तसेच प्रथम भाषा (उर्दू/बंगाली/तेलुगू/कन्नडा/हिंदी/सिंधी) निवडल्यास द्वितीय भाषा मराठी किंवा इंग्रजी निवडता येईल.

परीक्षा शुल्क

  • पेपर-१ – रु. १,०००/-. (अजा/अज/दिव्यांग रु. ७००/-)
  • पेपर-२ – रु. १,०००/-. (अजा/अज/दिव्यांग रु. ७००/-)
  • पेपर-१ व पेपर-२ – रु. १,२००/-. (अजा/अज/दिव्यांग रु. ९००/-)
  • प्रवेशपत्र ऑनलाइन प्रिंट काढून घेणे – दि. ९ ते २१ जून २०२६.
  • शिक्षक पात्रता परीक्षा पेपर-१ दिनांक व वेळ – रविवार, दि. २१ जून २०२६, वेळ १०.३० ते १३.००
  • शिक्षक पात्रता परीक्षा पेपर-२ दिनांक व वेळ – रविवार, दि. २१ जून २०२६, वेळ १४.३० ते १७.००

परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन करताना कोणतेही कागदपत्र अपलोड करावयाची नाहीत. परंतु ऑनलाइन अर्जासोबत फोटोग्राफ, स्वाक्षरी, आयडी प्रूफ, स्वहस्ते लिहिलेले घोषणापत्र (ज्यावर उमेदवाराने डाव्या अंगठ्याची निशाणी लावलेली असावी.) स्कॅन करून अपलोड करावयाची आहेत.

  • ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या ‘सूचना’ नीट वाचाव्यात.
  • ऑनलाइन अर्ज https://mahatet.in या संकेतस्थळावर दि. १६ एप्रिल २०२६ पर्यंत करावेत.

तांत्रिक अडचणींसाठी हेल्पलाईन क्र. ९०२८४७२६८१/८२/८३ (सोमवार ते शनिवार १०.०० ते १८.००), ई-मेल आयडी mahatet२०२४msce@gmail.com