scorecardresearch

Premium

इंजिनीअर्सना नोकरीची मोठी संधी! महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत ‘या’ पदांसाठी भरती सुरु

भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, नोकरीचे ठिकाण आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ या.

Mahatransco Recruitment 2023
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड भरती २०२३. (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Mahatransco Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड (Mahatransco) मध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. या भरती अंतर्गत कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उप कार्यकारी अभियंता आणि सहाय्यक अभियंता पदांच्या एकूण ५९८ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, नोकरीचे ठिकाण आणि अर्ज करण्याची शेवटची तारीक याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ या.

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड भरती २०२३-

The state board will also test the open book examination system
ओपन बुक परीक्षा पद्धतीची राज्य मंडळही करणार चाचपणी
Mahavitaran Recruitment 2024
Mahavitaran Recruitment 2024 : महावितरणामध्ये ६० रिक्त जागांसाठी भरती सुरू; जाणून घ्या, अर्ज करण्याची शेवटची तारीख
maharashtra HSC Board Exam 2024 maharashtra board hsc exam start from today
बारावीची परीक्षा आजपासून; गैरप्रकार रोखण्यासाठी व्यापक उपाययोजना
Pune jobs ESIS pune is hiring for medical officer
ESIS Pune Recruitment 2024 : महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्थेत भरती सुरू; पाहा अधिक माहिती….

शैक्षणिक पात्रता

कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन) : इलेक्ट्रिकल विषयात इंजिनीअरिंग पदवी + ९ वर्षे अनुभव किंवा अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून २ वर्षे अनुभव.

अतिरिक्त कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन) : इलेक्ट्रिकल विषयात इंजिनीअरिंग पदवी + ७ वर्षे अनुभव किंवा उपकार्यकारी अभियंता म्हणून २ वर्षे अनुभव.

उप कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन) : इलेक्ट्रिकल विषयात इंजिनीअरिंग पदवी + ३ वर्षे अनुभव.

सहाय्यक अभियंता (ट्रान्समिशन) : इलेक्ट्रिकल विषयात इंजिनीअरिंग पदवी.

सहाय्यक अभियंता (टेलीकम्युनिकेशन) : इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन विषयात इंजिनीअरिंग पदवी.

हेही वाचा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ‘या’ पदासाठी भरती सुरु, अर्जाची पद्धत जाणून घ्या

वयोमर्यादा –

  • खुला प्रवर्ग – वयोमर्यादा पाहण्यासाठी जाहिरात पाहा.
  • मागासवर्गीय – ५ वर्षे.

अर्ज फी –

  • खुला प्रवर्ग – ७०० रुपये.
  • मागासवर्गीय – ३५० रुपये.

नोकरी ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र.

अधिकृत बेवसाईट – https://www.mahatransco.in/

महत्वाच्या तारखा –

  • ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – ४ ऑक्टोबर २०२३
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २४ ऑक्टोबर २०२३

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक – https://ibpsonline.ibps.in/msetclaug23/

भरती संबंधित अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

कार्यकारी अभियंता – (https://drive.google.com/file/d/1sIcrnZnEfqN1Kg3NWuPS2kGgT7WJpNW1/view)

अतिरिक्त कार्यकारी अभियंता – (https://drive.google.com/file/d/1s-Lud3TDKL2llei4VbCMSuSALwGG0DUX/view)

उप कार्यकारी अभियंता – (https://drive.google.com/file/d/1of9n_K-zLiN_8x7svmMg6PJRQJBkw4dl/view)

सहाय्यक अभियंता – (https://drive.google.com/file/d/1bwAiUP_r1i8qB2ABrFLsTdVYyZRuB6Hm/view)

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mahatransco bharati 2023 job opportunities for engineers maharashtra state electricity transmission company recruitment for these posts jap

First published on: 05-10-2023 at 13:57 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×