Mahila Bal Vikas Vibhag Nashik Recruitment 2023: महिला व बाल विकास विभागातील विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत जवळपास १४ विविध पदासांठीच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. महिला बाल विकास विभाग नाशिक (WCD नाशिक) भरती मंडळ, नाशिक यांनी एप्रिल २०२३ च्या जाहिरातीत या १४ रिक्त पदांची घोषणा केली होती. त्यानुसार ही भरती केली जाणार आहे. भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया. महिला बाल विकास विभाग नाशिक भरती २०२३ - पदाचे नाव - शारीरिक शिक्षण तथा योग शिक्षक, मदतनीस तथा पहारेकरी, स्वच्छता कर्मचारी, समुपदेशक, स्वयंपाकी, काळजी वाहक. एकूण रिक्त पदे - १४ हेही वाचा- IT मध्ये नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर! ‘ही’ कंपनी देणार तब्बल १५ हजार फ्रेशर्संना संधी नोकरीचे ठिकाण - नाशिक, मनमाड, मालेगाव. भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता - १० वी पास, पदवीधर, B.P.Ed पदवी. वयोमर्यादा - उमेदवाराचे वय १८ ते ३८ वर्षादरम्यान असावे. मासिक पगार - या भरतीमध्ये निवडलेल्या उमेदवाराला ७ हजार ९४४ ते २३ हजार १७० रुपयांपर्यंत पगार मिळणार. अर्ज करण्याची पद्धत - ऑफलाईन. भरती संदर्भातील अधिकच्या व सविस्तर माहितीसाठी या अधिकृत बेवसाईटला अवश्य भेट द्या. महत्वाच्या तारखा - हेही वाचा- मुंबई महापालिकेत नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदांसाठी भरती सुरु, महिना तब्बल एक लाख पगार मिळणार, आजच अर्ज करा अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख - २५ एप्रिल २०२३ अर्ज करण्याची अंतिम तारीख - ०९ मे २०२३ . अर्ज पाठवण्याचा पत्ता - जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय नाशिक क्लब समोर, नाशिक पुणे रोड, नासर्डी पुलाजवळ, नाशिक ४२२०११. भरतीची जाहिरात पाहण्यासाठी या लिंकला अवश्य भेट द्या.