आशुतोष शिर्के

इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूर या देशांमधील विद्यापीठे अमेरिकेतील अनेक विद्यापीठांपेक्षा कमी किमतीमध्ये जागतिक दर्जाचे शिक्षण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहेत. तेव्हा यूके, ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूरमधील व्यवसाय शिक्षणाच्या संधी, खर्च, शिष्यवृत्ती आणि आव्हाने याबद्दल आजच्या लेखामध्ये जाणून घेऊया.

अलिकडेच पदवी पूर्ण केलेली एक विद्यार्थिनी आणि तिचे पालक माझ्याकडे आले होते. व्यवस्थापन क्षेत्र म्हणजेच मॅनेजमेंट क्षेत्रातील उच्च शिक्षणासाठी भारतामध्ये राहावे की परदेशातील काही विद्यापीठांचा विचार करावा, असा त्यांचा प्रश्न होता. जागतिकीकरणाच्या आजच्या युगात व्यवसाय आणि व्यवस्थापन शिक्षण भारतीय विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होत आहे. कॉर्पोरेट क्षेत्रातील करिअर, उद्याोजकता आणि आंतरराष्ट्रीय संधींची आकांक्षा बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे क्षेत्र एक उत्तम पर्याय आहे.

मॅनेजमेंटच्या क्षेत्रामध्ये उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतील काही विद्यापीठे जगप्रसिद्ध आहेत. हार्वर्ड स्कूल ऑफ बिझनेस, येल स्कूल अशी आघाडीची विद्यापीठे निश्चितच या क्षेत्रातील जागतिक सर्वोत्तम विद्यापीठांमध्ये येतात. परंतु त्याचबरोबर इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूर या देशांमधील विद्यापीठे अमेरिकेतील अनेक विद्यापीठांपेक्षा कमी किमतीमध्ये जागतिक दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देत आहेत. यूके, ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूरमधील व्यवसाय शिक्षणाच्या संधी, खर्च, शिष्यवृत्ती आणि आव्हाने याबद्दल आजच्या लेखामध्ये जाणून घेऊया.

● या देशांमधील व्यवसाय शिक्षण का?

यूके, ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूर हे देश व्यवसाय शिक्षणासाठी जगभरात प्रसिद्ध आहेत. यूकेमधील लंडन बिझनेस स्कूल आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या सईद बिझनेस स्कूल ( Said Business School) सारख्या संस्था एमबीए आणि व्यवस्थापन अभ्यासक्रमांसाठी जगातील सर्वोत्तम संस्था मानल्या जातात. ऑस्ट्रेलियामधील युनिव्हर्सिटी ऑफ मेलबर्न आणि ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटी ( ANU) व्यावहारिक शिक्षण आणि उद्याोगांशी असलेले नेटवर्क यासाठी ओळखल्या जातात. सिंगापूर आशियातील प्रमुख आर्थिक केंद्र असल्याने तेथील सिंगापूर मॅनेजमेंट युनिव्हर्सिटी ( SMU) आणि INSEAD ही विद्यापीठे जागतिक कॉर्पोरेट नेटवर्किंगसाठी उत्तम पर्याय आहेत.

● खर्च आणि शिष्यवृत्ती

परदेशातील व्यवसाय शिक्षणाचा खर्च हा भारतामध्ये होणार्या खर्चापेक्षा निश्चितच अनेक पटीने अधिक आहे. यूकेमधील एमबीए प्रोग्रामची वार्षिक फी २०-४० लाख रुपये, ऑस्ट्रेलियामध्ये १५-३० लाख रुपये आणि सिंगापूरमध्ये १०-२५ लाख रुपये आहे. ही फी भारतातील काही खाजगी बी-स्कूल्स च्या फी इतकीच वाटत असली तरी परदेशामध्ये करवा लागणारा राहण्याचा खर्च (किमान ८-१२ लाख रुपये प्रतिवर्ष) आणि इतर खर्च मिळून हा आकडा वाढतो. याचसाठी उपलब्ध असलेल्या अनेक शिष्यवृत्ती यातून मार्ग काढण्यास मदत करू शकतात. यूकेमधील Chevening Scholarship, ऑस्ट्रेलियातील ऑस्ट्रेलिया अवॉर्ड्स आणि सिंगापूरमधील SMU ग्लोबल इम्पॅक्ट स्कॉलरशिप भारतीय विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या ठरतात.

● आव्हाने आणि उपाय

परदेशातील शिक्षण घेताना अर्थातच काही आव्हाने समोर उभी राहतात. यूके आणि ऑस्ट्रेलियातील हवामान आणि सांस्कृतिक फरक या दोन बाबींशी जुळवून घेणे भारतीय विद्यार्थ्यांसाठी त्रासदायक ठरू शकते. सिंगापूरमधील राहणीमानाचा खर्च हा बराच जास्त आहे, परंतु येथे शिक्षण घेताना अंशकालीन नोकऱ्या (२० तास/आठवडा) करता येतात आणि त्यामुळे हा अधिकचा खर्च भागवता येतो. भाषेची अडचण टाळण्यासाठी IELTS/ TOEFL ची तयारी आणि स्थानिक भारतीय विद्यार्थी गटांशी संपर्क महत्त्वाचा ठरतो.

● करिअरच्या संधी

व्यवसाय शिक्षणानंतर करिअरच्या अनेक संधी जगभर उपलब्ध आहेत. यूकेमधील पदवीधर फायनान्स आणि कन्सल्टिंग क्षेत्रात लंडनसारख्या शहरांत नोकरी मिळवतात. ऑस्ट्रेलियातील विद्यार्थी मायनिंग, टेक्नॉलॉजी आणि स्टार्टअप्समध्ये काम करतात, तर सिंगापूरमधील पदवीधर आशियाई कॉर्पोरेट क्षेत्रात आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये यशस्वी होताना दिसत आहेत. उद्याोजकतेसाठीही हे तिन्ही देश उत्तम संधी देतात.

विद्यार्थ्यांसाठी टिप्स

● तयारी : GMAT/ IELTS साठी लवकर तयारी सुरू करा आणि विद्यापीठाच्या वेबसाइटवर प्रवेश आवश्यकता तपासा.

● नेटवर्किंग: लिंक्डइनवर माजी विद्यार्थ्यांशी संपर्क साधा आणि त्यांचे अनुभव जाणून घ्या.

● आर्थिक नियोजन : शिष्यवृत्ती आणि कर्ज पर्यायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याआधी लवकर अर्ज करा.

प्रमुख अभ्यासक्रम आणि विद्यापीठे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

mentorashutosh@gmail.com