महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत पुढील एकूण ५५२ पदांच्या भरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ( MPSC) ‘महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६’ रविवार, १४ जून २०२६ रोजी महाराष्ट्रातील ३७ जिल्हा केंद्रांवर घेण्यात येईल. 

(१) सहायक कक्ष अधिकारी गट-ब – महाराष्ट्र लोकसेवा आयोग – ६ पदे (अजा – १, भज-ड – १, इमाव – २, आदुघ – १, साशैमाव – १).

(२) राज्य कर निरीक्षक गट-ब (वित्त विभाग) – २३६ पदे (अज – २८, भज-ब – ५, भज-क – २, भज-ड – १, इमाव – २४, साशैमाव – २३, आदुघ – २३, खुला – १३०) (९ पदे अपंग  कॅटेगरी  B/ LV – s,  D/ HH – t,  CP/ LC/ Dw etc. – २,  ID/ SLD – २ साठी राखीव) (अनाथ उमेदवारांसाठी २ पदे राखीव).

(३) पोलीस उपनिरीक्षक, गट-ब (अराजपत्रित) – ३१० पदे (अजा – ३०, अज – २६, विजा-अ – १३, भज-ब – ९, भज-क – १५, भज-ड – ८, इमाव – ८२, विमाप्र – ७, साशैमाव – ३१, आदुघ – ३१, खुला – ५८) (९ पदे  अपंग कॅटेगरी  B/ LV – s,  D/ HH – t,  CP/ LC/  Dw etc. – s,  ID/ SLD – २ साठी राखीव) (अनाथ उमेदवारांसाठी २ पदे राखीव).

पोलीस उपनिरीक्षक पदासाठी शारीरिक पात्रता – उंची – पुरुष – १६५ सें.मी., महिला – १५७ सें.मी.; छाती – पुरुष – ७९-८४ सें.मी.  पोलीस उपनिरीक्षक पदासाठी दिव्यांग उमेदवार पात्र नाहीत.

जाहिरातीमध्ये नमूद संवर्गातील पदांव्यतिरिक्त प्रस्तुत परीक्षेमधून भरण्यात येणार्या जाहिरातीत नमूद नसलेल्या उर्वरित संवर्गातील पदांचा यामध्ये समावेश पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर करण्यापूर्वी प्रसिद्ध केला जाईल. विद्यमान संवर्गातील पदसंख्येमध्ये बदल/वाढ होण्याची शक्यता विचारात घेवून उमेदवारांनी पूर्व परीक्षेकरिता अर्ज सादर करणे आवश्यक राहील. पदांमधून महिलांसाठी ३०% पदे आणि ५% पदे खेळाडूंसाठी राखीव आहेत.

शैक्षणिक पात्रता –

(i) सर्व पदांसाठी पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता. (पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेस बसणारे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत). मुख्य परीक्षेकरिता अर्ज स्वीकारण्यासाठी विहीत केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक.

वयोमर्यादा – ( १ ऑगस्ट २०२६ रोजी) (१) राज्य कर निरीक्षक, सहायक कक्ष अधिकारी पदांसाठी अमागास – १८ ते ३८, मागासवर्गीय/आदुघ/अनाथ खेळाडू – १९-४३, अपंग  – १९-४५ वर्षे. (२) पोलीस उपनिरीक्षक – १९-३१ वर्षे, मागासवर्गीय/ आदुघ/ अनाथ – ३४ वर्षे, खेळाडू, मा.सै. – १९-३६ वर्षे.

वेतनश्रेणी – (i) पद क्र. २ व ३ साठी – एस-१४ रु. ३८,६००/- – १,२२,८००/-; (i i) सहायक कक्ष अधिकारी – एस-१६ रु. ४४,९००/- – १,४२,४००/- अधिक महागाई भत्ता व अधिक नियमांनुसार देय इतर भत्ते.

निवड पद्धती – परीक्षेचे टप्पे – (१) सर्व पदांसाठी संयुक्त पूर्व परीक्षा – १०० गुण, (२) मुख्य परीक्षा ४०० गुण, मुख्य परीक्षा संबंधित संवर्गाची/पदांची कर्तव्ये व जबाबदाऱया आणि अभ्यासक्रम लक्षात घेवून स्वतंत्रपणे आयोजित केली जाईल. सर्व पदांसाठी संयुक्त पूर्व परीक्षा घेतली जाईल. (सामान्य क्षमता चाचणी – वस्तुनिष्ठ बहुपर्यायी एकूण १०० प्रश्न, १०० गुण, वेळ १ तास, माध्यम मराठी व इंग्रजी  – चालू घडामोडी, इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, राज्य शास्त्र, सामान्य विज्ञान, बुद्धीमापन चाचणी व अंकगणित).

चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण वजा केले जातील.

परीक्षा शुल्क – आमागास –

रु. ३९४/-, मागासवर्गीय/ आदुध/ अनाथ – रु. २९४/-. प्रस्तुत परीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम आयोगाच्या  ww.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना  https://mpsconline.gov.in तसेच  https://mpsc.gov.inया संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

ऑनलाइन अर्ज  https://mpsc.online.gov.in या संकेतस्थळावर ३० एप्रिल २०२६ (२३.५९ वाजे) पर्यंत करावेत.