राज्य सेवा मुख्य परीक्षेमधील सामान्य अध्ययन पेपर एकमधील कृषिविषयक घटकाच्या मृदा आणि जलव्यवस्थापन या मुद्द्यांची तयारी कशी करावी ते या लेखामध्ये पाहू.

मृदा

History of Geographyn History of the Earth Geological timescale
भूगोलाचा इतिहास: खडकातील पाऊलखुणा!
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
MPSC Mantra State Services Main Exam Science and Technology
MPSC मंत्र: राज्यसेवा मुख्य परीक्षा; विज्ञान व तंत्रज्ञान
maharashtra assembly election 2024, Mahayuti Campaign, Palghar, Dahanu,
महायुतीच्या प्रचारात गुजरातमधील निरीक्षकांची देखरेख
Thane district, 578 children came under education stream, Survey of out of school children
ठाणे जिल्ह्यातील ५७८ मुले आली शिक्षणाच्या प्रवाहात
Mahayutti candidates pressurize to extend the harvesting season Mumbai news
गाळप हंगाम लांबवण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांचा दबाव?
indian-constituation
संविधानभान: जातनिहाय जनगणनेची आवश्यकता
savitribai phule pune university diamond jubilee celebration
शहरबात : विद्यापीठ प्राधान्यक्रम कधी ठरवणार?

मृदाविषयी अध्यापनशास्त्रीय संकल्पना म्हणजे इंग्रजी अभ्यासक्रमातील pedology – मृदाशास्त्र/ मृदा विज्ञान असा अर्थ घेऊन अभ्यास करणे समर्पक ठरेल. यामध्ये नैसर्गिक घटक म्हणून मृदेचा अभ्यास केला जातो. मृदा निर्मिती, मृदेचे रासायनिक घटक, मृदेची रचना अणि वर्गीकरण हे मुद्दे यात समाविष्ट होतात.

मृदा तयार होण्याची प्रक्रिया व कारके अभ्यासताना यातील भौतिक व रासायनिक प्रक्रिया; त्यामागचे कारक घटक आणि मृदा निर्मिती करणारे खडक व खनिजे यांच्या टेबलमध्ये नोट्स काढणे व्यवहार्य ठरेल. यातून तयार होणाऱ्या मृदेचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म आणि या गुणाधर्मांचा जमिनीच्या उत्पादकतेवर होणारा परिणाम हे मुद्दे समाविष्ट केले तर विश्लेषणात्मक प्रश्नांची तयारी होईल.

जमिनीचा उभा छेद घेतल्यावर पृष्ठापासूनच्या प्रत्येक पातळीवरचे मृदा घटक आकृती समोर ठेवून अभ्यासल्यास जास्त लक्षात राहतील. त्या त्या पातळीवरील घटकांचे प्रमाण, त्याचा उत्पादकतेवरील परिणाम, प्रदूषणाचे त्यांच्या समतोलावरील परिणाम, त्यांचा समतोल ढासळल्यास होणारे परिणाम असे मुद्दे पहावेत.

मृदेच्या परिसंस्थेतील वनस्पती इत्यादी घटकांशी परस्परसंबंधांचा अभ्यास (edaphology) हा मृदा विज्ञानातील महत्त्वाचा घटक आहे. यातील मुद्द्यांची तयारी पुढीलप्रमाणे करता येईल:

मृदेमधील पिकवाढीसाठी आवश्यक पोषणतत्त्वे, त्यांचे स्वरूप, महत्त्व/कार्य, स्त्रोत, त्यांच्या अभावामुळे व अधिक्यामुळे पिकांवर होणारे परिणाम (रोग/ नुकसान) या बाबीच्या नोट्स टेबलमध्ये काढता येतील.

जमिनीतील सेंद्रीय पदार्थांचा अभ्यास करताना त्यांचे स्त्रोत, स्वरुपे, गुणधर्म, त्यांच्या प्रमाणावर परिणाम करणारे घटक, त्यांचे महत्त्व आणि मृदेच्या गुणधर्मावर होणारे परिणाम या मुद्द्यांच्या आधारे नोट्स काढाव्यात.

मृदेमधील स्थूल, सूक्ष्म वनस्पती आणि प्राणी यांचा अभ्यास त्यांचे मृदा आणि पिकांवरील चांगले व वाईट परिणाम, त्यांच्या अभावी वा आधिक्यामुळे होणारे परिणाम, त्यावरील उपाय, नुकसानकारक जीवांवरील उपाययोजनांचे फायदे, तोटे, समस्या व त्यावरील उपाय अशा मुद्द्यांच्या आधारे टेबलमध्ये नोट्स काढून करावा.

जमिनीच्या प्रदूषणाचे स्त्रोत समजून घेऊन त्यांचा जमिनीवर होणारा परिणाम, त्याचे तोटे, त्यावरील उपाय आणि प्रतिबंध व शमनासाठीचे उपाय असे मुद्दे लक्षात घ्यावेत. रासायनिक/ अजैविक घटकांच्या वापराचे महत्त्व आणि नुकसान या दोन्ही बाजू लक्षात घेणे आवश्यक आहे.

मृदेची धूप व जमिनी खराब / समस्याग्रस्त होणे या समस्या कारणे, स्वरूप, असल्यास प्रकार, परिणाम, उपाय अशा मुद्द्यांच्या आधारे अभ्यासाव्यात. रिमोट सेन्सिंग आणि जीआयएस (GIS) यांचा खराब/ समस्याग्रस्त जमीनीचे निदान आणि व्यवस्थापनाकरिता वापर करण्यामधील शासकीय प्रयत्न, उपक्रम, उपग्रह, प्रक्रिया, वैज्ञानिक तत्त्वे असे मुद्दे लक्षात घ्यावेत.

मृदा संधारणाची गरज, आवश्यकता, त्यातील घटक, समस्या, उपाय, संबंधित शासकीय योजना इत्यादी बाबी समजून घ्याव्यात.

जलव्यवस्थापन:

जल विज्ञान चक्र हा मुद्दा रसायनसास्त्रातील जलचक्राशी संबंधित आहे. जलचक्राच्या प्रत्येक टप्प्यावरील पाण्याचे स्वरूप, प्रमाण, रुपांतरण, इतर घटकांशी समतोल असे मुद्दे यामध्ये अभ्यासायला हवेत.

जलसंधारणाच्या पद्धती अभ्यासताना प्राचीन काळातील ठळक उदाहरणांसहित आधुनिक पद्धतींचा अभ्यास आवश्यक आहे. आधुनिक पद्धतींचे प्रकार, त्यांमधील घटक, जलविज्ञानविषयक संकल्पना/तत्त्वे, त्यांचे फायदे, तोटे, महत्त्व, असल्यास समस्या, त्यांची कारणे व उपाय अशा मुद्द्यांचा अभ्यास आवश्यक आहे.

पाण्याचा ताण/दुष्काळ ही संकल्पना समजून घेऊन नंतर त्यामागची कारणे, त्यामुळे होणारे परिणाम व त्यांवरील उपाय हे मुद्दे पहावेत. पिक निवारण म्हणजे प्रत्यक्षात पिकांमध्ये दुष्काळाचा सामना करण्यासाठी येणारे अनुकुलन आणि अशा अनुकुलन असणाऱ्या प्रजातींची लागवड करण्यासाठीचे प्रयत्न. पाण्याचा ताण सहन करण्यासाठी पिकांमध्ये येणारे अनुकूलन उदाहरणांसहीत लक्षात घ्यावे. दुष्काळ निवारणासाठीचे शासकीय उपक्रम, कार्यक्रम, योजना यांमधील तरतूदी, उद्दीष्टे, मूल्यमापन अभ्यासावे.

पावसाचे पाणी अडवणे आणि साठवणे, भूजलसाठा वाढविणे यासाठीच्या देशातील आणि राज्यातील वेगवेगळ्या पद्धती व त्यांचे महत्त्व, पावसाच्या पाणीसाठ्यास प्रोत्साहन देण्यासाठीच्या उपाययोजना व त्यातील नावीण्यपूर्ण उपक्रम यांचा अभ्यास करावा.

पाणलोट क्षेत्राची संकल्पना समजून घेऊन त्यातील घटक, प्रक्रिया आणि पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनावर परिणाम करणारे घटक बारकाईने अभ्यासावेत. या संकल्पनेतील तत्त्वे आणि तिची उद्दिष्टे व्यवस्थित समजून घ्यावीत.

पर्जन्याश्रयी शेती, कोरडवाहू शेती आणि सिंचित शेती इत्यादी सिंचनावर आधारीत शेतीचे प्रकार व्यवस्थित समजून घ्यायला हवेत. सिंचनाचे प्रकार पुढील मुद्द्यांच्या आधारे त्यांतील फरक, साम्य टेबलमध्ये नोट्स काढून अभ्यासता येतील –

त्यातील पाण्याचा वापर, कालावधी, घेण्यात येणारी पिके (कोणत्या पिकांसाठी उपयुक्त), त्या त्या सिंचनाचे वेळापत्रक ठरविणारे निकष, सिंचनाबरोबर/ सिंचनाद्वारे खते देता येण्याची शक्यता, उत्पादकता

अभ्यासक्रमामध्ये उल्लेख नसला तरी पाटबंधा-यांचे प्रकार, वैशिष्ट्ये, महत्त्व माहीत असावेत.

पाटबंधारे प्रकल्पांची सिंचन कार्यक्षमता (Irrigation Efficiency) आणि पिकांची पाणी वापराची क्षमता (Water Use Efficiency) यांमधील फरक समजून घ्यावा. वेगवेगळ्या पाटबंधारे/सिंचन प्रकल्पांची सिंचन कार्यक्षमता तुलनात्मक टेबलमध्ये अभ्यासावी. तर महत्त्वाच्या पिकांची पाणि वापर क्षमता सिंचन पद्धतीनुसार किती असते याच्याही टेबलमध्ये नोट्स काढाव्यात. या क्षमतांवर परिणाम करणारे घटक, त्याबाबतच्या समस्या, कारणे, परिणाम व उपाय हे मुद्देही अभ्यासणे महत्त्वाचे आहे.

सिंचनासाठी पाण्याची गुणवत्ता ठरविण्याचे निकष, प्रदूषण आणि औद्याोगिक दूषित पाण्याचा सिंचनावरील व सिंचित जमिनी व पिकांवरील परिणाम व्यवस्थित समजून घ्यावेत.

पाणथळ जमिनींचे जलनिस्सारण करण्याची आवश्यकता, त्यासाठीचे उपाय, त्यंचे प्रकार व उपयुक्तता, अशा जमिनींवर घेता येणारी पिके व त्यांची उत्पादकता अशा मुद्द्यांच्या आधारे अभ्यास आवश्यक आहे.

नद्यांची आंतरजोडणी हा घटक आवश्यकता, व्यवहार्यता, समस्या, पर्यावरणाविषयक मुद्दे आणि प्रकल्पांची सद्या:स्थिती या मुद्द्यांच्या आधारे अभ्यासावा.