१) मी, कला शाखेच्या प्रथम वर्षाला (मराठी माध्यम) शिकत आहे. १२वी कला शाखेत मला ८४% गुण मिळाले असून इतिहास (९५), अर्थशास्त्र (९३), हिंदी (९२) व मराठी (८३) या विषयांत चांगली कामगिरी आहे. मी एमपीएससी गट अ व ब परीक्षेची तयारी सुरू केली आहे. मात्र पदवीच्या शिक्षणामध्ये मी इतिहास किंवा मराठी या दोन विषयांपैकी कोणत्या विषयात पदवी घेणे फायद्याचे ठरेल, तथा पदवी पूर्ण केल्यानंतर एमपीएससीत यश न मिळाल्यास, मराठी व इतिहास या विषयांतील माझ्या रस व क्षमतेनुसार कोणते पर्यायी करिअर मार्ग निवडता येतील? – उत्कर्ष मालुसरे, ठाणे.
मराठी वा इतिहास यापैकी कोणता विषय आपल्याला जास्त आवडतो ते महत्त्वाचे आहे. मात्र इतिहास हा विषय घेणे थोडे जास्त फायद्याचे ठरू शकते. कारण सामान्य ज्ञान पेपरमधील इतिहास विषयाची तयारी आपोआप होईल, त्याशिवाय एमपीएससीमध्ये यश न मिळाल्यास पुरातत्त्व विषयात पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी इतिहास विषय उपयोगी पडेल.
करिअर मंत्र
एमपीएससी परीक्षेची तयारी करताना पदवीसाठी इतिहास विषयाची निवड करणे सामान्य अध्ययनाच्या तयारीसाठी आणि पुरातत्त्वशास्त्रातील करिअर संधींसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते.
Written by विवेक वेलणकर

First published on: 10-04-2026 at 01:32 IST | © The Indian Express (P) Ltd
TOPICSइतिहासHistoryएमपीएससीMPSCएमपीएससी परीक्षाMPSC Examएमपीएससी मार्गदर्शनMPSC GuidenceकरिअरCareerमराठी साहित्यMarathi Literatureस्पर्धा परीक्षाCompetitive Exam
+ 3 More
मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mpsc preparation career guidance history vs marathi degree options alternative career paths utkarsh malusare ocd