राज्य सेवा मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपर – ३ मधील तंत्रज्ञान हा घटक सामाजिक समावेशन आणि आर्थिक विकास या दोन्ही आयामांनी महत्त्वाचा आहे. त्यादृष्टीने भारत सरकारच्या तंत्रज्ञान विकासासाठीच्या योजनांबाबतचा एक प्रश्न या लेखामध्ये पाहू-
प्रश्नः भारत सरकारच्या स्टार्टअप योजनांचे तंत्रज्ञान हस्तांतरण, आर्थिक वाढ आणि भारताच्या सर्वांगीण विकासातील योगदानाचे मूल्यांकन करा.
उत्तर १.
भारत सरकारच्या स्टार्टअप योजनांनी देशातील नवकल्पना, उद्योजकता आणि तंत्रज्ञानाधारित विकासाला मोठी चालना दिली आहे. स्टार्टअप इंडिया, स्टार्टअप इंडिया सीड फंड योजना (SISFS), फंड ऑफ फंड्स फॉर स्टार्टअप्स (FFS), स्टार्टअपसाठी क्रेडिट गॅरंटी (CGSS) आणि स्टार्ट अप बौद्धिक संपदा अधिकार संरक्षण (SIPP) या योजनांमुळे भारतात सक्षम स्टार्टअप इकोसिस्टीम निर्माण झाली आहे.
१) तंत्रज्ञान हस्तांतरण
– संशोधन आणि नवकल्पना बाजारात आणण्यास मदत झाली.
– नवतंत्रज्ञानाचे व्यावसायिकीकरण आणि उद्योगांमध्ये वापर वाढला.
– कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्स, ड्रोन, बायोटेक आणि क्लीन एनर्जी यांसारख्या क्षेत्रांत नवकल्पनांना प्रोत्साहन मिळाले.
– उदाहरणार्थ, ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर शेतीतील फवारणीसाठी केला जात आहे, तर हेल्थ-टेक स्टार्टअप्सनी एआय आधारित निदान उपकरणे विकसित केली आहेत.
– SIPP योजनेंतर्गत पेटंट, ट्रेडमार्क आणि डिझाईन नोंदणीसाठी आर्थिक सहाय्य आणि जलद प्रक्रिया उपलब्ध झाली.
२) आर्थिक वाढ
– रोजगारनिर्मिती आणि उद्योजकतेला चालना मिळाली.
– देशांतर्गत व परकीय गुंतवणूक वाढली.
– उत्पादनक्षमता, स्पर्धात्मकता आणि निर्यात वाढण्यास मदत झाली.
– डिजिटल अर्थव्यवस्था आणि नवउद्योग परिसंस्था मजबूत झाली.
– उदाहरणार्थ, फिनटेक, ई-कॉमर्स आणि लॉजिस्टिक्स स्टार्टअप्समुळे जीडीपीमध्ये योगदान वाढले.
– यूपीआय आणि फिनटेक सेवांमुळे व्यवहार सुलभ व पारदर्शक झाले.
– FFS मार्फत SIDBI ने अनेक फंडांमध्ये गुंतवणूक करून स्टार्ट अप्सना निधी उपलब्ध करून दिला.
– CGSS अंतर्गत विनातारण कर्जासाठी क्रेडिट गॅरंटी सुविधा उपलब्ध झाली.
३) सर्वांगीण विकास
– ग्रामीण आणि अर्धशहरी भागात नवीन सेवा व उपाय उपलब्ध झाले.
– शिक्षण, आरोग्य, शेती, ऊर्जा आणि पाणी व्यवस्थापन क्षेत्रांत नाविन्यपूर्ण उपाय विकसित झाले.
– समाजातील सर्व थरांतील नागरीकांच्या उद्योजकतेला चालना मिळाली.
– स्टँड अप इंडिया अंतर्गत अनूसूचित जाती व जमातीमधील उद्योजकांना १० लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंत कर्जसहाय्य उपलब्ध झाले.
– अग्रि-टेक स्टार्टअप्समुळे शेतकऱ्यांना बाजारभाव, हवामान आणि सल्ला सेवा मिळू लागल्या.
– दुर्गम भागांमध्ये शैक्षणिक आणि आरोग्य विषयक स्टार्ट अप्समुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि आरोग्यसेवा उपलब्ध झाले.
शाश्वत विकास ध्येय (SDGs) साध्य करण्यास मदत झाली.
उत्तर २.
स्पष्टीकरण : उत्तर क्र. १ मध्ये प्रश्नामध्ये वुचारलेले सगळे मुद्दे दिसतात. तसेच उदाहरणे देऊन उत्तराची परिणामकारकता वाढवली आहे. पण इंग्रजी शब्दांचा वापर केल्याने उत्तर द्विभाषिक झाले आहे. यासाठी ज्या शब्दांचा मराठी प्रतिशब्द माहीत नसेल, आठवत नसेल किंवा उपलब्धच नसेल असेच शब्द इंग्रजीतून वापरावेत. तेही त्यांचे देवनागरीमध्ये लिप्यंतरण करून. जसे स्टार्टअप हा शब्द.
स्टार्टअप इकोसिस्टीमसाठी स्टार्टअप परिसंस्था हा शब्दच वापरला पाहिजे. क्रेडिट गॅरंटी साठी पतहमी हा शब्द वापरायला हवा. शब्दमर्यादा साधण्यासाठी आधी मराठीतून लिहीलेले इंग्रजीमधील संक्षिप्त स्वरुपातील शब्द पुढे वापरणे चुकीचे नाही. उदा. SISFS, FFS, CGSS, SIPP इ.
उत्तर क्र. २ मध्ये शासनाच्या स्टार्ट अप योजनांची यादी दिली आहे. आणि या प्रश्नामध्ये दिलेल्या तीन मुद्द्यांच्या आधारे या योजनांचे फायदे एकत्रितपणे मांडले आहेत. आणि स्टँड अप इंडिया उपक्रमाचे योगदान सविस्तरपणे तर CGSS, SIPP या योजनांचे स्वरूप लिहिलेले आहे. त्यामुळे उत्तर विस्कळीत वाटते. उत्तरामध्ये सगळे मुद्दे कव्हर झाले असले तरी रचना सुसंबद्ध नसल्याने त्याचा गुणांवर परिणाम होऊ शकतो. एकतर प्रत्येक योजनेचा एक मुद्दा घेऊन त्या योजनेचे उपक्रमाचे योगदान अशा प्रकारे उत्तराची रचना जास्त परिणामकारक ठरली असती. किंवा उत्तर क्र. १ च्या धर्तीवर प्रश्नामध्ये नमूद आयामांचा मुद्दा घेऊन त्यामध्ये वेगवेगळ्या योजनांचे नेमके योगदान उदाहरणांसह नमूद केले असते तर आकृतीमध्ये लिहिल्याने उत्तर जास्त गुणदायी ठरले असते.
