MSRTC Chandrapur Recruitment 2023 : ST महामंडळात काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे महाराष्ट्र राज्य मंडळ परिवहन महामंडळ चंद्रपूर इथे लवकरच एकूण ३५ जागांवर भरती करण्याचत येणार आहे. याबाबतची माहिती MSRTC चंद्रपूरच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करता येणार आहेत.

MSRTC चंद्रपूरच्या अधिकृत वेबसाइटवर या भरतीबाबतची सर्व माहिती दिली आहे. तर या भरतीसाठीचे पात्रता निकष आणि निवड प्रक्रिया कशी असेल याबाबतची सर्व माहिती जाणून घेऊया. या भरतीमध्ये मेकॅनिक डिझेल, पेंटर, वेल्डर आणि मोटार वाहन बॉडी बिल्डर या जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. तर या पदांसाठीच्या एकूण जागा ३५ आहेत.

MGIMS Wardha Bharti 2024
Wardha Jobs : महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था अंतर्गत चार पदांसाठी नोकरीची संधी, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख
Indian Railway Recruitment 2024 RRB RPF Notification 2024
Railway Job: रेल्वेत नोकरीची संधी; ‘या’ पदासाठी रेल्वे विभागाकडून मेगा भरती, कुठे करायचा अर्ज? पगार किती? जाणून घ्या
Law College Student Attendance
विधी महाविद्यालय विद्यार्थी उपस्थिती : ७५ टक्के उपस्थितीच्या नियमाच्या अंमलबजावणीचे आदेश देण्याची न्यायालयाला मागणी
DSSSB Recruitment 2024: Application begins for 650 Caretaker
सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी, ‘या’ पदासाठी होणार भरती; जाणून घ्या संपूर्ण तपशील

हेही वाचा- ITBP Recruitment 2023: कॉन्स्टेबल GD पदासाठी मोठी भरती; जाणून घ्या अर्ज भरण्याची शेवटची तारीख

  • शैक्षणिक पात्रता –

मेकॅनिक डिझेल –

या पदांसाठी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच ITI आवश्यक आहे.

पेंटर –

८ वी पर्यंतच शिक्षण आवश्यक.

वेल्डर –

८ वी पर्यंत शिक्षण गरजेच.

मोटार वाहन बॉडी बिल्डर –

या पदासाठी १० वी पर्यंत शिक्षण घेतलेलं असणं आवश्यक आहे. शिवाय ITI पण आवश्यक आहे.

हेही वाचा- पदवीधरांसाठी खुशखबर! यूपीएससीद्वारे ‘या’ विभागामध्ये होणार आहे मेगा भरती, अर्ज करण्यासाठी वाचा सविस्तर माहिती

पगार –

मेकॅनिक डिझेल पदासाठी ६ हजार ते ८ हजार ३८८ रुपयांपर्यंत प्रतिमहिना पगार मिळणार.

पेंटर पदासाठीचा पगार ५ हजार ते ९ हजार ४३६ रुपये प्रतिमहिना.

वेल्डर पदासाठी ५ हजार ते ९ हजार ४३६ रुपये प्रतिमहिना.

मोटार वाहन बॉडी बिल्डर ६ हजार ते ८ हजार ३८८ रुपये प्रतिमहिना

या जागांसाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवारांना खालीलप्रणाणे अर्ज करता येईल.

  • पात्र उमेदवारांनी MSRTC चंद्रपूर भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी https://msrtc.maharashtra.gov.in/index.php या लिंकला भेट द्या.
  • उमेदवारांना कोणत्याही पदासाठी अर्ज करण्यासाठी पासपोर्ट आकाराच्या फोटोची आणि स्वाक्षरीची सॉफ्ट कॉपी आवश्यक आहे. अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट घ्यायला विसरू नका.