बाल विकास प्रकल्प मुंबई येथे नोकरीची मोठी संधी; ‘या’ पदासांठी होणार भरती, आजच अर्ज करा

बाल विकास प्रकल्प मुंबई भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, पात्रता निकष, वयोमर्यादा याबाबतची अधिक माहिती जाणून घ्या.

Bal Vikas Prakalp Mumbai Anganwadi Bharti 2023
बाल विकास प्रकल्प मुंबई इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Bal Vikas Prakalp Mumbai Anganwadi Bharti 2023: बाल विकास प्रकल्प मुंबई (एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प मुंबई) ने अंगणवाडी मदतनीस या पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांना दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. बाल विकास प्रकल्प मुंबई भरती मंडळ, मुंबई यांनी मार्च २०२३ च्या जाहिरातीत एकूण ३८ रिक्त पदांची घोषणा केली आहे. तर या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, पात्रता निकष, वयोमर्यादा याबाबतचीअधिक माहिती जाणून घेऊया.

बाल विकास प्रकल्प मुंबई अंगणवाडी भरती २०२३ च्या अधिकृत माहितीसाठी https://mumbaicity.gov.in/ या बेवसाईटला अवश्य भेट द्या.

पदाचे नाव –

अंगणवाडी मदतनीस (Anganwadi Helper)

हेही वाचा- महाराष्ट्रातील ‘या’ शहरांमधील सरकारी रुग्णालयात ५ हजार जागांसाठी मेगाभरती; सविस्तर माहिती जाणून घ्या

एकूण रिक्त जागा – ३८

नोकरीचे ठिकाण – मुंबई

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने १२ वी पास, पदवी, पदव्युत्तर, डी. एड. बी एड MS-CIT शिक्षण घेणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

हेही वाचा- लवकरच RBI मध्ये असिस्टंट भरती, अर्ज करण्यापूर्वी परीक्षेचे पात्रता निकष आणि भरती प्रक्रिया जाणून घ्या

वयोमर्यादा –

१८ ते ३५ वर्षादरम्यान

अर्ज करण्याची शेवटची तारीख –

४ एप्रिल २०२३

या भरतीचा ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://mumbaicity.gov.in/ या लिंकला अवश्य भेट द्या.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-03-2023 at 08:00 IST
Next Story
पदवीधारकांसाठी आनंदाची बातमी! सेंट्रल बॅंकेमध्ये ५००० जागांसाठी सुरु झालीये मेगा भरती; जाणून घ्या अर्ज करण्यासाठीचे निकष
Exit mobile version