NABARD Specialist Officers Recruitment 2025 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी नाबार्डमध्ये नोकरीची संधी चालून आली आहे. नाबार्ड म्हणजे नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंटने या भरती प्रक्रियेबाबत अधिसूचना जारी केली आहे. ज्याद्वारे नाबार्डमध्ये ६ स्पेशलिस्ट ऑफिसर पदे भरली जातील. पात्र आणि इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट http://www.nabard.org वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया १६ मे २०२५ पासून सुरू होऊन १ जून २०२५ पर्यंत उमेदवार अर्ज करू शकतात. (NABARD Specialist Officers Recruitment 2025)

रिक्त पदांची संख्या आणि तपशील (NABARD SO 2025 Vacancy)

नाबार्ड स्पेशालिस्ट ऑफिसर्स भरती २०२५ मध्ये तीन प्रमुख पदांसाठी एकूण ६ रिक्त जागा उपलब्ध आहेत. यामध्ये In Charge–Survey Cell – १ पद, Senior Statistical Analyst – १ पद , आणि Statistical Analyst – ४ पदांचा समावेश आहे

शैक्षणिक पात्रता (Nabard Recruitment 2025 Education Qualification)

नाबार्ड स्पेशालिस्ट ऑफिसर्स भरती प्रक्रियेतील पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे एमए/एमएससी मास्टर्स डिग्री असणे आवश्यक आहे, तसेच कमाल १ ते किमान १० वर्षांचा अनुभव गरजेचा आहे. पण शैक्षणिक पात्रतेसंदर्भात तपशीलवार माहिती उमेदवारांनी अधिकृत जाहिरातीत पाहावी.

वयोमर्यादा (Nabard Recruitment 2025 Age Limit)

In Charge–Survey Cell पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ३८ ते ५५ असावे. तर सिनियर स्टॅटिस्टिकल अॅनालिस्ट पदासाठी ३० ते ४५ दरम्यान वय असणे गरजेचे आहे, त्याशिवाय Statistical Analyst पदासाठी उमेदवाराचे वय २४ ते ३० दरम्यान असावे.

नोकरीचे ठिकाण (Nabard Recruitment 2025 Job Place)

या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांना मुंबईतील नाबार्डचे हेड ऑफिसमध्ये पोस्टींग दिली जाईल. त्यामुळे मुंबईत राहणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

अर्ज शुल्क (Nabard Recruitment 2025 Form Fees)

अर्ज भरण्याबरोबर उमेदवारांना अर्ज शुल्कही जमा करावे लागेल. अनुसूचित जाती, जमाती आणि अपंग श्रेणीतील उमेदवारांना १५० रुपये शुल्क भरावे लागेल, सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ८५० रुपये भरावे लागतील.

नाबार्ड एसओ निवड प्रक्रिया २०२५ (Nabard So Selection Process 2025)

नाबार्डमधील या रिक्त जागांसाठी उमेदवारांची निवड केवळ मुलाखतींद्वारे केली जाऊ शकते. लेखी परीक्षा नसू शकते, याचा अर्थ उमेदवारांची वैयक्तिक मुलाखत फेरीद्वारे उमेदवाराची निवड केली जाईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नाबार्ड एसओ २०२५ पगार (Nabard So 2025 Salary)

नाबार्ड स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी भरघोस पगार दिला जाईल. यात In Charge–Survey Cell पदासाठी दरमहा ३ लाख पगार मिळेल, सिनियर स्टॅटिस्टिकल अॅनालिस्ट पदासाठी दरमहा २ लाख आणि Statistical Analyst पदासाठी दरमहा १.२५ लाख पगार मिळणार आहे.