● नॅशनल हायवेज अॅथॉरिटी ऑफ इंडिया ( NHAI) (मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज) डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल) पदांची GATE-२०२५ स्कोअरवर आधारित थेट भरती. पदाचे नाव – डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल).

एकूण रिक्त पदे – ४० (अजा – ५, अज – २, इमाव – ९, ईडब्ल्यूएस – ४, खुला – २०) (प्रत्येकी १ पद अपंग कॅटेगरी – SLD/ MI आणि MD साठी राखीव)

वेतन श्रेणी – पे-लेव्हल – १० (रु. ५६,१०० १,७७,५००) अंदाजे वेतन दरमहा रु. १.१३ लाख

वयोमर्यादा – (९ फेब्रुवारी २०२६ रोजी) ३० वर्षे

पात्रता – ( ९ फेब्रुवारी २०२६ रोजी) सिव्हील इंजिनीअरिंग पदवी आणि सिव्हील इंजिनीअरिंग डिसिप्लिनमधील गेट २०२५ स्कोअर.

निवड पद्धती – शॉर्ट लिस्टेड उमेदवारांमधून इंटरॅक्शन/ इंटरव्ह्यू घेवून अंतिम निवड केली जाईल. शंकासमाधानासाठी NHAI च्या आयटी डिपार्टमेंट टीमशी ०११-२५०७४१००/ २५०७४२०० विस्तार क्र. १०२८ वर किंवा ई-मेल – वर संपर्क साधा.ऑनलाइन अर्ज http:// www. nhai. gov. in या संकेतस्थळावर वर ९ फेब्रुवारी २०२६ (१८.०० वाजे)पर्यंत करावेत.