Premium

नोकरीची संधी

NSCL आपल्या कॉर्पोरेट ऑफिस (नवी दिल्ली), देशभरात स्थित असलेल्या रिजनल/एरिया ऑफिसेस आणि फाम्र्समध्ये पुढील पदांची भरती. एकूण रिक्त पदे – ८९.

job opportunity
(फोटो सौजन्य- प्रातिनिधिक छायाचित्र)

सुहास पाटील suhassitaram@yahoo.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन लिमिटेड (NSCL) (भारत सरकारचा उपक्रम) (Advt.No.RECTT/ INSC/2023) (मिनिस्ट्री ऑफ अ‍ॅग्रिकल्चर अँड फार्मर्स वेल्फेअर).  NSCL आपल्या कॉर्पोरेट ऑफिस (नवी दिल्ली), देशभरात स्थित असलेल्या रिजनल/एरिया ऑफिसेस आणि फाम्र्समध्ये पुढील पदांची भरती. एकूण रिक्त पदे – ८९.

(१) ट्रेनी (अ‍ॅग्री स्टोअर्स) : १२ पदे (इमाव – ६, ईडब्ल्यूएस – ३, खुला – ३) (२ पदे दिव्यांग (कॅटेगरी  VH & HH साठी प्रत्येकी १) साठी राखीव) (१ पद माजी सैनिकांसाठी राखीव).

(२) ट्रेनी (क्वालिटी कंट्रोल) : ३ पदे (इमाव – १, ईडब्ल्यूएस – १, खुला – १).

(३) ट्रेनी (मार्केटिंग) : ६ पदे (अजा – १, अज – २, इमाव – २, ईडब्ल्यूएस – १) (१ पद दिव्यांग कॅटेगरी VH साठी राखीव).

(४) ट्रेनी (अ‍ॅग्रिकल्चर) : ४० पदे (अजा – ९, अज – २, इमाव – १०, ईडब्ल्यूएस – १०, खुला – ९) (३ पदे दिव्यांग कॅटेगरी  VH,  HH आणि MD साठी प्रत्येकी १ पद राखीव) (३ पदे माजी सैनिकांसाठी राखीव).

पद क्र. १ ते ४ साठी पात्रता : बी.एस्सी. (अ‍ॅग्रिकल्चर) किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि एम्एस-ऑफिसचे ज्ञान आवश्यक.

(५) ट्रेनी (स्टेनोग्राफर) : ५ पदे (अज – १, इमाव – ३, खुला – १).

हेही वाचा >>> तब्बल १५० सरकारी पदांसाठी भरती, सुशिक्षित बेरोजगारांना सुवर्णसंधी

पात्रता : १२ वी उत्तीर्ण आणि ऑफिस मॅनेजमेंटमधील ३ वर्षांचा डिप्लोमा (स्टेनोग्राफीसह किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण किंवा पदवी किमान ६०टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि स्टेनोग्राफी सर्टिफिकेट कोर्स आणि संगणकावरील प्रावीण्य.)

(६) मॅनेजमेंट ट्रेनी (इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग) : १ पद (खुला).

पात्रता : इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग पदवी किमान ६०टक्के गुणांसह उत्तीर्ण.

(७) मॅनेजमेंट ट्रेनी (सिव्हील इंजिनीअरिंग) : १ पद (खुला).

पात्रता : बी.ई./बी.टेक. (सिव्हील इंजिनीअरिंग) किमान ६०टक्के गुणांसह उत्तीर्ण.

(८) मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग) : १५ पदे (अजा – १, अज – १, इमाव – ४, ईडब्ल्यूएस – २, खुला – ७).

पात्रता : बी.एस्सी. (अ‍ॅग्री) आणि एमबीए (मार्केटिंग/ अ‍ॅग्रिबिझनेस मॅनेजमेंट) किंवा २ वर्ष कालावधीचा पूर्ण वेळ मार्केटिंग/ अ‍ॅग्रिबिझनेस मॅनेजमेंटमधील पदव्युत्तर पदवी/ पदविका किमान ६०टक्के गुणांसह उत्तीर्ण (१ पद दिव्यांग कॅटेगरी  ऌऌ साठी राखीव).

(९) ज्युनियर ऑफिसर- क (लिगल) : ४ पदे (इमाव – १, ईडब्ल्यूएस – १, खुला – २).

पात्रता : कायदा विषयातील पदवी आणि १ वर्षांचा लिगल मॅटर हाताळण्याचा अनुभव.

(१०) ज्युनियर ऑफिसर (व्हिजिलन्स) : २ पदे (खुला).

पात्रता : पदवी किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि ५ वर्षांचा संबंधित कामाचा अनुभव.

वयोमर्यादा : दि. २५ सप्टेंबर २०२३ रोजी ट्रेनी/ मॅनेजमेंट ट्रेनी पदांसाठी २७ वर्षे; ज्युनियर ऑफिसर पदांसाठी ३० वर्षे. (कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/ अज – ५ वर्षे, दिव्यांग – १० वर्षे)

वेतन/स्टायपेंड : ट्रेनी पदांसाठी स्टायपेंड रु. २३,६६४/- दरमहा, मॅनेजमेंट ट्रेनी पदांसाठी रु. ५५,६८०/- दरमहा, ज्युनियर ऑफिसर पदांसाठी दरमहा वेतन रु. ३७,२२४/-.

निवड पद्धती : ट्रेनी/ज्युनियर ऑफिसर पदांसाठी – स्टेज-१ – लेखी परीक्षा, स्टेज-२ – लेखी परीक्षेतील गुणवत्ता किंवा लेखी परीक्षेतील गुणवत्ता आणि स्किल टेस्ट (स्टेनोग्राफर पदांसाठी इंग्लिश शॉर्टहँड टेस्ट ८० श.प्र.मि. वेगाची आणि इंग्लिश टायिपग टेस्ट ३० श.प्र.मि. वेगाची), स्टेज-३ – कागदपत्र पडताळणी.

हेही वाचा >>> पनवेल पालिकेच्या ३७७ पदांच्या नोकर भरतीसाठी ५४ हजार ५५८ अर्ज, परिक्षेची तारीख लवकरच जाहीर होणार

मॅनेजमेंट ट्रेनी पदांसाठी – स्टेज-१ – लेखी परीक्षा, स्टेज-२ – लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार उमेदवारांना इंटरह्यू आणि कागदपत्र पडताळणीसाठी बोलाविण्यात येईल, स्टेज-३ – लेखी परीक्षा व इंटरह्यूमधील एकत्रित गुणवत्तेनुसार कागदपत्र पडताळणी (लेखी परीक्षेतील गुणांसाठी ७० टक्के वेटेज व इंटरह्यूमधील गुणांसाठी ३० टक्के वेटेज देऊन अंतिम निवड केली जाईल. लेखी परीक्षा/ कॉम्प्युटर बेस्ड् टेस्ट दि. १० ऑक्टोबर २०२३ रोजी घेतली जाईल.)

ट्रेनी – पदांवरील उमेदवार ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर ज्युनियर एक्झिक्युटिव्ह पदावर (वेतन श्रेणी – रु. १७,००० – ६०,०००) निवडले जाऊ शकतात.

मॅनेजमेंट ट्रेनीजना – यशस्वीरित्या ट्रेनिंग पूर्ण केल्यावर ‘असिस्टंट मॅनेजर’ पदावर (वेतन श्रेणी – रु. ४०,००० – १,४०,०००) निवडले जाऊ शकतात. ऑनलाइन अर्ज  http://www.indiaseeds.com या संकेतस्थळावर दि. २५ सप्टेंबर २०२३ पर्यंत करू शकतात.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nscl recruitment 2023 job opportunities in national seeds corporation zws

First published on: 21-09-2023 at 04:44 IST
Next Story
१० वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची मोठी संधी! ! DTP विभागांतर्गत शिपाई पदासाठी भरती सुरु, आजच अर्ज करा