NTPC Recruitment 2024: आजकाल नोकरी शोधण्यासाठी अनेक प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. लोक विविध करिअर मार्गदर्शन वेबसाइट्स, अॅप्स आणि ग्रुप्सद्वारे स्वतःसाठी सर्वोत्तम नोकरी शोधत असतात. कॉलेज पासआउट्सनाही कॅम्पस प्लेसमेंटमध्ये नोकऱ्या मिळतात. तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच. या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचनादेखील जाहीर करण्यात आली आहे. विविध पदांसाठी ही भरती पार पडतेय. चला तर मग झटपट करा अर्ज आणि मिळवा केंद्र शासनाची नोकरी. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. या नोकरीसाठी इच्छुकांना फक्त आणि फक्त ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज करावा लागणार आहे. मात्र, एक गोष्ट लक्षात ठेवा आणि ती म्हणजे आज अर्ज करण्याची शेवटची तारीख असल्याने तुमच्याकडे ही अखेरची संधी आहे. अर्ज करण्यासाठी शेवटचे काही तासच शिल्लक नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन मायनिंग लिमिटेडकडून या भरतीसाठी अर्ज मागविण्याची प्रक्रिया ही १७ जुलैपासून सुरू झाली असून, अर्ज करण्यासाठी आता अवघे काही तासच शिल्लक आहेत. आज या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या नोकरीसाठी इच्छुक असलेल्यांना अर्ज करावा लागणार आहे वय आणि शिक्षणाची अट लागू १४४ पदे ही या भरतीद्वारे भरली जाणार आहेत. विशेष म्हणजे विविध पदांसाठी भरती आहे. मायनिंग ओव्हरमनची ६७ पदे, मॅगझिन इनचार्जची ९ पदे, मेकॅनिक पर्यवेक्षकाची २८ पदे, इलेक्ट्रिकल पर्यवेक्षकाची २६ पदे अशी विविध पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट लागू करण्यात आली आहे. ही नोकरभरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्याने शिक्षणाची अटही पदानुसार लागू करण्यात आलीये. ntpc.co.in. या संकेत्स्थळावर जाऊन आपल्याला नोकरीसाठी अर्ज करावा लागेल. याच साईटवर आपल्याला भरतीसंबंधीची प्रक्रियेची सविस्तर माहितीदेखील मिळेल. ही नोकरी मिळविण्यासाठी तुम्हाला १८ ते ३० वयोगटाची अट लागू करण्यात आलीये. हेही वाचा >> Railways Recruitment 2024: रेल्वे विभागात नोकरीची सुवर्ण संधी; १०८८४ पदांवर बंपर भरती, लगेच करा अर्ज या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला ३०० रुपये फी ही भरावी लागेल. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला काही परीक्षाही द्याव्या लागणार आहेत. विशेष म्हणजे या भरतीतून निवड झालेल्या उमेदवारांना चांगला पगारदेखील मिळणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी अधिसूचनाही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच अर्ज करावा.