सुहास पाटील
एनटीपीसी लिमिटेड (NTPC) (भारत सरकारचा उपक्रम) या भारतातील सर्वांत मोठे वीज निर्मिती, वितरण करणारे महामंडळात ‘इंजिनीअरिंग एग्झिक्युटिव्ह ट्रेनीज (EET)’ पदांची GATE-२०२५ स्कोअरवर आधारित भरती.

शाखांनुसार रिक्त पदांचा तपशील – (संबंधित GATE पेपर कोड कंसात दिला आहे.)

(१) इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग (EE) – १६५ पदे (अजा – २०, अज – १०, इमाव – ४८, ईडब्ल्यूएस – ७, खुला – ८०).

(२) मेकॅनिकल इंजिनीअरिंग (ME) – २१० पदे (अजा – २५, अज – १०, इमाव – २७, ईडब्ल्यूएस – ०, खुला – १४८).

(३) इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रूमेंटेशन इंजिनीअरिंग (EC/IN) – १२५ पदे (अजा – १३, अज – ५, इमाव – ३४, ईडब्ल्यूएस – १२, खुला – ६१).

(४) कॉम्प्युटर सायन्स / इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी इंजिनीअरिंग (CS) – १५ पदे (अजा – २, अज – १, इमाव – ३, ईडब्ल्यूएस – १, खुला – ८).

पात्रता – संबंधित विषयातील पूर्ण वेळ इंजिनीअरिंग पदवी आणि उमेदवार ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंग (GATE-२०२५) परीक्षा उत्तीर्ण असावा.

कमाल वयोमर्यादा – (दि. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी) २७ वर्षे. (वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे, अपंग – १०/१३/१५ वर्षे)

वेतन श्रेणी – (रु. ४०,००० १,४०,०००) (ई-१ ग्रेड) अंदाजे वेतन दरमहा रु. ७५,०००/-.

ट्रेनिंग – निवड झालेल्या उमेदवारांना विविध ठिकाणी १ वर्षाचे ट्रेनिंग दिले जाईल.

नेमणूक – ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर एनटीपीसीच्या देशभरातील विविध प्रोजेक्ट्स (स्टेशन्स, (उपकंपन्या, संयुक्त उपक्रम) मध्ये नेमणूक दिली जाईल.

निवड पद्धती – GATE-२०२५ स्कोअरनुसार शॉर्ट लिस्टेड उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलाविण्यात येईल. पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्तीचे पत्र दिले जाईल.

अर्जाचे शुल्क – खुला/ईडब्ल्यूएस/इमावचे पुरुष उमेदवार – रु. ५००/-; अजा/अज/अपंग/मा.सै. (सर्व कॅटेगरीच्या महिला) यांना फी माफ आहे. (ऑफलाइन मोडने अर्जाचे शुल्क स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही शाखेत पे-इन स्लीप ॲप्लिकेशन पोर्टलवरून प्रिंट काढून NTPC A/c No. : ३०९८७९१९९९३ at CAG Branch मध्ये भरावयाचे आहे.)

ऑनलाइन अर्ज careers.ntpc.co.in किंवा http://www.ntpc.co.in या संकेतस्थळावर GATE-२०२५ रजिस्ट्रेशन नंबर वापरून २५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत करावेत.