ONGC Bharti 2023 : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित (ONGC Limited) अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या काही जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून या भरती अंतर्गत एकून ४४५ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. उमेदवारांना त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे असून अर्ज २१ सप्टेंबर २०२३ पासून सुरु झाले आहेत. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ भरती २०२३




पदाचे नाव – अप्रेंटिस
एकूण पदसंख्या – ४४५
शैक्षणिक पात्रता – संबंधित क्षेत्रातील पदवी/ ITI
हेही वाचा- M.Com आणि डिप्लोमा उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी! CSL अंतर्गत प्रोजेक्ट असिस्टंट पदांसाठी भरती सुरु
वयोमर्यादा – १८ ते २४ वर्षापर्यंत
अर्जाची पद्धत – ऑनलाईन
महत्वाच्या तारखा –
- अर्ज सुरू होण्याची तारीख – २१ सप्टेंबर २०२३
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० सप्टेंबर २०२३
अधिकृत वेबसाईट – http://www.ongcindia.com
असा करा अर्ज –
- भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- भरती संबंधित अधिकच्या माहितीसाटी (https://drive.google.com/file/d/19PKEtJ3ENP3oM8TsM4ifXMEXhrUzJodu/view) या लिंरवरील PDF जाहिरात अवश्य वाचा.