PMC CMYKPY Recruitment 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या १२ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ही बातमी म्हणजे पुणे महानगरपालिकेने नुकतीच विविध विभागांतील रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत ही भरती जाहीर करण्यात आली आहे, ज्या माध्यमातून पुणे महापालिकेत जवळपास ६८१ पदे भरली जाणार आहेत. त्यामुळे पुण्यात नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना ही चांगली संधी आहे. २ सप्टेंबरपासून या नोकरीसाठीची अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार ऑनलाइन पद्धतीने किंवा ऑफलाइन पद्धतीनेही अर्ज करू शकतात.पण, उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी या भरती संबंधित सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा… रिक्त पदाचे नाव आणि पद संख्या (PMC Recruitment 2024) विविध युवा प्रशिक्षण पदे - ६८१ शैक्षणिक पात्रता (PMC CMYKPY Bharti 2024) उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून किंवा विद्यापीठातून १२ वी पास असणे आवश्यक आहे. तसेच इंजिनियिरिंग डिप्लोमा/ डिग्री (B.Tech) प्राप्त उमेदवारही अर्ज करू शकतात. तसेच पदवीधर/पदव्युत्तर पदवी असलेले उमेदवारही अर्ज करण्यास पात्र आहेत. अर्ज सादर करण्याचा पत्ता (CMYKPY Pune Mahanagar Palika Bharti 2024) पुणे महानगरपालिकेचे संबंधित खाते किंवा समाज विकास विभाग, पुणे महानगरपालिका, तळ मजला शिवाजीनगर, पुणे. नोकरीचे ठिकाण : पुणे वयोमर्यादा (PMC CMYKPY Bharti 2024) उमेदवाराचे वय किमान १८ वर्षे आणि किमान ३५ वर्ष असावे. याच वयोगटादरम्यानचे उमेदवार अर्ज करू शकतात पगार या भरती प्रक्रियेमार्फत निवड झालेल्या बारावी उत्तीर्ण उमेदवाराला दरमहा ६००० रुपये वेतन मिळणार आहे, तर डिप्लोमा किंवा आयटीआय झालेल्या उमेदवारास ८००० रुपये आणि पदवी\ पदव्युत्तर पदवी उमेदवारांना दरमहा १०,००० रुपये पगार दिला जाईल. Read More Career News : २.५ कोटींचे पॅकेज! भारतात पुढील २५ वर्षांत ‘या’ १० नोकऱ्यांमध्ये मिळू शकतो गलेलठ्ठ पगार महत्त्वाच्या तारखा आणि लिंक अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३० सप्टेंबर २०२४ पुणे महापालिकेची अधिकृत वेबसाईट pmc.gov.in अर्ज करण्यासाठी थेट लिंक rojgar.mahaswayam.gov.in अधिकृत ऑनलाइन जाहिरात (शेवटच्या लिंकमध्ये ऑफलाइन फॉर्मदेखील आहे, तो डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढून तुम्ही तो पूर्ण भरून कागदपत्रांसह वर दिलेल्या पत्त्यावर पाठवू शकता.)