पंजाब नॅशनल बँक, ह्युमन रिसोर्सेस डिव्हीजन, हेड ऑफिस, नवी दिल्ली अॅप्रेंटिसेस अॅक्ट, १९६१ अंतर्गत ५,१३८ अॅप्रेंटिसेस पदावर २०२५-२६ साठी पदवीधर उमेदवारांची भरती. काही राज्यांतील रिक्त पदे – यातील काही पदे दिव्यांग उमेदवारांसाठी राखीव आहेत.
(१) महाराष्ट्र – एकूण २३२ (अजा – २४, अज – २०, इमाव – ६४, ईडब्ल्यूएस् – २४, खुला – १००).
(i) कोल्हापूर – १४ (अजा – १, अज – १, इमाव – ४, ईडब्ल्यूएस् – १, खुला – 7).
(ii) मुंबई शहर – ४० (अजा – ४, अज – ४, इमाव – ११, ईडब्ल्यूएस् – ४, खुला – १7).(iii) मुंबई पश्चिम – ३९ (अजा – ४, अज – ४, इमाव – ११, ईडब्ल्यूएस् – ४, खुला – १६).
(iv) नागपूर – ३7 (अजा – ४, अज – ३, इमाव – १०, ईडब्ल्यूएस् – ४, खुला – १६).(v) नाशिक – २८ (अजा – ३, अज – ३, इमाव – ८, ईडब्ल्यूएस् – ३, खुला – ११).
(vi) पुणे – ३५ (अजा – ४, अज – १, इमाव – ९, ईडब्ल्यूएस् – ४, खुला – १7).(vii) गोवा (कोल्हापूर) – 7 (अज – १, ईडब्ल्यूएस – १, खुला – ५).
महाराष्ट्र राज्यातील सर्कलनिहाय रिक्त पदे – गुजरात १३८ (गुजराती), कर्नाटक – ६४ (कन्नड), मध्य प्रदेश – १८० (हिंदी), आंध्र प्रदेश – ५६ (हिंदी).
वयोमर्यादा – (दि. १ जानेवारी २०२६ रोजी) २० ते २८ वर्षे. (उमेदवाराचा जन्म दि. २ जानेवारी १९९८ ते १ जानेवारी २००६ दरम्यानचा असावा.) (इमाव – ३१ वर्षे, अजा/अज – ३३ वर्षे, दिव्यांग – ३८/४१/४३ वर्षे) (विधवा/परित्यक्ता/घटस्फोटीत महिला ज्यांनी पुर्नविवाह केलेला नाही – खुला/ईडब्ल्यूएस – ३५ वर्षे, इमाव – ३८ वर्षे, अजा/अज – ४० वर्षे)
पात्रता – (दि. ३१ डिसेंबर २०२५ रोजी) पदवी उत्तीर्ण. उमेदवारांना ज्या राज्यातील जागांसाठी अर्ज करावयाचा आहे, त्या राज्यातील निर्दिष्ट स्थानिक भाषा अवगत असणे आवश्यक आहे. (दि. १ जानेवारी २०२२ नंतर पदवी उत्तीर्ण केलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.)
ट्रेनिंगचा कालावधी – १ वर्षे. (२ आठवड्यांचे बेसिक ट्रेनिंग आणि ५० आठवड्यांचे ऑन जॉब ट्रेनिंग)स्टायपेंड – अॅप्रेंटिसेसना दरमहा ग्रामीण/सेमी अर्बन/अर्बन – रु. १२,३००/- आणि मेट्रो – रु. १५,०००/- स्टायपेंड दिले जाईल.
निवड पद्धती – (i) ऑनलाईन ऑब्जेक्टिव्ह टाईप लेखी परीक्षेत (१) जनरल/ फिनान्शियल अवेअरनेस, (२) जनरल इंग्लिश, (३) क्वांटिटेटिव्ह अँड रिझनिंग अॅप्टिट्यूड, (४) कॉम्प्युटर नॉलेज या विषयांवर आधारित प्रत्येकी २५ प्रश्न. प्रत्येक प्रश्नास १ गुण, एकूण १०० प्रश्न, १०० गुण, वेळ ६० मिनिटे. प्रत्येक विषयासाठी पात्रतेचे किमान गुण मिळविणे आवश्यक नाही. परीक्षेचे माध्यम हिंदी, इंग्रजी. (१० वी किंवा १२ वीला स्थानिय भाषा अभ्यासलेली असल्यास (तसा पुरावा गुणपत्रक/प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक.) त्यांना टेस्ट ऑफ लोकल लँग्वेज द्यावी लागणार नाही.अंतिम निवड वैद्यकीय तपासणीनंतर जाहीर केली जाईल.
लेखी परीक्षेतील कामगिरीवर आधारित राज्यनिहाय व कॅटेगरीनुसार गुणवत्ता यादी बनविली जाईल.प्रतिक्षा यादी – राज्य/कॅटेगरीनिहाय निवडलेल्या उमेदवारांची प्रतिक्षा यादी निकालाच्या दिनांकापासून १ वर्षभरासाठी ठेवली जाईल.
ऑनलाइन परीक्षा मार्च २०२६ च्या पहिल्या आठवड्यात आयोजित केली जाईल. (tentative)ही जाहिरात अॅप्रेंटिस पदासाठी असून बँकेतील नोकरीसंबंधी नाही, याची नोंद घ्यावी.
परीक्षा शुल्क – अजा/अज/महिला दिव्यांग – रु. २००/- जीएसटी-१८, रु. २३६/-. (खुला/इमाव/ईडब्ल्यूएस (पुरुष) उमेदवारांना रु. ८००/- जीएसटी-१८, रु. ९४४/-.) खुला/इमाव/ईडब्ल्यूएस (महिला) – ६००/- जीएसटी-१८, ७०८/-.
निवड प्रक्रियेची माहिती बँकेच्या http://www.pnb.bank.in किंवा http://bfsissc.com या संकेतस्थळावर `Recruitment Section’ मध्ये प्रसिद्ध केली जाईल.अजा/अज, इमाव, ईडब्ल्यूएस, दिव्यांग चे आरक्षण घेवू इच्छिणाऱया उमेदवारांनी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकरिता नेमून दिलेल्या नमुन्यातील (सक्षम अधिकाऱयाने जारी केलेले) Caste/Category सर्टिफिकेट्स सादर करणे आवश्यक.
परीक्षा शुल्क भरलेल्या सर्व उमेदवारांना BFSI-SSC मार्फत परीक्षेची तारीख आणि वेळ याविषयी इंटिमेशन पाठविले जाईल.उमेदवारांनी नेमून दिलेल्या तारखेला आणि वेळी स्वतचा कॅमेरा, डेस्कटॉप किंवा लॅपटॉप किंवा स्मार्टफोन किंवा टॅबलेटवर ऑनलाईन लेखी परीक्षा द्यावयाची आहे. उमेदवारांना अॅप्रेंटिसशिप पोर्टलवर अपलोड केलेले आय्डी प्रूफ परीक्षेच्या वेळी Display करावे लागेल.
रजिस्ट्रेशन/अॅप्लिकेशन प्रोसेस समजून घेवून उमेदवारांनी http://www.pnb.bank.in/Recruitments.aspx या संकेतस्थळावर किंवा http://www.bfsissc.com वरील `Employment Opportunities’ सेक्शनवर आपले नाव रजिस्टर करावे. लागू असलेले परीक्षा शुल्क भरल्यानंतर अर्जदाराने आपले प्रोफाईल पूर्ण करावे. (जर त्यांनी पुढील दोन गव्हर्नमेंट अॅप्रेंटिसशिप पोर्टलवर रजिस्ट्रेशन यापूर्वी केलेले नसेल.)
(i) NAPS अॅप्रेंटिसशिप पोर्टल http://www.apprenticeshipindia.gov.in (Apprentices login/Registration Section)
(ii) https://nats.education.gov.in या NATS अॅप्रेंटिसशिप पोर्टलवर (Student Register/Login Section) आपले नाव रजिस्टर करणे आवश्यक आहे. (ज्या उमेदवारांनी पदवी परीक्षा दि. १ जानेवारी २०२२) त्यानंतर https://beep.bfsissc.com वर लॉगइन करून ऑनलाईन अर्ज दि. ८ फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारी २०२६ पर्यंत करावा.ऑनलाईन अर्ज यशस्वीरित्या सबमिट केल्यावर उमेदवारांना BFSI SSC कडून ई-मेल पाठविला जाईल. ज्यात NAPS अॅप्रेंटिस कोड नंबर आणि/किंवा NATS enrollment number विचारला जाईल.
सुहास पाटील ९८९२००५१७१
