सुहास पाटील पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL). (भारत सरकार, मिनिस्ट्री ऑफ पॉवर अंतर्गत एक महारत्न उपक्रम) PGCIL च्या कॉर्पोरेट सेंटर आणि एकूण १२ रिजन्समध्ये एक वर्षांच्या ट्रेनिंगसाठी एकूण ४२५ डिप्लोमा ट्रेनी पदांची भरती. महाराष्ट्र आणि शेजारील राज्यांमधील ढॅउकछ च्या युनिट्समधील रिक्त पदांचा तपशील -(१) वेस्टर्न रिजन - I, नागपूर (महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगड) - एकूण ७० पदे.(२) वेस्टर्न रिजन - II, वडोदरा (गुजरात, मध्य प्रदेश, दमण, दीव, दादरा-नगर हवेली, महाराष्ट्र) - एकूण ४४ पदे.(३) सदर्न रिजन - I, हैदराबाद (आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटकचा काही भाग) - एकूण ४७ पदे.(४) सदर्न रिजन - II, बंगलोर (कर्नाटकचा काही भाग, तमिळनाडू, केरळ) - एकूण ४८ पदे.(५) नॉर्दर्न रिजन - III (मध्य प्रदेशचा काही भाग, उत्तराखंडचा काही भाग, उत्तर प्रदेशचा काही भाग) - एकूण ५० पदे.ट्रेडनुसार राज्यनिहाय रिक्त पदांचा तपशील -(I) Advt. No. CC/ ०१.०९.२०२३ -(१) डिप्लोमा (इलेक्ट्रिकल) (EE) - महाराष्ट्र - १३, छत्तीसगड - १०, मध्यप्रदेश - १, गोवा - ०. (WR- I - ३५ पदे (अजा - ३, अज - ४, इमाव - २, ईडब्ल्यूएस - ३, खुला - २३); WR- II - ३५ पदे (अजा - ४, अज - ७, इमाव - ६, ईडब्ल्यूएस - ४, खुला - १४); SR- i- ३८ पदे (अजा - ६, अज - २, इमाव - ११, ईडब्ल्यूएस - ३, खुला - १६); SR- II - ४० पदे (अजा - ७, अज - १, इमाव - ९, ईडब्ल्यूएस - ४, खुला - १९); NR- I ४२ पदे (अजा - ७, अज - १, इमाव - ५, ईडब्ल्यूएस - ४, खुला - २५) (२) डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्स (EC) - महाराष्ट्र - १ (WR- II - २ पदे (इमाव - १, खुला - १); SR- I - २ पदे (इमाव - १, खुला - १); SR- II - - ३ पदे (इमाव - १, खुला - २))(३) डिप्लोमा (सिव्हील) (CE) - महाराष्ट्र - ३, छत्तीसगड - २ (WR- I- ५ पदे (अजा - १, ईडब्ल्यूएस - १, खुला - ३); WR- II - ७ पदे (अज - १, इमाव - १, खुला - ५); SR- I - ७ पदे (अजा - १, अज - १, इमाव - १, ईडब्ल्यूएस - १, खुला - ३); SR- II - ५ पदे (अजा - २, खुला - ३); NR- III - ८ पदे (अजा - १, इमाव - १, ईडब्ल्यूएस - १, खुला - ५)).स्टायपेंड : उमेदवारांना १ वर्षांच्या ट्रेनिंग दरम्यान दरमहा रु. २७,५००/- स्टायपेंड दिले जाईल.कमाल वयोमर्यादा : (दि. २३ सप्टेंबर २०२३ रोजी) २७ वर्षे (इमाव - ३० वर्षे, अजा/अज - ३२ वर्षे, दिव्यांग - ३७ वर्षे). पात्रता : डिप्लोमा इलेक्ट्रिकल (एए) ट्रेनी - इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल (पॉवर)/ इलेक्ट्रिकल अॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स/ पॉवर सिस्टीम इंजिनीअिरग/ पॉवर इंजिनीअिरग (इलेक्ट्रिकल) डिप्लोमा.डिप्लोमा सिव्हील (CE) ट्रेनी - सिव्हील इंजिनीअिरग डिप्लोमा.डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्स (EC) ट्रेनी - इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेली कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन/ टेली कम्युनिकेशन इंजिनीअिरग डिप्लोमा. वरील तीनही पदांसाठी उमेदवार पूर्ण वेळ इंजिनीअिरग डिप्लोमा किमान ७०टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा. उच्च शैक्षणिक अर्हता (जसे की संबंधित विषयातील पदवी, पदव्युत्तर पदवी) धारक उमेदवार अर्ज करण्यास पात्र नाहीत.निवड पद्धती : पात्र उमेदवारांची ऑब्जेक्टिव्ह टाईप लेखी परीक्षा (ऑक्टोबर २०२३ मध्ये होईल.) (कॉम्प्युटर बेस्ड् टेस्ट) - २ तास कालावधी (पार्ट-१ - टेक्निकल नॉलेज टेस्ट (TKT) संबंधित विषयावर आधारित १२० प्रश्न). (पार्ट-२ सुपरवायझरी अॅप्टिटय़ूड टेस्ट (SAT) - व्होकॅब्युलरी, व्हर्बल, कॉम्प्रिहेन्शन, क्वांटिटेटिव्ह अॅप्टिटय़ूड, रिझिनग अॅबिलिटी, डेटा सफिशियन्सी अॅण्ड इंटरप्रिटेशन, न्यूमरिकल अॅबिलिटी इ. आधारित ५० प्रश्न)प्रत्येक प्रश्नास १ गुण असेल आणि चुकीच्या उत्तरासाठी १/४ गुण वजा केले जातील.लेखी परीक्षा पात्रतेचे निकष - खुला/ईडब्ल्यूएस - पार्ट-१ व पार्ट-२ मध्ये प्रत्येकी किमान ३० टक्के गुण आणि सरासरी ४०टक्के गुण.इतर राखीव पदांसाठी - पार्ट-१ व पार्ट-२ मध्ये प्रत्येकी किमान २५ टक्के गुण आणि सरासरी ३० टक्के गुण.अंतिम निवड लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार कॅटेगरी निहाय केली जाईल. डिप्लोमा ट्रेनी पदावरील नेमणूक प्री-एम्प्लॉयमेंट मेडिकल एक्झामिनेशन उत्तीर्ण केल्यानंतर (पॉवरग्रीडच्या संकेतस्थळावरील करिअर पेजवर ‘Health’ लिंकमध्ये उपलब्ध आहे.) अर्जाचे शुल्क : रु. ३०० (ज्यांना लागू आहे.) रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर ( Unique Registration ID तयार होईल.) उमेदवारांच्या online payment option उपलब्ध होईल. उमेदवाराचा ई-मेल आयडी ‘User ID आणि रजिस्ट्रेशन ID पासवर्ड वापरून candidate login page वरील लिंकवरून ऑनलाइन अर्ज आणि भरावयाची फी आणि candidate login home page वर ऑनलाइन पेमेंट ऑप्शन उपलब्ध होईल.विस्तृत माहिती https:// www. powergrid. in/ online- payment- application- fees या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.परीक्षा केंद्र : WR- I साठी नागपूर, पुणे, रायपूर. WR- II साठी - वडोदरा, भोपाळ, इंदौर. SR - I - हैद्राबाद, विजयवाडा, विशाखापट्टणम्. SR - II- बेंगळूरु, चेन्नई, कोची. SR- III- लखनऊ, वाराणसी, आग्रा.डिप्लोमा ट्रेनी पदांची भरती रिजननुसार होणार आहे. डिप्लोमा ट्रेनी इंटर रिजन ट्रान्सफरसाठी पात्र नाहीत.१ वर्षांच्या यशस्वी प्रशिक्षणानंतर उमेदवारांना ज्युनियर इंजिनिअर Gr- IV (एस-१) ग्रेडवर कायम केले जाईल. शंकासमाधानासाठी ई-मेल - recruitment@powergrid. in वर संपर्क साधा.Recruitment of Diploma Trainee २०२३-२४: २४ subject matter; सब्जेक्टमध्ये लिहा.ऑनलाइन अर्ज http:// www. powergrid. in या संकेतस्थळावर दि. २३ सप्टेंबर २०२३ (२३.५९ वाजे) पर्यंत करावेत.