प्रत्युषा वेमुरी ही मुंबईची रहिवासी आहे. ती सायबर सुरक्षातज्ज्ञ आहे. तिने AI-आधारित सायबर सुरक्षा फर्म raptorX.ai (पूर्वी Panoplia.io) सुरू केली आहे. ही फर्म व्यवसायांना सायबर मालवेअर आणि फसवणुकीपासून संरक्षित करण्यात मदत करते. मे २०२३ मध्ये लाँच झालेल्या या कंपनीने शार्क टँक इंडिया सीझन ३ मध्ये आपली उपस्थिती दर्शवली होती. त्यानंतर २.५ टक्के इक्विटीच्या बदल्यात एक कोटी रुपयांचा सौदा त्यांनी केला होता.

प्रत्युषाने मायक्रोसॉफ्ट आणि अकामाईसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम केले आहे. ऑनलाइन घोटाळ्याचा बळी ठरल्यानंतर तिने २०२१ मध्ये ही कंपनी सुरू केली. B2B सेवांचा विस्तार करणे आणि एक मजबूत संघ तयार करणे हे तिचं ध्येय आहे. चला, प्रत्युषा वेमुरीच्या यशाच्या प्रवासाविषयी जाणून घेऊ या.

CSR Scam
निम्म्या किमतीत मिक्सर, स्कूटर देण्याचे आमिष दाखवून २६ वर्षीय तरुणाने केली २० कोटींची फसवणूक
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Hyderabad techies donating to political parties and claiming tax rebates.
IT कर्मचाऱ्यांचं राजकीय पक्षांवर वाढलेलं प्रेम प्राप्तीकर विभागाला खटकलं, अन् उघडकीस आला ११० कोटींचा घोटाळा
dilapidated railway bridge on Nagpur Chhindwara route will be opened
नागपूर – छिंदवाडा मार्गावरील खचलेला रेल्वे पुला सुरू होणार,मुहूर्त ठरला
cyber fraud, fake e-mails, foreign company,
परदेशी कंपनीला बनावट ई-मेल पाठवून दीड कोटींची सायबर फसवणूक
Fraud, cheap house, government quota,
सरकारी कोट्यातून स्वस्त दरात घरे देण्याच्या नावाखाली सुमारे २५ कोटींची फसवणूक, पुरुषोत्तम चव्हाणसह इतर आरोपीविरोधात गुन्हा
दोनदा मुदतवाढीनंतर मनीष नगर रेल्वे भुयारी मार्ग खुला होणार
ED seized property in bank fraud case
२२० कोटींच्या फसवणूक प्रकरणी ईडीकडून ७९ कोटींची मालमत्तेवर टाच

अमेरिकेत मोठ्या कंपन्यांमध्ये केले काम

प्रत्युषा वेमुरीची कहाणी ही एका वैयक्तिक अनुभवाच्या मोठ्या बदलाची सुरुवात कशी बनू शकते याचे प्रेरणादायी उदाहरण आहे. अमेरिकेतील मायक्रोसॉफ्ट आणि अकामाईसारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये काम केल्यानंतर प्रत्युषा भारतात परतली. दिवाळीसाठी ती घर सजवत होती तेव्हा तिला एका ऑनलाइन वेबसाइटवर एक झोपाळा आवडला, जो ४०% सवलतीत उपलब्ध होता. ती एक आकर्षक डील वाटत होती, म्हणून प्रत्युषाने तो झोपाळा ऑर्डर केला.

फसवणुकीला पडली बळी

दिवाळी आली आणि गेली, पण झोपाळा आला नाही. त्यानंतर प्रत्युषाला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. सुरक्षा व्यवस्थेचा अनुभव असूनही ती या घोटाळ्याला बळी पडली. ती वेबसाइट ‘Google प्रायोजित’ होती, ज्यामुळे तिला ती सुरक्षित साइट असल्याचे वाटू लागले. तथापि, तिला नंतर कळले की अनेक घटक वेबसाइटची सत्यता ठरवतात.

शार्क टँकमध्ये मिळाली मोठी डील

या घटनेमुळे प्रत्युषाला ऑनलाइन फसवणुकीच्या समस्येवर तोडगा काढण्याची प्रेरणा मिळाली. तिने raptorX.ai (पूर्वी Panoplia.io) एक AI-आधारित सायबर सुरक्षा फर्मची स्थापना केली. ही कंपनी ऑनलाइन घोटाळ्यांपासून व्यवसाय आणि व्यक्तींचे संरक्षण करण्यासाठी आणि डिजिटल व्यवहारांची सुरक्षा सुधारण्यासाठी उपाय आणि ॲप्स विकसित करते. शार्क टँक इंडिया सीझन ३ मध्ये, raptorX.ai ला २.५% इक्विटीच्या बदल्यात एक कोटी रुपयांची गुंतवणूक मिळाली, यामुळे कंपनीचे मूल्यांकन कोटींवर पोहोचले. B2B सेवांचा विस्तार आणि एक मजबूत संघ तयार करण्याचे प्रत्युषाचे उद्दिष्ट आहे.

Story img Loader