MPSC PSI Bharti 2023: स्पर्धा परीक्षेतून PSI होण्याचे स्वप्न पाहत असाल, तर तुमच्यासाठी एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. ती म्हणजे ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोग’ अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक (विभागीय) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक भरती २०२३ साठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीद्वारे एकूण ६१५ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी उमेदवारांना त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. विशेष म्हणजे ही भरती विभागीय असून पोलीस खात्यातील कर्मचारी या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तसेच या भरतीसाठी उमेदवारांना MPSC PSI मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा २०२३ द्यावी लागणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, परीक्षेची तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता, पगार आणि वयोमर्यादा याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

परीक्षेचे नाव – MPSC PSI मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा २०२३

पदाचे नाव – पोलिस उपनिरीक्षक

एकूण पदसंख्या- ६१५

शैक्षणिक पात्रता –

महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अखत्यारीतील सध्या कार्यरत सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक य पोलीस शिपाई या संवर्गातील कर्मचारीच प्रस्तुत परीक्षेस पात्र असतील

नोकरी ठिकाण – महाराष्ट्र

अर्ज शुल्क –

  • खुला प्रवर्ग – ८४४ रुपये.
  • मागासवर्गीय – ५४४ रुपये.

वयोमर्यादा –

  • खुला प्रवर्ग – ३५ वर्षे
  • मागासवर्गीय/ अनाथ – ४० वर्षे

अर्जाची पद्धत – ऑनलाईन.

महत्वाच्या तारखा –

अर्ज सुरु होण्याची तारीख – ११ सप्टेंबर २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३ ऑक्टोबर २०२३

परीक्षेची तारीख –

महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील उपनिरीक्षक संवर्गातील ६१५ पदांच्या भरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २ डिसेंबर २०२३ रोजी पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा २०२३ मुंबईसह महाराष्ट्रातील ७ जिल्हा केंद्रावर घेण्यात येणार आहे.

हेही वाचा- पदवीधरांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेत ‘या’ पदांसाठी भरती सुरु

अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in

भरती अंतर्गत निवडलेल्या उमेदवारांना महिना ३८ हजार ते १ लाख २२ हजार ८०० रुपयांपर्यंत पगार मिळणार आहे.

भरती संबधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी (https://drive.google.com/file/d/1fZC6VfkuJBXWyUZS8rObNbaMNEdjCpiC/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Psi bharti 2023 opportunity of government job recruitment for the post of sub inspector of police under mpsc has started jap
First published on: 27-09-2023 at 09:47 IST