ESIS Pune Recruitment 2024 : महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा -पुणेअंतर्गत वैद्यकीय अधिकारी या पदासाठी भरती सुरू आहे. एकूण २३ रिक्त जागांवर यासाठी उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांद्वारे अर्ज कुठे आणि कसा करायचा आहे ते जाणून घ्या. तसेच अर्जाची अंतिम तारीख आणि रिक्त पदासाठी उमेदवाराची निवड कशी करण्यात येईल त्याबद्दल माहिती पाहा.

ESIS Pune Recruitment 2024 :

wheat, farmers
केंद्राचा ‘हा’ निर्णय गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर?
Maharashtra Government, Freezes, Ready Reckoner Rates, for 2024 - 2025,lok sabha 2024, elections, house buyers, land, maharashtra, marathi news,
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेडीरेकनर दर ‘जैसे थे’
Maharashtra Rent Control Act 1999 Section 28 ambiguous and unfair to tenants
महाराष्ट्र भाडे नियंत्रण कायदा १९९९ कलम २८ संदिग्धता आणि भाडेकरूंवर अन्यायकारक
Pune, ring Road Project, farmers, financial complaint, Land Acquisition, Collector Issues Warning, government Officers,
पुणे : ‘रिंगरोडचे भूसंपादन करताना तक्रारी आल्यास…’ जिल्हाधिकाऱ्यांची तंबी

रिक्त पदे आणि शैक्षणिक पात्रता

पुण्यातील महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्थेमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणजेच मेडिकल ऑफिसर या पदासाठी भरती सुरू आहे.
या पदासाठी एकूण २३ रिक्त जागांवर भरती करण्यात येणार आहे.
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे एम.बी.बी.एस. [MBBS] या पदवीचे शिक्षण असणे आवश्यक आहे.

हेही वाचा : Pune jobs : पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनच्या अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी! जाणून घ्या….

वयोमर्यादा

वैद्यकीय अधिकारी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे ६९ वर्षांखालील असावे.

ESIS Pune Recruitment 2024 – महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा – पुणे अधिकृत वेबसाईट-
https://www.esic.gov.in/

ESIS Pune Recruitment 2024 – अधिसूचना –
https://drive.google.com/file/d/1UCr861haSvSW59nC8dJ-tURIEUZrdKB1/view

हेही वाचा : DIAT Pune recruitment 2024 : पुणे शहरात नोकरीच्या संधी उपलब्ध; ‘या’ रिक्त पदांवर भरती सुरू…

ESIS Pune Recruitment 2024 : अर्ज आणि निवड प्रक्रिया

वैद्यकीय अधिकारी या पदासाठी इच्छुक उमेदवारास अर्ज करायचा आल्यास तो ऑनलाइन अथवा ऑफलाइन पद्धतीने करता येऊ शकतो.
उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज पाठविणार असल्यास खाली दिलेल्या ई-मेल अॅड्रेसचा वापर करावा.
ई-मेल अॅड्रेस – establishpune.amo@gmail.com
अर्ज करताना उमेदवारांनी अर्जासह आवश्यक ती कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
अर्जात भरलेली माहिती अर्धवट/अपूर्ण असल्यास तो अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
तसेच पात्र ठरलेल्या आणि इच्छुक उमेदवारांसाठी मुलाखतीचेही आयोजन करण्यात आले आहे.
वैद्यकीय अधिकारी या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही २६ फेब्रुवारी २०२४ अशी आहे.
ते वैद्यकीय अधिकारी पदासाठी मुलाखत ही २७ फेब्रुवारी २०२४ असेल.
मुलाखतीचे स्थळ : प्रशासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याचे कार्यालय, तळमजला, पंचदीप भवन, क्र. ६८९/९०, 90, बिबवेवाडी, पुणे-४११०३७.

वैद्यकीय अधिकारी म्हणजेच मेडिकल ऑफिसर या पदासाठी नोकरीचा अर्ज करणाऱ्या उमेदवारांना या भरतीसंदर्भात अधिक माहिती हवी असल्यास महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा पुणेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. अथवा नोकरीबद्दलची अधिसूचना वाचावी. अधिकृत वेबसाइट आणि अधिसूचना वर देण्यात आली आहे.