scorecardresearch

PMPML Recruitment 2024 : पुणे परिवहन मंडळात ‘MBA’ उमेदवारांनाही नोकरीची संधी; पाहा माहिती….

PMPML Recruitment 2024 : पुणे महानगर परिवहन मंडळात पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. खाली अधिक माहिती पाहा.

PMPML Recruitment 2024 interview details
PMPML Recruitment 2024 : पुणे महानगर परिवहन मंडळात पद भरतीसाठी मुलाखतीचे आयोजन [Photo credit -PMPML]

PMPML Recruitment 2024 : पुणे महानगर परिवहन मंडळात ‘मार्केटिंग अधिकारी’ या पदासाठी भरती सुरू आहे. त्यासाठी एकूण दोन रिक्त जागा उपलब्ध आहेत. या जागांसाठी पात्र असलेल्या इच्छुक उमेदवारांसाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात येणार आहे. या मुलाखती २३ फेब्रुवारी २०२४ रोजी पुण्यामध्ये होणार आहेत. मार्केटिंग अधिकारी या पदासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी पात्रता निकष आणि मुलाखतीचा पत्ता यांची माहिती पाहा.

PMPML Recruitment 2024 : पात्रता निकष

Pune jobs ESIS pune is hiring for medical officer
ESIS Pune Recruitment 2024 : महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्थेत भरती सुरू; पाहा अधिक माहिती….
manoj jarange patil Health update
“मी मेलो तर…”, मनोज जरांगेंचं आंदोलकांना भावनिक आवाहन; म्हणाले, “येत्या १९ फेब्रुवारीला…”
Pune jobs 2024 DIAT Pune Bharti
DIAT Pune recruitment 2024 : पुणे शहरात नोकरीच्या संधी उपलब्ध; ‘या’ रिक्त पदांवर भरती सुरू…
Job Openings in Income Tax Department
प्राप्तीकर विभागात बंपर भरती; १२ हजार पदांची भरती, सरकारी नोकरी करण्याची हीच ती शेवटची संधी

पुणे महानगर परिवहन मंडळामध्ये मार्केटिंग अधिकारी या पदासाठी दोन जागांवर भरती होणार आहे. या पदासाठी मुलाखत देणाऱ्या पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडे मार्केटिंग क्षेत्रातील एमबीए [MBA] हे शिक्षण असणे अनिवार्य आहे. तसेच त्या क्षेत्रात किमान सात वर्षांचा अनुभव असायला हवा. या पदासाठी ज्या उमेदवारांची निवड होईल, त्यांना ५०,०००/- रुपये वेतन सुरू होईल.

हेही वाचा : MSAMB recruitment 2024 : पुण्यात नोकरीची संधी उपलब्ध; जाणून घ्या अर्जासाठी पात्रता निकष…

PMPML Recruitment 2024 – अधिकृत वेबसाईट –
https://pmpml.org/

PMPML Recruitment 2024 – अधिसूचना –
https://drive.google.com/file/d/1I8ALjZq-DkKRJ5LU9UkX6LFdYS0W6eAn/view

PMPML Recruitment 2024 : अर्ज आणि मुलाखत

मार्केटिंग अधिकारी या पदासाठी उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
त्यामुळे या पदांसाठी पात्र ठरलेल्या, तसेच इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे.

मुलाखतीचा पत्ता – पीएमटी बिल्डिंग, शंकरशेठ रोड, स्वारगेट, पुणे-४११०३७.

वरील रिक्त पदांसाठी २३ फेब्रुवारी २०२४ रोजी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.
मुलाखतीला येताना उमेदवाराकडे सर्व मूळ प्रमाणपत्रे आणि आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे.
मार्केटिंग अधिकारी या पदाच्या मुलाखतीसंबंधी उमेदवारास अधिक माहिती हवी असल्यास वर दिलेली अधिसूचना वाचावी. अथवा वर दिलेल्या पुणे महानगर परिवहन मंडळाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pune jobs pmpml recruitment 2024 interview details in marathi check out the criteria for this job post dha

First published on: 12-02-2024 at 12:08 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×