एकूण रिक्त पदे – १००० (अजा – १४५, अज – ६८, इमाव – २६४, ईडब्ल्यूएस – ९८, खुला – ४२५) (३५ पदे दिव्यांग (कॅटेगरी VI – ९, HI – १२, OC – ९, MD/ID – ५) साठी राखीव).
काही राज्यांतील रिक्त पदे (कंसात स्थानिय भाषा दिलेली आहे.) – मध्य प्रदेश (हिंदी) – ६०, छत्तीसगड (छत्तीसगडी) – ८०, गुजरात (गुजराती) – १२५, कर्नाटक (कन्नाडा) – ६०, तेलंगणा (तेलुगू) – ३०, महाराष्ट्र (मराठी) – ६० (अजा – ९, अज – ४, इमाव – १६, ईडब्ल्यूएस – ६, खुला – २५).
वयोमर्यादा – (दि. १ मार्च २०२६ रोजी) २० ते ३० वर्षे (कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे, दिव्यांग – १० वर्षे).
पात्रता – (दि. २० एप्रिल २०२६ रोजी) पदवी (कोणतीही शाखा) उत्तीर्ण.
अनुभव – अनुसूचित व्यावसायिक बँक/रिजनल रुरल बँकेमधील कामाचा किमान १८ महिन्यांचा अनुभव. (अर्ज करताना अनुभवाचा दाखला (Annexure-I) नमुन्यातील सादर करणे आवश्यक.)
वेतन श्रेणी – ऑफिसर JMGS-I (रु. ४८,४८० – ८५,९२०). नेमणूकीच्या वेळी LBOs ना JMGS साठी असलेल्या वेतन श्रेणीतील मूळ वेतन रु. ४८,४८०/- अधिक ३ वेतनवाढ दिल्या जातील.
उमेदवारांना ६ महिन्यांचा प्रोबेशन कालावधी पूर्ण करावा लागेल.
- निवड पद्धती – लेखी परीक्षा, स्क्रीनिंग, पर्सोनल इंटरह्यू, अंतिम गुणवत्ता यादी, प्रोफिशियन्सी इन लोकल लँग्वेज, अंतिम निवड.
- लेखी परीक्षा – इंग्लिश भाषा – ३० प्रश्न, ३० मिनिटे; बँकींग नॉलेज – ४० प्रश्न, ४० मि.; जनरल अवेअरनेस/इकॉनॉमी – ३० प्रश्न, ३० मि.; कॉम्प्युटर अॅप्टिट्यूड – २० प्रश्न, २० मि.; एकूण १२० प्रश्न, १२० गुण (प्रत्येक प्रश्नास १ गुण) वेळ – १२० मिनिटे.
- पात्रतेसाठी किमान गुण – खुला, ईडब्ल्यूएस – ४०…, राखीव गट – ३५….
लोकल लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट – ज्या राज्यातील पदांसाठी अर्ज केला असेल, त्या राज्यातील स्थानिय भाषेतील टेस्ट द्यावी लागेल. परंतु ज्या उमेदवारांनी १० वी किंवा १२ वीला संबंधित स्थानिय भाषा अभ्यासल्याचा पुरावा सादर केल्यास त्यांना लोकल लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्टमधून सूट असेल. उमेदवारांना ऑनलाइन टेस्टमधील गुणांना ७०… वेटेज आणि इंटरह्यूमधील गुणांना ३०… वेटेज देवून गुणवत्ता यादी बनविली जाईल.
परीक्षा केंद्र – मुंबई/ठाणे/नवी मुंबई/एमएमआर, पुणे, नाशिक, नागपूर, छ. संभाजी नगर, जळगाव, अकोला, धुळे, कोल्हापूर, नांदेड, अमरावती, पणजी इ.
अर्जाचे शुल्क – अजा/अज/दिव्यांग – रु. १००/-; खुला/ईडब्ल्यूएस/इमाव – रु. ८५०/-. याशिवाय उमेदवारांना लागू असलेले कर आणि पेमेंट गेटवे चार्जेस भरावे लागतील.
शंकासमाधानासाठी ई-मेल आयडी ho.hrd@psb.bank.in
ऑनलाइन अर्ज करण्याविषयी विस्तृत सूचना https://punjabandsindbank.co.in/ या संकेतस्थळावर पॅरा ११ मध्ये उपलब्ध आहेत. याच संकेतस्थळावरील होम पेजमधील Recruitment Link मधून ऑनलाइन अर्ज दि. २० एप्रिल २०२६ पर्यंत करावेत.
