Indian Railways Recruitment 2024 : अनेकांचे रेल्वे विभागात नोकरी करण्याचे स्वप्न असते. आता रेल्वेमध्ये नोकरी करण्याचे तुमचेही स्वप्न पूर्ण होऊ शकते. रेल्वे विभागात नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे नक्कीच आहे. रेल्वेत मेगा भरती लवकरत सुरू होणार आहे. या भरती प्रक्रियेची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालविता, भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावेत. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया. मग लगेचच करा या भरती प्रक्रियेसाठी अर्ज.

ही भरती प्रक्रिया १४ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे तर १३ ऑक्टोबर रोजी बंद होणार आहे.रेल्वे विभागाकडून ही भरती प्रक्रिया ११५८८ पदांसाठी असणार आहे. त्यापैकी ८११३ पदे पदवीधर प्रवर्गासाठी आणि ३४४५ पदे पदवीपूर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी आहेत. पदवीधर उमेदवार १४ सप्टेंबर २०२४ पासून आरामात अर्ज करू शकता. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही १३ ऑक्टोबर आहे आणि त्या अगोदरच आपल्याला अर्ज ही करावी लागतील. तर पदवीपूर्व पदांसाठी अर्ज करण्याची लिंक २१ सप्टेंबर रोजी उघडेल आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑक्टोबर २०२४ असेल

रेल्वे भरती रिक्त जागा

एकूण ११,५५८ रिक्त पदांपैकी ८,११३ पदव्युत्तर-स्तरीय पदांसाठी आणि ३,४४५ पदव्युत्तर-स्तरीय पदांसाठी राखीव आहेत.

पदवी-स्तरीय पदांसाठी, रिक्त जागा

मुख्य व्यावसायिक सह तिकीट पर्यवेक्षक: १,७३६ रिक्त जागा
स्टेशन मास्टर: ९९४ जागा
गुड्स ट्रेन मॅनेजर: ३,१४४ जागा
कनिष्ठ खाते सहाय्यक सह टंकलेखक: १,५०७ रिक्त जागा
वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक: ७३२ रिक्त जागा

अंडरग्रेजुएट पदांसाठी खालील पदे

कमर्शियल कम तिकीट क्लर्क: २,२२ जागा
लेखा लिपिक सह टंकलेखक: ३६१ रिक्त जागा
कनिष्ठ लिपिक सह टंकलेखक: ९९० रिक्त जागा
ट्रेन क्लर्क: ७२ रिक्त जागा

अर्ज फी

SC, ST, माजी सैनिक, महिला, PwBD, ट्रान्सजेंडर, अल्पसंख्याक आणि आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग (EBC) श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्जाची फी २५० रुपये आहे. इतर सर्व अर्जदारांसाठी, फी ५०० रुपये आहे.

हेही वाचा >> Indian Navy Recruitment 2024 : भारतीय नौदलामध्ये नोकरीची सुवर्णसंधी! मेडिकल असिस्टंट पदासाठी होणार भरती, ६९, १०० रुपयापर्यंत मिळू शकतो पगार

भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आपल्याला rrbapply.in या साईटवर आरामात मिळेल. याच साईटवर जाऊन आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.