रेल्वे मंत्रालय, रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड्स ‘असिस्टंट लोको पायलट (ALP)’ पदांची भरती. एकूण रिक्त पदे – ११,१२७.

RRB मुंबईमधील रिक्त पदे – एकूण १,१९३ (सेंट्रल रेल्वे – १,०७८, वेस्टर्न रेल्वे – ३७, दक्षिण सेंट्रल रेल्वे – ७८) (अहमदाबाद WR – १४७; बंगळुरू – २००; भोपाळ WCR – ४२३, WR – ३०; सिकंदराबाद ECoR – ८२४, SCR – ६९६).

पदाचे नाव – असिस्टंट लोको पायलट (ALP). वेतन श्रेणी – लेव्हल-२, मूळ वेतन रु. १९,९००/-, अंदाजे वेतन रु. ३८,०००/- दरमहा (आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर किमान दरमहा रु. ६०,०००/-).

पात्रता – ( १४ जून २०२६ रोजी) १० वी उत्तीर्ण आणि फिटर, इलेक्ट्रिशियन, इन्स्ट्रूमेंट मेकॅनिक, मिलराईट/मेंटेनन्स मेकॅनिक, मेकॅनिक (रेडिओ अँड टी.व्ही.), इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मेकॅनिक (मोटर वेहिकल), वायरमन, ट्रक्टर मेकॅनिक, आर्मेचर अँड कॉईल वाईंडर, मेकॅनिक (डिझेल), हिट इंजिन, टर्नर, मशिनिस्ट, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग मेकॅनिक ट्रेडमधील आयटीआय एनसीव्हीटी/एससीव्हीटी किंवा १० वी उत्तीर्ण आणि वरील ट्रेडमधील नॅशनल अॅप्रेंटिसशिप सर्टिफिकेट कोर्स

किंवा मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ ऑटोमोबाइल किंवा अलाईड इंजिनीअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण. (संबंधित डिसिप्लिनमधील इंजिनीअरिंग पदवीधर उमेदवार पात्र आहेत.)

वयोमर्यादा – ( १ जुलै २०२६ रोजी) १८ ते ३० वर्षे. (कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे; अजा/अज – ५ वर्षे;

निवड पद्धती – (i) कॉम्प्युटर बेस्ड् टेस्ट (CBT – १), (ii) CBT – २, (iii) कॉम्प्युटर बेस्ड् अॅप्टिट्यूड टेस्ट (CBAT), (iv) कागदपत्र पडताळणी, (v) मेडिकल एक्झामिनेशन. (CBT परीक्षा हिंदी, इंग्रजी सोबत मराठी, गुजराती, कोंकणी इ. १३ रिजनल भाषांपैकी एका भाषेमध्ये घेतली जाईल.)

(i) CBT-१ – गणित, मेंटल अॅबिलिटी, जनरल सायन्स या विषयांवर आधारित ऑब्जेक्टिव्ह टाईप टेस्ट ७५ प्रश्न, प्रत्येकी १ गुण, वेळ ६० मिनिटे. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १/३ गुण वजा केले जातील. RRB नुसार रिक्त पदांच्या १५ पट उमेदवार CBT-१ मधील किमान पात्रतेचे गुण मिळविणाऱया उमेदवारांना CBT-२ साठी निवडले जातील.

(ii) CBT-२ – पार्ट-ए (१०० प्रश्न, ९० मिनिटे), पार्ट-बी (७५ प्रश्न, ६० मिनिटे) असे दोन भाग असतील. एकूण १७५ प्रश्न, एकूण वेळ २ तास ३० मिनिटे. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १/३ गुण वजा केले जातील.

पार्ट-ए – (गणित, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, बेसिक सायन्स अँड इंजिनीअरिंग या विषयांवर आधारित प्रश्न)

पार्ट-बी – फक्त पात्रता स्वरूपाची परीक्षेचा अभ्यासक्रम डायरेक्टरेट जनरल ऑफ ट्रेनिंग (DGT) मार्फत वेगवेगळ्या टेक्निकल ट्रेडसाठी तयार केलेला असेल जो https://dgt.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

आय्टीआय्/अॅप्रेंटिसशिप कोर्स पात्रताधारक उमेदवार संबंधित ट्रेडमधील परीक्षा देतील.

डिग्री/डिप्लोमाधारक उमेदवारांना डिसिप्लिननुसार नेमून दिलेल्या ट्रेडसाठी परीक्षा देतील. (१) इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग – इलेक्ट्रिशियन, इन्स्ट्रूमेंट मेकॅनिक, वायरमन, आर्मेचर अँड कॉईल वाईंडर, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग मेकॅनिक.

(२) इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग – इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मेकॅनिक (रेडिओ अँड टी.व्ही.)

(३) मेकॅनिकल इंजिनीअरिंग – फिटर, मेकॅनिक (मोटर वेहिकल), ट्रक्टर मेकॅनिक, मेकॅनिक (डिझेल), टर्नर, मशिनिस्ट, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग मेकॅनिक, हिट इंजिन, मिलराईट, मेंटेनन्स मेकॅनिक.

(४) ऑटोमोबाइल इंजिनीअरिंग – मेकॅनिक (मोटर वेहिकल), ट्रक्टर मेकॅनिक, मेकॅनिक (डिझेल), हिट इंजिन, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग मेकॅनिक.

(iii) कॉम्प्युटर बेस्ड् अॅप्टिट्यूड टेस्ट (CBAT) – रिक्त पदांच्या ८ पट उमेदवार कॅटेगरी निहाय CBT-२ पार्ट-ए मधील गुणवत्तेनुसार CBAT साठी निवडले जातील.

परीक्षा शुल्क – फक्त ऑनलाइन मोडने १६ जून २०२६ (२३.५९ वाजेपर्यंत) भरावयाचे आहे. खुला/इमाव/ईडब्ल्यूएस – रु. ५००/- ; अजा/अज/माजी सैनिक/अपंग/महिला/ट्रान्सजेंडर/अल्पसंख्यांक/आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग (ईबीसी) यांना रु. २५०/- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी कोणतीही एक RRB निवडावी. (जसे की RRB मुंबई http://www.rrbmumbai.gov.in RRB बेंगलुरू http://www.rrbbnc.gov.in RRB अहमदाबाद http://www.rrbahmedabad.gov.in) rrbapply.gov.in च्या वेबसाईटवरील लिंकमधून ऑनलाइन अॅप्लिकेशन १४ जून २०२६ (२३.५९ वाजे)पर्यंत करावेत.