RBI च्या मुंबई ऑफिस अंतर्गत रिक्त पदे – २४९ (अजा – ५४, अज – २, इमाव – २५, ईडब्ल्यूएस – २४, खुला – १४४) (२४ पदे अपंग कॅटेगरी ए-२, बी-८, सी-५, डी-९ पदे राखीव) (स्थानिय भाषा – मराठी/कोंकणी)
नागपूर ऑफिस अंतर्गत रिक्त पदे – १७ (अजा – २, अज – ५, इमाव – १, ईडब्ल्यूएस् – १, खुला – ८) (२ पदे दिव्यांग कॅटेगरी बी साठी राखीव). (स्थानिय भाषा – मराठी/हिंदी)
पात्रता – ( १ फेब्रुवारी २०२६ रोजी) पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण. (अजा/अजअपंग यांना गुणांची अट नाही.)
वयोमर्यादा – ( १ फेब्रुवारी २०२६ रोजी) २० ते २८ वर्षे. (अजा/अज – ३३ वर्षेपर्यंत, इमाव – ३१ वर्षेपर्यंत, (विधवा/ परित्यक्ता, पुनर्विवाह न केलेल्या महिला – (३५ वर्षे, अजा/अज – ४० वर्षे) वर्षेपर्यंत, (अपंग – ३८/४१/४३ वर्षेपर्यंत).
निवड पद्धती –
(I) पूर्व परीक्षा – ( ११ एप्रिल २०२६ रोजी) मल्टिपल चॉईस (१) इंग्लिश लँग्वेज – ३० प्रश्न, ३० गुण; (२) न्यूमरिकल ॲबिलिटी – ३५ प्रश्न, ३५ गुण; (३) रिझनिंग ॲबिलिटी – ३५ प्रश्न, ३५ गुण. कालावधी प्रत्येकी २० मिनिटे. एकूण १०० प्रश्न, १०० गुण, कालावधी ६० मिनिटे. यातून रिक्त पदांच्या १० पट उमेदवार मुख्य परीक्षेस निवडले जातील.
(II) मुख्य परीक्षा – ( ७ जून २०२६ रोजी) मेन एक्झामसाठी निवडलेल्या उमेदवारांना त्यांचे रोल नंबर RBI च्या वेबसाईटवर एप्रिल २०२६ मध्ये उपलब्ध करून दिले जातील. मेन एक्झामचा निकाल बँकेच्या वेबसाईटवर मे/जून २०२६ मध्ये प्रसिद्ध केला जाईल.
ऑनलाइन मल्टिपल चॉईस (१) टेस्ट ऑफ रिझनिंग – वेळ ३० मिनिटे, (२) टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज – वेळ ३० मिनिटे, (३) टेस्ट ऑफ न्यूमरिकल ॲबिलिटी – वेळ ३० मिनिटे, (४) टेस्ट ऑफ जनरल अवेअरनेस (वेळ २५ मिनिटे), (५) टेस्ट ऑफ कॉम्प्युटर नॉलेज – वेळ २० मिनिटे. प्रत्येकी ४० प्रश्न/४० गुण. एकूण गुण २००, एकूण कालावधी १३५ मिनिटे. ऑब्जेक्टिव्ह टेस्टमधील प्रत्येक चुकीच्या उत्तराला १/४ गुण वजा केले जातील. (ऑनलाइन परीक्षेचे माध्यम इंग्रजी/हिंदी आणि स्थानिय भाषा)
(III) लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट – (LPT) मेन ऑनलाईन परीक्षेसाठी (रिक्त पदांच्या २ पट) शॉर्ट लिस्ट झालेल्या उमेदवारांना ज्या राज्यांतील पदांसाठी अर्ज केला आहे. त्या राज्याच्या ऑफिशियल/स्थानीय भाषेत लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट द्यावी लागेल.
मेन एक्झाममधील गुणवत्तेनुसार उमेदवार लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्टसाठी निवडले जातील. तत्पूर्वी कागद पडताळणी केली जाईल. LPT बँकेच्या संबंधित ऑफिसमध्ये घेतली जाईल. मेडिकली फिट ठरलेल्या उमेदवारांची अंतिम निवड ऑनलाईन मेन एक्झाममधील गुणवत्तेवर आधारित केली जाईल.
वेतन – दरमहा रु. ५८,५१४/- (एचआरए शिवाय) आणि रु. ६२,८६४/- (एचआरएसह). उपलब्ध असल्यास बँकेचे अकोमोडेशन दिले जाईल.
प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग – अजा/अज/इमाव/विकलांग उमेदवारांना बँकेमार्फत प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग दिले जाईल. इच्छुक उमेदवारांनी RBI च्या रिजनल ऑफिसकडे ई-मेलने दि. १० मार्च २०२६ पर्यंत अर्ज करावेत. प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग दरम्यान राहण्याचा, जेवणाचा, प्रवासाचा खर्च उमेदवारांना करावा लागेल. प्री एक्झामिनेशन ट्रेनिंगसाठीच्या अर्जाचा नमुना (Appendix-V)बँकेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
ई-मेल आयडी आहे recruitmentmumbai@rbi.org.in. नागपूर ऑफिसचा ई-मेल आयडी recruitmentnagpur@rbi.org.in
पूर्व परीक्षेसाठी परीक्षा केंद्र – (i) (मुंबई रिक्रूटिंग ऑफिससाठी) छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई/ठाणे/नवी मुंबई /एमएमआर, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सातारा, सोलापूर, पणजी, मापुसा. (ii) (नागपूर रिक्रूटींग ऑफिससाठी) अमरावती, चंद्रपूर, नागपूर इ.
मुख्य परीक्षेसाठी परीक्षा केंद्र – (मुंबई रिक्रूटींग ऑफिससाठी) छ. संभाजीनगर, जळगाव, धुळे, कोल्हापूर, मुंबई/ठाणे/नवी मुंबई/एमएमआर रिजन, नाशिक, सांगली, सातारा, सोलापूर, नांदेड, पुणे, पणजी. (नागपूर रिक्रूटींग ऑफिससाठी) अमरावती, नागपूर, रायपूर, भोपाळ, इंदौर इ.
परीक्षा शुल्क/इंटिमेशन चार्जेस – रु. ४५०/-. (अजा/अजअपंग/माजी सैनिक यांना फक्त इंटिमेशन चार्जेस रु. ५०/- भरावे लागतील.) याशिवाय आकारला जाणारा १८ टक्के जीएसटी उमेदवारांना भरावा लागेल.
शंकासमाधानासाठी https://cgrs.ibps.in/ वरील लिंकवर संपर्क साधा.
ऑनलाइन अर्ज http://www.rbi.org.in या संकेतस्थळावर ‘Recruitment for the post of Assistant-Panel year2025’ या लिंकवर क्लिक करून ८ मार्च २०२६ पर्यंत करावेत.
