Reserve Bank of India Grade B Recruitment 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आणि आरबीआय 'ग्रेड बी' भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने विविध विभागांमध्ये ग्रेड बी ऑफिसर्सच्या पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. २५ जुलैपासून ही भरती प्रक्रिया सुरू झाली असून, तुम्ही १६ ऑगस्ट किंवा त्यापूर्वी आरबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करू शकता. तर या भरतीसाठी आवश्यक रिक्त पदे, पदसंख्या, अर्ज कसा करायचा, वयोमर्यदा, शैक्षणिक पात्रता याबद्दल सविस्तर जाणून घेऊ. RBI Grade B Recruitment 2024 : रिक्त पदे अधिकारी ग्रेड बी(डीआर) जनरल - ६६ जगाअधिकारी ग्रेड बी (डीआर) डीईपीआर - ३१ जागाअधिकारी ग्रेड बी (डीआर) डीएसआईएमच्या - ७ जागाअशा ९४ रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. RBI Grade B Recruitment 2024 : अर्ज कसा करायचा? पायरी १ : सगळ्यात पहिला rbi.org.in अधिकृत वेबसाइटला भेट द्या. पायरी २ : आरबीआय ग्रेड बी ऑफिसर सध्याची नवीन भरती असणाऱ्या बटणावर क्लिक करा पायरी ३ : 'New Registration Button' वर क्लिक करा आणि सर्व माहिती भरा. नंतर 'सेव्ह' बटणावर क्लिक करा पायरी ४ : नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तयार केला जाईल. आता उर्वरित अर्ज भरण्यासाठी पुन्हा लॉग इन करा. पायरी ५ : आता तुमचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा. सर्व माहिती व्हेरिफाय करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा पायरी ६ : अर्ज शुल्क भरा. पायरी ७: भविष्यातील संदर्भासाठी अर्ज डाउनलोड करा आणि प्रिंट सुद्धा काढून ठेवा. RBI Grade B Recruitment 2024 : कोणती कागदपत्रे लागतील ? विहित नमुन्यातील उमेदवाराचे छायाचित्रविहित नमुन्यातील उमेदवाराची स्वाक्षरीडाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा (जर उमेदवाराचा डाव्या हाताचा अंगठा नसेल, तर तो उजवा अंगठा वापरू शकतो.)लिखित घोषणापत्राची प्रत अर्ज शुल्क - एससी / एसटी / पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी १०० रुपये प्लस १८ टक्के जीएसटी. तर जनरल, ओबीसी, ईडब्ल्यूएसएस उमेदवारांसाठी ८५० रुपये प्लस १८ टक्के जीएसटी इतके अर्ज शुल्क असणार आहे. शैक्षणिक पात्रता उमेदवाराने अधिसूचनेत पाहून घ्यावी… अधिसूचना : अधिकारी या लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात… लिंक :